श्रीमंतीचा महामार्ग (भाग ६) – दृष्टीकोन

एक तरुण एकदा खुप उत्साहामध्ये, जोशामध्ये आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करण्यासाठी घरातुन निघाला. त्याला जायचे होते राज्याच्या राजधानीच्या शहरात व तिकडे जाऊन पराक्रम गाजवुन राजाची मर्जी संपादन करण्याचे त्याने ठरवले. वाटेत घनदाट जंगले, जंगली श्वापदे, चोर-डाकु, शत्रु प्रदेश अशा सगळ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक ते सर्व कौशल्ये, युध्दकला, धाडसी वृत्ती या सगळ्या गोष्टी त्याच्या कडे होत्या. घताना त्याने त्याच्या आजोबांच्या काळातील एक नकाशा सोबत घेतला. मजल-दरमजल करीत तो निघाला. एक दिवस-दोन दिवस, आठवडा झाला तरी त्याला त्याचे गंतव्य काही मिळेना. वाटेत अपेक्षेप्रमाणे सगळी संकटे देखील आली. त्या सर्व संकटांवर त्याने मात ही केली. एका शहरातुन दुस-या शहरामध्ये तो फिरत होता. पण त्याला राजधानीचे शहर काही मिळेना.

वैतागुन त्याने एका चौकातील, एका वृध्द माणसाला विचारले की राजधानी आहे कुठे नक्की? त्यावर वृध्द माणसाने सांगितले की जी राजधानी तो शोधत आहे, ती तर शेजारच्या राज्याची राजधानी आहे. व तो आला आहे शत्रुच्या राज्यामध्ये. वृध्दाने त्याचा तो नकाशा देखील पाहिला. व त्याला योग्य नकाशा व मार्ग सांगितला.

अर्थात योग्य नकाशा व मार्ग समजल्यावर तरुण इच्छित स्थळी पोहोचतो. गोष्ट इथेच संपते.

आपली सर्वांची अवस्था अगदी या तरुणासारखीच आहे. आपल्या कडे उत्साह आहे, कौशल्य आहे. किंवा नसतील तरी आपण आवश्यक ती कौशल्ये शिकतो. व प्रवासाला सुरुवात करतो चुकीचा नकाशा घेऊन. नकाशाच जर चुकीचा असेल तर तुमचा उत्साह, आत्मविश्वास, कौशल्ये सर्व काही व्यर्थ आहे. कारण तुम्ही या सर्वांसोबत चुकीच्या ध्येयापर्यंत जलद गतीने पोहोचणार यात शंका नाही.

नकाशा म्हणजे नक्की काय? तर आपणास काय मिळवायचे आहे किंवा आपणास कोठे जायचे आहे याविषयीचे आपले ज्ञान. हे ज्ञान आपणास कसे व कुठुन मिळते बरे? जीवनात आपणास हे ज्ञान समाजाकडुनच मिळत असते. समाजातील प्रवाहच ठरवतात की तुम्ही कुठे जायचे आहे, तुम्ही आयुष्यात काय करायचे आहे. समाजाकडुन आपणास वेळोवेळी जे काही मिळत असते, अगदी दररोज, त्या वरुन आपला समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन तयार होत असतो. आणि आपल्या नकळतच आपला आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टेकोण देखील समाजामुळेच बनत असतो. आपल्या नकळत आपण ज्या दिशेला आपल्या जीवनाची नौका घेऊन चाललो आहोत, ते दिशा समाजाने आपणास दाखवलेली आहे. नाव वल्हवायचे काम आपण कितीही शिताफीने केले तरी आपण पोहोचणार ते चुकिच्याच ध्येयापाशी.

आपणा प्रत्येकाकडे असे, आपण न बनवलेले, समाजाने बनवुन दिलेले, असंख्य नकाशे आपल्या डोक्यात असतात. या नकाशांचे दोन मुख्य भाग पाडता येतील. एक म्हणजे गोष्टी वस्तुतः जशा आहेत तशा नकाशामध्ये असणे व दुसरा म्हणजे वस्तु, गोष्टी जशा असावयास हव्या तशा नकाशामध्ये दिसणे. आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी जे काही निर्णय घेत असतो, जे काही करीत असतो ते सर्वकाही आपल्या मेंदुतील या नकाशांमुळेच करीत असतो. आणि आपण अशाच पध्दतीने सर्व काही करीत असतो की जणु काही आपणाकडे जे नकाशे आहेत त्याच प्रमाणे सगळे जग आहे किंवा अगदी तसेच सर्व काही व्हावे. हे अगदी सामान्य आहे. त्यामुळे नकाशे (दृष्टीकोन) सर्व कर्मांचे मुळ आहे हे आपणास समजले पाहिजे. आपले मानसिकता, कौशल्ये या सर्व नंतरच्या गोष्टी आहेत. खालील चित्रातील बदक पहा.

तुम्हाला बदकाचे तोंड व त्याची चोच दिसली. बरोबर ना? अनेकांना हेच दिसले. पण जर मी तुम्हाला म्हंटलो की नाही, तुम्ही चुकीचे आहात तर?

काही लोकांना तर ससा व सश्याचे कान दिसताहेत.  चित्र पुन्हा एकदा पहा आणि सांग आता तुम्हाला काय दिसते आहे?

मग मला सांगा दोन प्रकारच्या लोकांना दोन भिन्न आकार एकाच चित्रामध्ये दिसले. या पैकी बरोबर कोण?

यावरुन आपणास एक गोष्ट समजते ती अशी की दोन व्यक्ति एकाच गोष्टीकडे पाहताना दोन वेगवेगळे अर्थ काढु शकतात, मतभिन्नता प्रदर्शित करु शकतात व तरीही ते दोघे ही बरोबर म्हणजे योग्य असु शकतात. इथे तर्काचा किंवा बुध्दीचा काहीही संबंध नाहीये. हे सर्व आहेत मनाचे खेळ. दोन भिन्न लोकांच्या दोन भिन्न मनांचे खेळ.

माझे फक्त एक वाक्य ‘खालील चित्रातील बदक पहा’ त्यामुळे तुम्ही आधी बदकच पाहिला. माझ्या वाक्याने जे काम केले आहे ते म्हणजे तुमच्या दृष्टीकोनाला, माझ्या मर्जीप्रमाणे घडवणे. तुम्हाला काय दिसले पाहिजे ही मी ठरवले. माझ्या एका वाक्याचा परिणाम असा होऊ शकतो तर विचार करा वर्षानुवर्षांच्या अशा समाजातील असंख्य गोष्टींना आपला दृष्टीकोन, आपल्या मर्जी प्रमाणे घडला असेल का बरे? आपला दृष्टीकोन, दुस-यांनीच बनवला आहे. पालक, शिक्षक, कुटुंबातील इतर सदस्य, मित्र मंडळी, मंदिरे, शाळा, कामाची ठिकाणे, बस स्टॅंड, रेल्वे स्टॅंड्स अशा अनेक गोष्टी आहेत की जेथील सामाजिक प्रवाहांचा, गुंत्यांचा, दबावाचा प्रत्यक्ष परिणाम आपला दृष्टीकोन बनण्यात झालेला.

तुम्हाला आणखी एक अति महत्वाची गोष्ट मी सांगतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे आपला उत्साह, आत्मविश्वास व कौशल्ये हे महत्वाचे आहेच. पण मुलतः आपला उत्साह, आत्मविश्वास व कौशल्ये या सा-यांचे उगमस्थान दुसरे तिसरे काही नसुन आपला दृष्टीकोनच आहे. म्हणजे असे की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कोणकोणत्या उच्च किंवा नीच गोष्टी असतील त्या सर्वच्या सर्व आपल्या दृष्टीकोनातुनच तयार होतात. याचाच अर्थ असा आहे की आपला दृष्टिकोण खुप महत्वाचा आहे किंबहुना कौशल्ये, गुणवत्ता याहींपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट आहे आपला दृष्टीकोन.

आपण जे काही करीत असतो त्या सर्वांची प्रेरणा आपला दृष्टीकोनच आहे. आपल्या कामाचे प्रेरणास्थान, आपल्या दृष्टीकोनापेक्षा वेगळे नसते. दृष्टीकोन या शब्दास लेखकाने पॅराडाईम असा इंग्रजी शब्द योजला आहे. ज्यांनी आधी बदक पाहिला त्यांना नंतर जरी दुसरा दृष्टिकोण देउ केला तरी, त्यांना चित्रामध्ये बदकच दिसणार. त्यांना ससा पाहणे अवघड जाते.

आपला जसा दृष्टीकोन असतो अगदी तसेच आपण इतरांसोबत व्यवहार करीत असतो. व आपण जसे व्यवहार , कर्म करु तसेच आपले भवितव्य असणार आहे हे निश्चित.

त्यामुळे आपले भवितव्य ख-या अर्थाने उज्वल, भव्य करायचे असेल तर सुरुवात कुठून बरे केली पाहिजे मित्रांनो?

बरोबर ओळखले तुम्ही. सुरुवात दृष्टीकोन बदलण्यानेच केली पाहिजे. जोपर्यंत तुमचा दृष्टिकोण स्पष्ट नाहीये, त्यावर समाजाचा परिणाम होतोच आहे, जोपर्यंत तुमच्या कडे योग्य, बरोबर नकाशा नाही, तोपर्यंत तुम्ही तुमची कौशल्ये कितीही वापरा, तुम्ही पोहोचणार चुकीच्याच ध्येयापर्यंत. तुम्ही वर वर कितीही मलमपट्टी केलीत तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

दृष्टीकोनातील बदल

दृष्टीकोन म्हणजे काय हे आपण पाहिले . आता आपण पाहुयात दृष्टीकोनातील बदलाने नक्की काय होते ते. यासाठी खाली लघुकथा वाचा.

‘दृष्टि’कोन
एक अंदाजे पन्नाशीतील इसम त्याच्या २०-२२ वर्षे वयाच्या मुलासोबत रेल्वेमधुन प्रवास करीत होते. जशी गाडी सुरु झाली तसे तो तरुण मुलगा अति उत्साहात मोठ्याने ओरडला “बाबा, झाडे मागे पळताहेत !!!”
मुलाचे बोलणे ऐकुन त्याचे बाबा स्मित हास्य करुन शांत बसले. परंतु शेजारच्याच सीट वर बसलेल्या एका जोडप्याला मात्र त्या तरुण मुलाचे बोलणे थोडे विचित्र वाटले.
थोड्या वेळाने पुन्हा मुलगा आश्चर्याच्या सुरात, आनंदाने मोठ्याने ओरडला,”बाबा ते बघा ढग आपल्या सोबतच पळताहेत.” एवढे बोलुन मुलगा अक्षरशः टाळ्या वाजवु लागला.
या वेळी मात्र त्या जोडप्याने न राहवुन, थोडेसे वैतागुन त्या मुलाच्या बाबांना बोलले ,”तुमचा मुलगा एवढा मोठा दिसतोय व तो अशा पध्दतीने ओरडतोय..तुम्हाला वाटत नाही का की याला एखाद्या चांगल्या डॉक्टर ला दाखवले पाहीजे!!!”
मुलाच्या बाबांनी शांतपणे, पुन्हा तेच स्मित हास्य चेह-यावर आणत त्या जोडप्याला सांगितले..”हो खर आहे तुमचे म्हणणे. व आम्ही नुकतेच डॉक्टरांकडे जाऊन माघारी घरी निघालो आहोत. माझा मुलगा जन्मतःच अंध होता. आज पहिल्यांदाच तो हे जग पाहात आहे, त्यामुळे खुप आनंदी आहे”
जोडप्याने जे दिसते आहे त्या नुसार काय असेल याविषयी कयास लावला. व त्यांचा तो अंदाज (हा मुलगा मतिमंद तर नाही ना !!) फक्त दृश्य माहिती वर अवलंबुन होता. सुरुवातीस त्यांना मुलाच्या ओरडण्याचा त्रास झाला. नंतर दृष्टीकोनात झालेल्या आमुलाग्र बदलामुळे त्या मुलाच्या ओरडण्याचा त्रास नाही तर त्या जोडप्यास आनंदच झाला, व ते जोडपे देखील त्या बापलेकांच्या आनंदात सहभागी झाले.
कित्येकदा आपणास, विचित्र वागणा-या माणसांच्या आयुष्यातील अशा घटना, की ज्यामुळे आपला दृष्टीकोन आमुलाग्र बदलतो , त्या घटना माहित नसतात. व आपण ही माहिती नसल्याने अकारणच स्वःतलाच त्रागा, त्रास , दुःख करुन घेत असतो. कोण कसे वागतो, वागते याला काही तरी कारण असतेच. ते जरी समजले नाही तरी “त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ” हे जरी आपण समजुन घेतले तरी आपण किमान दुःखी कष्टी तरी होणार नाही.
दृष्टीकोन बदलल्यास , आपणास होणा-या सुख-दुःखाचा अनुभव बदलतो.

आपल्या दृष्टीकोनातील बदलच ठरवीत असतो आपण कसे वागणार आहोत. आपली मनोभुमिका कशी असेल, आपले भाव विश्व कसे असेल, आपले इतरांसोबतचे वर्तन कसे असेल हे सगळे ठरते फक्त आणि फक्त दृष्टीकोनामुळेच.

हे नीट समजण्यासाठी आणखी एक छोटी गोष्ट वाचा.

एक युद्धनौका अनेक महिन्यांच्या खडतर समुद्र सफरीवर होती. अचानक हवामान बिघडले. समोरचे काहीही दिसेनासे झाले. मोठ्या मोठ्या समुद्र लाटा नौकेवर येऊन आदळु लागल्या. सर्वजण सावध झाले. तेवढ्यात नाविकाला समोर काही अंतरावर एक खुप मोठा प्रकाशझोत, धुक्यात अस्पष्ट दिसला. तो उंच होता. दुस-या एखाद्या मोठ्या नावेचा असावा कदाचित असा अंदाज करीत नाविकाने कॅप्टन ला सांगितले की समोर एक मोठे जहाज आहे व आपले जहाज त्या जहाजावर जाऊन थोड्याच वेळात आदळणार आहे. मोठा अपघात होणार. कॅप्टन ने नाविकाला एक संदेश समोरच्या जहाजाकडे देण्यास सांगितला.

“आपली जहाजे एकमेकांवर आदळणार आहेत, त्यामुळे तुम्ही तात्काळ दिशा बदला !’ नाविकाने संदेश पाठवला.

तिकडुन उलट संदेश आला.”तुम्ही तुमच्या जहाजाची दिशा बदला!”

इकडुन कॅप्टन ने आणखी एक संदेश पाठवला,”मी कॅप्टन आहे, तुम्ही दिशा बदला!”

“मी एक द्वीतीय श्रेणी कर्मचारी आहे, तुम्ही दिशा बदला!”, उलटा निरोप आला.

आता मात्र कॅप्टन भडकला. त्याने इशारा/धमकी म्हणुन निरोप पाठवला.

“ही एक युध्दनौका आहे! तुम्ही दिशा बदला.”

तिकडुन निरोप आला “हे एक लाईटहाऊस आहे, तुम्ही दिशा बदला !”

आणि कॅप्टनने दिशा बदलली स्वतःच्या जहाजाची.

काय अवस्था झाली असेल बरे त्या कॅप्टनची?

कॅप्टन त्याच्या पुर्वीच्याच दृष्टीकोनाला जितका जास्त वेळ चिकटुन राहिला असता तितका जास्त वेळ त्याने संपुर्ण जहाज व त्यावरील सर्व लोक यांचे जीवनच अंधकारमय करुन टाकले असते.

लाईटहाऊस कधीही दिशा बदलत नसते. कारण ते स्थिर असते. दिशा बदलावी लगते ती जहाजांना, जेणेकरुन जहाजे लाईटहाऊस वर आदळणार नाहीत.

आपले आयुष्य देखील काहीसे असेच आहे. जहाजे म्हणजे आपली कौशल्ये, आपला आत्मविश्वास, मनोभुमिका, इत्यादी इत्यदी. तर लाईट हाऊस म्हणजे जीवनमुल्ये! जीवनमुल्ये स्थिर असतात. ती मार्गदर्शक असतात. त्यांच्यामुळेच आपली जीवन नौका सहीसलामत पैलतीर गाठु शकते.

त्यामुळे आपला दृष्टीकोन बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती अशी की आपला दृष्टीकोन हा जीवनमुल्यांवर आधारीत असला पाहिजे. जर तो जीवनमुल्यांवर आधारीत असेल तरच आपला नकाशा म्हणजे दृष्टीकोन योग्य असेल व आपण चुकिच्या दिशेला भरकटणार नाही.

भौतिक शास्त्रातील नियम जसे गुरुत्वाकर्षण आहे की जे अबाधित आहे, तीन ही काळांत सत्य आहे. अपरिवर्तनीय आहे, तसे्च जीवनमुल्ये देखील अपरिवर्तनीय आहेत. ती अढळ आहेत. मी ज्या जीवनमुल्यांच्या विषयी बोलतो आहे ती काही धर्म, अध्यात्मातील तत्वे नाहीत मित्रांनो. ही तत्वे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणेच निसर्गदत्त आहेत.

आपल्या पुढील लेखामध्ये आपण या नित्य-नुतन तरीही अनादी अशा जीवन-तत्वांविषयी जाणुन घेऊ की जी आपल्या जीवनाला लाईटहाऊस प्रमाणेच दिशा दाखवतात.

लेख आवडल्यास अवश्य तुमचा अभिप्राय कळवा, शेयर, फॉरवर्ड करा.

कळावे

आपलाच

महेश ठोंबरे – 9923062525

Business leader and motivator

आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525

मी एक यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे कारण नक्की काय आहे, हेच मी “श्रीमंतीचा महामार्ग” या लेखमालेतुन लिहित आहे. तुम्हाला माझ्या सोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा, व्यवसाय, तोही कमीत कमी भांडवलामध्ये सुरु करायचा असेल व माझ्या सारखेच (किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त) यश मिळवायचे असेल तर मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiY2l0eSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiUHVuZSIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJzZWxlY3RsaXN0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsImxhYmVsX2RlbGltIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJpY29uX2NsYXNzIjoiIiwiaWNvbl9zaXplIjoiIiwiaWNvbl9jb2xvciI6IiIsInRlcm1zIjoiIiwib3B0aW9ucyI6W3sibmFtZSI6IlB1bmUiLCJsYWJlbCI6IlB1bmUgLSBcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJBaG1lZG5hZ2FyIiwibGFiZWwiOiJBaG1lZG5hZ2FyIC0gXHUwOTA1XHUwOTM5XHUwOTJlXHUwOTI2XHUwOTI4XHUwOTE3XHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiU2hpcmRpIiwibGFiZWwiOiJTaGlyZGkgLSBcdTA5MzZcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NGRcdTA5MjFcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJOYXNoaWsiLCJsYWJlbCI6Ik5hc2hpayAtIFx1MDkyOFx1MDkzZVx1MDkzNlx1MDkzZlx1MDkxNSJ9LHsibmFtZSI6IkF1cmFuZ2FiYWQiLCJsYWJlbCI6IkF1cmFuZ2FiYWQgLSBcdTA5MTRcdTA5MzBcdTA5MDJcdTA5MTdcdTA5M2VcdTA5MmNcdTA5M2VcdTA5MjYifSx7Im5hbWUiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIiwibGFiZWwiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIC0gXHUwOTM1XHUwOTIxXHUwOTE3XHUwOTNlXHUwOTM1IFx1MDkyZVx1MDkzZVx1MDkzNVx1MDkzMyJ9LHsibmFtZSI6IlRhbGVnYW9uIiwibGFiZWwiOiJUYWxlZ2FvbiAtIFx1MDkyNFx1MDkzM1x1MDk0N1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkxvbmF2bGEiLCJsYWJlbCI6IkxvbmF2bGEgLSBcdTA5MzJcdTA5NGJcdTA5MjNcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MzJcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJLaG9wb2xpIiwibGFiZWwiOiJLaG9wb2xpIC0gXHUwOTE2XHUwOTRiXHUwOTJhXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNmIn0seyJuYW1lIjoiRmFsdGFuIiwibGFiZWwiOiJQaGFsdGFuIC0gXHUwOTJiXHUwOTMyXHUwOTFmXHUwOTIzIn0seyJuYW1lIjoiQWtvbGEiLCJsYWJlbCI6IkFrb2xhIC0gXHUwOTA1XHUwOTE1XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQW1yYXZhdGkiLCJsYWJlbCI6IkFtcmF2YXRpLSBcdTA5MDVcdTA5MmVcdTA5MzBcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MjRcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJCZWVkIiwibGFiZWwiOiJCZWVkIC0gXHUwOTJjXHUwOTQwXHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiQmhhbmRhcmEiLCJsYWJlbCI6IkJoYW5kYXJhIC0gXHUwOTJkXHUwOTAyXHUwOTIxXHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQnVsZGhhbmEiLCJsYWJlbCI6IkJ1bGRoYW5hIC0gXHUwOTJjXHUwOTQxXHUwOTMyXHUwOTIyXHUwOTNlXHUwOTIzXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQ2hhbmRyYXB1ciIsImxhYmVsIjoiQ2hhbmRyYXB1ciAtIFx1MDkxYVx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0ZFx1MDkzMFx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IkRodWxlIiwibGFiZWwiOiJEaHVsZSAtIFx1MDkyN1x1MDk0MVx1MDkzM1x1MDk0NyJ9LHsibmFtZSI6IkdhZGNoaXJvbGkgIiwibGFiZWwiOiJHYWRjaGlyb2xpIC0gXHUwOTE3XHUwOTIxXHUwOTFhXHUwOTNmXHUwOTMwXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiR29uZGlhIiwibGFiZWwiOiJHb25kaWEgLSBcdTA5MTdcdTA5NGJcdTA5MDJcdTA5MjZcdTA5M2ZcdTA5MmZcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJIaW5nb2xpIiwibGFiZWwiOiJIaW5nb2xpIC0gXHUwOTM5XHUwOTNmXHUwOTAyXHUwOTE3XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiSmFsZ2FvbiIsImxhYmVsIjoiSmFsZ2FvbiAtIFx1MDkxY1x1MDkzM1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkphbG5hIiwibGFiZWwiOiJKYWxuYSAtIFx1MDkxY1x1MDkzZVx1MDkzMlx1MDkyOFx1MDkzZSJ9LHsibmFtZSI6IktvbGhhcHVyIiwibGFiZWwiOiJLb2xoYXB1ciAtIFx1MDkxNVx1MDk0Ylx1MDkzMlx1MDk0ZFx1MDkzOVx1MDkzZVx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IkxhdHVyIiwibGFiZWwiOiJMYXR1ciAtIFx1MDkzMlx1MDkzZVx1MDkyNFx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBDaXR5IiwibGFiZWwiOiJNdW1iYWkgQ2l0eSAtIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBTdWJ1cmJhbiIsImxhYmVsIjoiTXVtYmFpIFN1YnVyYmFuIC0gXHUwOTI4XHUwOTM1XHUwOTQwIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik5hZ3B1ciIsImxhYmVsIjoiTmFncHVyIC0gXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTE3XHUwOTJhXHUwOTQxXHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiTmFuZGVkIiwibGFiZWwiOiJOYW5kZWQgIC1cdTA5MjhcdTA5M2VcdTA5MDJcdTA5MjZcdTA5NDdcdTA5MjEifSx7Im5hbWUiOiJOYW5kdXJiYXIiLCJsYWJlbCI6Ik5hbmR1cmJhciAtIFx1MDkyOFx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDkyY1x1MDkzZVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik9zbWFuYWJhZCIsImxhYmVsIjoiT3NtYW5hYmFkIC0gXHUwOTA5XHUwOTM4XHUwOTRkXHUwOTJlXHUwOTNlXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTJjXHUwOTNlXHUwOTI2In0seyJuYW1lIjoiUGFsZ2hhciIsImxhYmVsIjoiUGFsZ2hhciAtIFx1MDkyYVx1MDkzZVx1MDkzMlx1MDkxOFx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IlBhcmJoYW5pIiwibGFiZWwiOiJQYXJiaGFuaSAtIFx1MDkyYVx1MDkzMFx1MDkyZFx1MDkyM1x1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlJhaWdhZCIsImxhYmVsIjoiUmFpZ2FkIC0gXHUwOTMwXHUwOTNlXHUwOTJmXHUwOTE3XHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiUmF0bmFnaXJpIiwibGFiZWwiOiJSYXRuYWdpcmkgLSBcdTA5MzBcdTA5MjRcdTA5NGRcdTA5MjhcdTA5M2VcdTA5MTdcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJTYW5nbGkiLCJsYWJlbCI6IlNhbmdsaSAtIFx1MDkzOFx1MDkzZVx1MDkwMlx1MDkxN1x1MDkzMlx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlNhdGFyYSIsImxhYmVsIjoiU2F0YXJhIC0gXHUwOTM4XHUwOTNlXHUwOTI0XHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiU2luZGh1ZHVyZyIsImxhYmVsIjoiU2luZGh1ZHVyZyAtIFx1MDkzOFx1MDkzZlx1MDkwMlx1MDkyN1x1MDk0MVx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkxNyJ9LHsibmFtZSI6IlNvbGFwdXIiLCJsYWJlbCI6IlNvbGFwdXIgLSBcdTA5MzhcdTA5NGJcdTA5MzJcdTA5M2VcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MzAifSx7Im5hbWUiOiJUaGFuZSIsImxhYmVsIjoiVGhhbmUgLSBcdTA5MjBcdTA5M2VcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJXYXJkaGEiLCJsYWJlbCI6IldhcmRoYSAtIFx1MDkzNVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkyN1x1MDkzZSJ9LHsibmFtZSI6Ildhc2hpbSIsImxhYmVsIjoiV2FzaGltIC0gXHUwOTM1XHUwOTNlXHUwOTM2XHUwOTNmXHUwOTJlIn0seyJuYW1lIjoiWWF2YXRtYWwiLCJsYWJlbCI6IllhdmF0bWFsIC0gXHUwOTJmXHUwOTM1XHUwOTI0XHUwOTJlXHUwOTNlXHUwOTMzIn1dfSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiI5MDgwIiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiNjI1MiIsImFjdGlvbnMiOiI5NSIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfOTY1MTcyIiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzk2NTE3MiIsImNvbm5lY3RfaGFzaCI6IjZkMTc0MGI3ZTQ2MmI2MTQwOGJjNmM5YTJkNmE4ZDAxIn0=

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *