या आहेत आमच्या आधुनिक नवदुर्गा

लक्ष्मी… अन्नपुर्णा… गृहलक्ष्मी… सरस्वती… दुर्गा… कालिका… चंडिका… अशा विविध रुपातील देवी  म्हणजेच आपल्या कुटुंबातील स्त्री

एक काळ होता महिलांना केवळ गृहीणी अशीच भुमिका निभवावी लागायची. अर्थात गृहीणी असणे देखील काही कमी जोखमीचे काम नव्हते. त्या त्या काळातील स्त्रियांनी त्यांच्या कडील त्या त्या जबाबदा-यांचे योग्य निर्वाहन केले आहेच. आख्खीच्या आख्खी नवी पिढी घडवण्याचे काम म्हणजे गृहीणी असणे होय. ते काही कमीपणाचे कधीच नव्हते. काळचक्र जसे फिरत आहे तस तसे जबाबदा-यांचे सामाजिक, कौटुंबिक जीवनातील जबाबदा-यांचे, कामांचे वर्गीकरण स्त्री-पुरुष असे न राहता ते गुणवत्तेच्या आधारावर होत असलेले आपण सध्या अनुभवतो आहोत. असे एक ही क्षेत्र नाही की ज्यामध्ये स्त्रियांनी आघाडी घेतलेली नाहीये. अगदी घरकाम पासुन ते देशाची संरक्षण मंत्री, वित्त मंत्री ते रिक्शा चालक पासुन ते अगदी लढाऊ विमानाची पायलट , अगदी शाळेतील शिक्षिकेपासुन ते देशाची राष्ट्रपती , अगदी एखादी चहाची टपरी चालवणारी महिला ते एखाद्या फॉर्च्युन ५०० कंपनीची संस्थापक अशा वेगवेगळ्या भुमिकांमध्ये स्रीला आपण आज पाहतो आहोत.

असे सगळे जरी होत असले तरी अजुनही बुरसटालेल्या विचारांच्या वृत्ती अजुनही समाजामध्ये आहेतच. अजुनही संघर्ष स्त्रीला करावा लागतोच. केवळ एक स्त्री आहे म्हणुन तिला कधीही कलती बाजु नको असते तर केवळ स्त्री आहे म्हणुन व्यावसायिक व्यासपीठावर तिला अवहेलना देखील नको असते. भारतात अजुनही स्त्री म्हणजे केवळ आणि केवळ दासी आहे असे मानणारे महाभाग आहेतच. मग ते पुरुष कधी कधी तिचे वडील असतील, भाऊ असतील किंवा पती देखील असु शकतात. स्त्री दासी आहे आणि स्त्री उपभोग्य आहे हा संस्कार हळु हळु पुसला जात जरी असला तरी तो अजुनही अधुन मधुन डोके वर काढतोच. अशा सगळ्या प्रतिकुलतेमध्ये सध्याची नारी, आधुनिक नारीने जे काही कर्तृत्व करुन दाखवले आहे ते खरोखरीच वाखाणण्यासारखेच आहे.

त्यामुळे याच स्त्रिया आहेत मझ्या मते ख-या दुर्गा. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला त्या त्यांच्या बहु-भुजांनी पराक्रम गाजवताना दिसताहेत. त्यांच्या मागे कमालीचे ताण-तणाव असतात. कमालीच्या डेड-लाईन्स असतात. कमालीची बंधने असतात. असे असुन देखील कमालीचे यश ही त्या मिळवितातच.

नव-याला सांभाळणे, मुलांना सांभाळणे, सासुसासरे, नातेवाईक, आलेगेलेल्यांचे सर्वकाही करणे. दररोज घरातील सर्व मंडळी झोपेतुन जागे होण्यापुर्वीच उठणे व रात्री सर्व झोपी गेल्यावरच झोपणे, सर्वांचे पोट भरले आहे की नाही याची खातरजमा करणे, केलेले अन्न इतरांना वाढणे आणि मग स्वतः खाणे, मुलांचे कपडे, बुट, टाय, बेल्ट, वह्या पुस्तके, कंपास, पेन्सिल, खोडरबर या सर्वांच्या जागा फक्त आणि फक्त स्त्रीलाच माहीत असतात. पुरुषाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला हे जमेलच असे नाही. जमले तर उत्तमच. पण स्त्री हे सर्व जे काही करते त्यामध्ये केवळ जबाबदारीचे निर्वाहनच असते असे नाही मंडळी. मायाळु असणे, काळजीवाहु असणे, सर्वांस जीव लावणे हा स्त्री मधील मुळ स्वभाव आहे. याला मातृशक्ति म्हणतात. आणि ही शक्ति निसर्गदत्त आहे. पुरुषांमध्येसुध्दा असे गुण असु शकतात. किंवा सरावाने, प्रयत्नने आणता येऊ शकतात. पण मायेची उब मात्र स्त्रीच्याच कुशीत असते.

माझ्या इतक्या वर्षांच्या आयुष्यात मला अनेक दुर्गा भेटल्या. एकीच्या पोटी मी जन्म घेतला. अनेक हालापेष्टा, कष्ट सहन करीत, परिस्थीतीशी दोन हात करीत, माझ्या वडीलांना योग्य साथ देत आमचे आयुष्य घडवणारी माझी आई ही माझ्यासाठी महादुर्गा आहे. बहीणी, मावश्या, आत्या, काकु, मैत्रिणी अशा अनेक रुपांनी ही दुर्गा अगदी आयुष्यभर, दररोज आपणास दर्शन देत असते. आपणास आनंदीत करीत असते. आपणास फळ देत असते. पण आपण कधी स्त्रियांकडे या दुर्गेच्या निवेषाने पाहतच नाही. आपण शोधत असतो मंदीर आणि मुर्त्यांमधील दुर्गा. मित्रांनो, दुर्गा साक्षात तुमच्या आमच्या सोबत राहते तुमच्या आमच्या वास्तुमध्ये घरामध्ये. तिचे दर्शन घ्या. तिला प्रसन्न करा. तिला हलके वाटेल असे काहीतरी करुन तिच्यावरील ताण-तणाव थोडा कमी करा.

माझ्या वैवाहिक जीवनात असलेली माझी दुर्गा म्हणजे माझी पत्नी पल्लवी. सर्व प्रापंचिक जबाबदा-या सांभाळुन ती व्यवसायामध्ये माझ्या खांद्याला खांदा लावुन काम करते. प्रसंगी माझ्या एक पाऊल पुढे देखील असते. जिथे मी कमी पडतो तिथे ती मला सावरुन घेते. जिथे मी चुकत असेल तिथे ती मला योग्य रस्ता दाखवते. आज आमच्या व्यवसायाचा जो काही पसारा वाढलाय त्यमध्ये सिंहाचा वाटा पल्लवीचा आहे.

आमच्या ऑरगनायझेन मध्ये पल्लवी सारख्याच तडफदार, कर्तृत्ववान स्त्रियांची कमी नाहीये. चला आज तुम्हाला आमच्या ऑरगनायझेन मधील या दुर्गांचे ओळख करुन देतो.

पल्लवी ठोंबरे

पल्लवी ठोंबरे

पल्लवी एका मध्यम वर्गीय सुखवस्तु कुटूंबात वाढलेली लाडाची लेक. लग्नानंतर सासरच्या दिमाखाला तिने आणखी जास्त सुंदर केले. आमच्या आयुष्यातील चढउतार आम्ही एकमेकांच्या साथीने पाहिले. त्यातल्यात पल्लवीची साथ माझ्या साठी खुपच मोलाची ठरली. आमच्या व्यवसायाची सुरुवात खरतर पल्लवीसाठी काहीतरी उद्योग म्हणुन झाली. मी या व्यवसायात एवढा गंभीर नव्हतोच कधी. पल्लवीला एक संधी मिळाली आणि तिने त्या संधीचे सोने केले. तिच्या पावलावर पाऊल ठेवुन मी देखील तिच्या सोबतच काम करायचे ठरवले. शुन्यातुन सुरु केलेला आमचा व्यवसाय आज एका वेगळ्याच ऊंचीवर तिने नेऊन ठेवलाय. ती ट्रेनिंग्स कंडक्ट करते. ती काऊंसेलिंग छान करते. ती फॉलोअप छान करते. ती एक चांगली टीम प्लेयर आहे. ती एक खुप चांगली मोटीव्हेटर आहे. प्रसंगी मला किंवा आमच्या ऑरगनायझेन मधील कुणाला आधाराची गरज असेल तर पल्लवी तातडीने हजर असते. आज तिच्यासारख्याच ५० पेक्षा जास्त स्त्रियांची ती प्रेरणा आहे.

स्मिता वैद्य

एकेकाळी आयटी संबधित क्षेत्रात मध्ये नोकरी करणारे, दोन मुलांची आई असणारी स्मिता एक हरहुन्नरी व्यवसायिक आहे. घर-प्रपंच सांभाळुन तिने मागील ४ वर्षांमध्ये व्यवसायामध्ये मोठी मजल मारली आहे. अमोल आणि स्मिता यांचा प्रवास देखील खुप प्रेरणा दायी आहे. त्यांच्या वाढत्या व्यवसायाचा अचंबित करणारा प्रवास वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

मुलीसोबत स्मिता वैद्य

ज्योति भोजने

अहमदनगर मधील ज्योति भोजने ही देखील एक नवदुर्गा आहे. खरतर शिक्षण फक्त १२ वी पर्यंत असुन देखील , ज्योतिने ज्या पध्दतीने व्यवसाय सांभाळला आहे आणि दिवसेंदिवस वाढवीत आहे , ते पाहुन तिच्यातील दुर्दम्य इच्छाशक्ति आपणास पहायला मिळते. शिक्षण हे फक्त आकडे आहेत आणि ज्ञान मेहनतीने मिळवता येते असे सिध्द करणारी ज्ञान ज्योति म्हणजेच ज्योति भोजने. पती विलास भोजने व ज्योति , हे दोघेही उत्तम व्यवसाय करीत आहेत व उत्तरोत्तर त्यांचा व्यवसाय वाढतच आहे.

परदेश दौ-यासाठी सज्ज असलेली ज्योति भोजने

निलम साठे – विटनोर

आमच्या ऑरगनायझेशन मधील सर्वात कमी वयाची पण सर्वात जास्त उमेद व अपार कष्ट करण्याची तयारी असणारी व तसे प्रत्यक्ष कष्ट करणारी निलम म्हणजे खरोखरी एक अनमोल रत्नच आहे. निलम शब्दाचा अर्थच रत्न असा आहे. केवळ एकाच वर्षात व्यवसायामध्ये प्रचंड मोठी झेप घेणारी निलम व प्रशांतची जोडी भारी आहे. एक स्त्री मग ती वयाने जास्त अस्सो वा कमी, ती एक मोठा ऊर्जा स्त्रोत असते व तीच जीवनाला दिशा देते. व एवढ्या कमी वयात जर कुणी असे कर्तृत्व करील तर त्यांचा भविष्य काळ नक्कीच सुवर्णकाळ असेल यात शंका नाही.

निलम आणि प्रशांत

गीता शिर्के

शाळेत असताना एखादा धडा देखील कधी न वाचलेली गीता सध्या मॅनेजमेंटचे धडे तिच्या असोसिएट्स देत असते. लौकिक शिक्षण नाही म्हणता येईल एवढे कमी असुन देखील गीता, या व्यवसायात आल्यानंतर अनेक पुस्तके वाचु लागली. केवळ वाचुनच थांबली नाही तर ती इतरांना देखील प्रशिक्षण देत असते. शेकडो लोकांना त्यांच्या आरोग्याचे ध्येय गाठण्यासाठी मदत करणारी गीता, एका सामान्य कुटूंबातुन आलेली, एक गृहीणी मात्र होती. पण सध्या ती एक यशस्वी उद्योजिका आहे. दोन मुले, नवरा, सासुसासरे, नातेवाईक असे सगळे सांभाळुन गीता तिचे नाव सार्थ ठरवित आहे.

गीता व गणेश शिर्के

मनिषा भोजने

शेतक-याची बायको, एका किशोरवयीन मुलाची आई आणि गृहीणी अशी ओळख असणारी मनिषा भोजने म्हणजे जिद्द, चिकाटी आणि कष्ट याचे मुर्तिमंत उदाहरण होय. अत्यल्प भांडवलामध्ये व्यसाय सुरु करुन मनिषाने, आजपर्यंत खुप मोठी मजल मारली आहे. एक स्त्री, एकटीच्या जीवावर एखादा व्यवसाय करु शकते व तोदेखील यशस्वी होऊ शकतो हे मनिषा कडे पाहुन समजते. वयाने व नात्याने लहान असणा-या तिच्या जावेकडुन या व्यवसायातील प्राथमिक धडे घेऊन काम करण्यास सुरुवात केलेल्या मनिषाच्या टीम मध्ये आज अनेक लोक आहेत. स्वावलंबन आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवुन काहीतरी करुन दाखवायची तिची जिद्द व तिला सलाम.

मनिषा भोजने – अहमदनगर

गुड्डी ठाकुर

म्हणतात ना दुर्दम्य इच्छा शक्ती असेल तर आकाश ठेंगणे पडते! अगदी तसेच आहे गुड्डी ठाकुर च्या विषयी. पुणे आणि महाराष्ट्रात आमच्या व्यवसायात भागीदार म्हणुन काम करणारे , आमच्या ऑरगनायझेशन मध्ये अनेक जण आहेत. पण महाराष्ट्राबाहेर, बिहार मध्ये वास्तव्यास असुन देखील, आमच्या पासुन, आमच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनापासुन दुर असुन सुद्धा गुड्डी ने खुप मोठे यश मिळविले आहे. तिच्याअंतर्गत आज बिहार मध्ये तीन फिटनेस क्लब्स आहेत. उत्तम पैसा आणि सन्मान कमावण्यात ती यशस्वी झालेली आहे व अजुनही तिला बरेच काही शिकायचे आहे, कमवायचे आहे.

गुड्डी ठाकुर, बिहार

मनिषा मालखेडे

मनिषा मालखेडे आपल्या पतीसह

एक सुशील पत्नी, सेवाव्रती सुन , दोन मुलांची आई असणारी मनिषा गृहीणी होती आणि आजही आहेच. पण मुले थोडी मोठी झाल्यावर काहीतरी करण्याच्या उमेदीने झपाटल्याने तिने, ब्युटीशियन होण्याचे ठरवले व त्याप्रमाणे प्रशिक्षण घेऊन, व्यवसाय सुर देखील केला. त्याच दरम्यान स्वतःचे वजन वाढल्याने तिने वजन कमी करण्यास सुरुवात केली. व आश्चर्यकारक रित्या स्वतःचे वजन लक्षणीय कमी केले. तिला हा व्यवसाय खुपच आवडला व तिने देखील फिटनेस कोच म्हणुन काम करण्याचे ठरवले. आज स्थिते अशी आहे की मनिषा च्या टीम मध्ये सात असोसिएट्स आहेत व अंतर्गत दोन फिटनेस स्टुडिओ आहेत. सामान्य गृहीणी ते बिजनेस लीडर असा तिचा प्रवास केवळ दोनच वर्षांचा आहे.

शीतल शिंदे

शीतल व प्रमोद शिंदे

एक सामान्य गृहिणी काय करु शकते हे पाहायचे असेल तर शीतल शिंदे या दुर्गेचा थक्क करणारा प्रवास समजुन घ्या. एक पदवीधर गृहिणी घर तर छान सांभाळतेच पण जर संधी मिळाली तर जग जिंकण्याची क्षमता देखील तिच्यामध्ये आहे हे सिध्द करुन देऊ शकते. माझ्या कडे या व्यवसायातील प्राथमिक धडे घेऊन शीतल ने आपल्या पतीच्या साथी व्यवसाय खुप चांगला केला आहे. आज एकुण १७ लोकांची टीम सांभाळणारी शीतल एक टीम लीडर झाली आहे. स्वतः कायम प्रेरीत राहुन, इतरांना प्रेरणा देण्याचे काम शीतल लीलया करते आहे.

आशा आहे तुम्हाला आमच्या या नवदुर्गां विषयी वाचुन काहीतरी प्रेरणा नक्कीच मिळाली असेल. प्रत्येक स्त्री मध्ये महादुर्गा , महाशक्ति विद्यमान आहे. स्त्री जगाचा इतिहास घडवु शकते. स्त्री जग बदलु शकते. स्त्री महान व्यावसायिक देखील होऊ शकते.

आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये अशा अनेक दुर्गा आहेत. इथे प्रातिनिधिक स्वरुपात नऊ जणींची थोडक्यात माहिती मी दिली आहे. यातील प्रत्येल स्त्री एक स्वतंत्र प्रेरणा स्त्रोत आहे. एक स्वतंत्र ऊर्जा आहे. एक स्वतंत्र यशोगाथा आहे.

आमच्या या नवदुर्गांना, माझा साष्टांग नमस्कार !

कळावे
आपलाच
महेश ठोंबरे – 9923062525

Business leader and motivator
I am a wellness coach. I help people with physical well-being. Continuous support, coaching and structured/proven approach is the key. You also can become a coach like me, its easy, trust me. To contact me please call – 9923062525
आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525
मी एक यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे कारण नक्की काय आहे, हेच मी “श्रीमंतीचा महामार्ग” या लेखमालेतुन लिहित आहे. तुम्हाला माझ्या सोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा, व्यवसाय, तोही कमीत कमी भांडवलामध्ये सुरु करायचा असेल व माझ्या सारखेच (किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त) यश मिळवायचे असेल तर मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiY2l0eSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiUHVuZSIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJzZWxlY3RsaXN0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsImxhYmVsX2RlbGltIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJpY29uX2NsYXNzIjoiIiwiaWNvbl9zaXplIjoiIiwiaWNvbl9jb2xvciI6IiIsInRlcm1zIjoiIiwib3B0aW9ucyI6W3sibmFtZSI6IlB1bmUiLCJsYWJlbCI6IlB1bmUgLSBcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJBaG1lZG5hZ2FyIiwibGFiZWwiOiJBaG1lZG5hZ2FyIC0gXHUwOTA1XHUwOTM5XHUwOTJlXHUwOTI2XHUwOTI4XHUwOTE3XHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiU2hpcmRpIiwibGFiZWwiOiJTaGlyZGkgLSBcdTA5MzZcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NGRcdTA5MjFcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJOYXNoaWsiLCJsYWJlbCI6Ik5hc2hpayAtIFx1MDkyOFx1MDkzZVx1MDkzNlx1MDkzZlx1MDkxNSJ9LHsibmFtZSI6IkF1cmFuZ2FiYWQiLCJsYWJlbCI6IkF1cmFuZ2FiYWQgLSBcdTA5MTRcdTA5MzBcdTA5MDJcdTA5MTdcdTA5M2VcdTA5MmNcdTA5M2VcdTA5MjYifSx7Im5hbWUiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIiwibGFiZWwiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIC0gXHUwOTM1XHUwOTIxXHUwOTE3XHUwOTNlXHUwOTM1IFx1MDkyZVx1MDkzZVx1MDkzNVx1MDkzMyJ9LHsibmFtZSI6IlRhbGVnYW9uIiwibGFiZWwiOiJUYWxlZ2FvbiAtIFx1MDkyNFx1MDkzM1x1MDk0N1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkxvbmF2bGEiLCJsYWJlbCI6IkxvbmF2bGEgLSBcdTA5MzJcdTA5NGJcdTA5MjNcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MzJcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJLaG9wb2xpIiwibGFiZWwiOiJLaG9wb2xpIC0gXHUwOTE2XHUwOTRiXHUwOTJhXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNmIn0seyJuYW1lIjoiRmFsdGFuIiwibGFiZWwiOiJQaGFsdGFuIC0gXHUwOTJiXHUwOTMyXHUwOTFmXHUwOTIzIn0seyJuYW1lIjoiQWtvbGEiLCJsYWJlbCI6IkFrb2xhIC0gXHUwOTA1XHUwOTE1XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQW1yYXZhdGkiLCJsYWJlbCI6IkFtcmF2YXRpLSBcdTA5MDVcdTA5MmVcdTA5MzBcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MjRcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJCZWVkIiwibGFiZWwiOiJCZWVkIC0gXHUwOTJjXHUwOTQwXHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiQmhhbmRhcmEiLCJsYWJlbCI6IkJoYW5kYXJhIC0gXHUwOTJkXHUwOTAyXHUwOTIxXHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQnVsZGhhbmEiLCJsYWJlbCI6IkJ1bGRoYW5hIC0gXHUwOTJjXHUwOTQxXHUwOTMyXHUwOTIyXHUwOTNlXHUwOTIzXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQ2hhbmRyYXB1ciIsImxhYmVsIjoiQ2hhbmRyYXB1ciAtIFx1MDkxYVx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0ZFx1MDkzMFx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IkRodWxlIiwibGFiZWwiOiJEaHVsZSAtIFx1MDkyN1x1MDk0MVx1MDkzM1x1MDk0NyJ9LHsibmFtZSI6IkdhZGNoaXJvbGkgIiwibGFiZWwiOiJHYWRjaGlyb2xpIC0gXHUwOTE3XHUwOTIxXHUwOTFhXHUwOTNmXHUwOTMwXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiR29uZGlhIiwibGFiZWwiOiJHb25kaWEgLSBcdTA5MTdcdTA5NGJcdTA5MDJcdTA5MjZcdTA5M2ZcdTA5MmZcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJIaW5nb2xpIiwibGFiZWwiOiJIaW5nb2xpIC0gXHUwOTM5XHUwOTNmXHUwOTAyXHUwOTE3XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiSmFsZ2FvbiIsImxhYmVsIjoiSmFsZ2FvbiAtIFx1MDkxY1x1MDkzM1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkphbG5hIiwibGFiZWwiOiJKYWxuYSAtIFx1MDkxY1x1MDkzZVx1MDkzMlx1MDkyOFx1MDkzZSJ9LHsibmFtZSI6IktvbGhhcHVyIiwibGFiZWwiOiJLb2xoYXB1ciAtIFx1MDkxNVx1MDk0Ylx1MDkzMlx1MDk0ZFx1MDkzOVx1MDkzZVx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IkxhdHVyIiwibGFiZWwiOiJMYXR1ciAtIFx1MDkzMlx1MDkzZVx1MDkyNFx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBDaXR5IiwibGFiZWwiOiJNdW1iYWkgQ2l0eSAtIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBTdWJ1cmJhbiIsImxhYmVsIjoiTXVtYmFpIFN1YnVyYmFuIC0gXHUwOTI4XHUwOTM1XHUwOTQwIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik5hZ3B1ciIsImxhYmVsIjoiTmFncHVyIC0gXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTE3XHUwOTJhXHUwOTQxXHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiTmFuZGVkIiwibGFiZWwiOiJOYW5kZWQgIC1cdTA5MjhcdTA5M2VcdTA5MDJcdTA5MjZcdTA5NDdcdTA5MjEifSx7Im5hbWUiOiJOYW5kdXJiYXIiLCJsYWJlbCI6Ik5hbmR1cmJhciAtIFx1MDkyOFx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDkyY1x1MDkzZVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik9zbWFuYWJhZCIsImxhYmVsIjoiT3NtYW5hYmFkIC0gXHUwOTA5XHUwOTM4XHUwOTRkXHUwOTJlXHUwOTNlXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTJjXHUwOTNlXHUwOTI2In0seyJuYW1lIjoiUGFsZ2hhciIsImxhYmVsIjoiUGFsZ2hhciAtIFx1MDkyYVx1MDkzZVx1MDkzMlx1MDkxOFx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IlBhcmJoYW5pIiwibGFiZWwiOiJQYXJiaGFuaSAtIFx1MDkyYVx1MDkzMFx1MDkyZFx1MDkyM1x1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlJhaWdhZCIsImxhYmVsIjoiUmFpZ2FkIC0gXHUwOTMwXHUwOTNlXHUwOTJmXHUwOTE3XHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiUmF0bmFnaXJpIiwibGFiZWwiOiJSYXRuYWdpcmkgLSBcdTA5MzBcdTA5MjRcdTA5NGRcdTA5MjhcdTA5M2VcdTA5MTdcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJTYW5nbGkiLCJsYWJlbCI6IlNhbmdsaSAtIFx1MDkzOFx1MDkzZVx1MDkwMlx1MDkxN1x1MDkzMlx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlNhdGFyYSIsImxhYmVsIjoiU2F0YXJhIC0gXHUwOTM4XHUwOTNlXHUwOTI0XHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiU2luZGh1ZHVyZyIsImxhYmVsIjoiU2luZGh1ZHVyZyAtIFx1MDkzOFx1MDkzZlx1MDkwMlx1MDkyN1x1MDk0MVx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkxNyJ9LHsibmFtZSI6IlNvbGFwdXIiLCJsYWJlbCI6IlNvbGFwdXIgLSBcdTA5MzhcdTA5NGJcdTA5MzJcdTA5M2VcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MzAifSx7Im5hbWUiOiJUaGFuZSIsImxhYmVsIjoiVGhhbmUgLSBcdTA5MjBcdTA5M2VcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJXYXJkaGEiLCJsYWJlbCI6IldhcmRoYSAtIFx1MDkzNVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkyN1x1MDkzZSJ9LHsibmFtZSI6Ildhc2hpbSIsImxhYmVsIjoiV2FzaGltIC0gXHUwOTM1XHUwOTNlXHUwOTM2XHUwOTNmXHUwOTJlIn0seyJuYW1lIjoiWWF2YXRtYWwiLCJsYWJlbCI6IllhdmF0bWFsIC0gXHUwOTJmXHUwOTM1XHUwOTI0XHUwOTJlXHUwOTNlXHUwOTMzIn1dfSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiI5MDgwIiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiNjI1MiIsImFjdGlvbnMiOiI5NSIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfMzA5NzgzIiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzMwOTc4MyIsImNvbm5lY3RfaGFzaCI6IjZkMTc0MGI3ZTQ2MmI2MTQwOGJjNmM5YTJkNmE4ZDAxIn0=

 

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *