Blog

Motivational Blogs

आर्थिक मंदी – नकारात्मकतेतुन सकारात्मकतेकडे कसे जाणार?

कोरोनाची महामारी, आर्थिक मंदी, कमालीचा नीचांकी गाठलेला जीडीपी, वाढती बेरोजगारी, बंद होणारे हजारो व्यवसाय अशा अनेक समस्यांनी सध्या व्यावसायिकांना ग्रासले आहे. आजारांशी संबधित क्षेत्रे म्हणजेच हॉस्पिटल्स , फार्मा व हेल्दकेअर संबंधित कंपन्या व व्यवसाय सोडले तर बाकी सगळेच अगदी हवालदिल झलेले आपण पाहतो आहोत. एकंदरीत परिस्थीती अशी आहे की कुणीही डिप्रेशन मध्ये गेल्यावाचुन राहणार नाही. नकारात्मकता आजुबाजूला इतकी जास्त वाढली आहे की आता पुढे कसे होणार, काय होणार याची कुणालाही काहीही कल्पनाच नाहीये. भविष्य अंधकारमय झाले आहे. इतक्या जास्त नकारात्मक परिस्थीतीचे परिणाम काय होत आहेत? मी या लेखात कोणतेही तत्वज्ञान सांगत नाहीये. मी आपणा सर्वांसमोर फॅक्ट्स मांडत आहे. या फॅक्ट्स...
Read More
career values Fitness coach in Pune Motivational Blogs

येऊ घातलेल्या महान संधी साठी तुम्ही तयार आहात?

किमान एक शतकापुर्वीचे गोष्ट आहे. लोकमान्य टिळकांची जेव्हा मॅट्रिक झाली तेव्हा त्यांनी लागलीच एक अख्खे वर्ष तालमीत व्यायाम करुन मल्ल-विद्येचे धडे घेण्यात घालवले. अनेकांना हे माहित नसेल पण हे खरे आहे. एक काळ होता जेव्हा आपल्या कडे फिटनेस हा शब्द देखील वापरात नव्हता. तेव्हा गावोगाव तसेच शहरांत देखील अनेक तालमीं असावयाच्या. प्रत्येक तालमीमध्ये शे-दोनशे तरुण कसरत करायचे. जोर बैठका, दुध-दुभते, तुप-लोणी असा आहार घराघरात पैलवानांना मिळायचा. एखादा मुलगा मॅट्रीक झाला की आवर्जुन घरातील मंडळी त्याला तालमीमध्ये काही महिन्यांसाठी पाठवायचीच. त्या काळात फिटनेस हे नुसतेच क्षेत्र होते, ते उद्योग क्षेत्र नव्हते. हे असे अगदी विसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत सुरु होते. मला आठवतय...
Read More
Motivational Blogs

श्रीमंतीचा महामार्ग  (भाग ९) – अंतर्मनातील विजयाचे चार शिलेदार

शिवाजी महाराजांनी इच्छा नसताना देखील केवळ जनतेच्या रक्षणाच्या हेतुने औरंगजेबाशी तह करण्याचा निर्णय घेतला. मिर्झा राजे जयसिंगांच्या मध्यस्थीने हा तह झाला खरा पण यामुळे महाराजांचे असलेले वर्चस्व काही अंशी का होईना कमी झालेच. महाराजांना बादशहाची चाकरी पत्करावी लागणे ह या तहाचाच एक भाग होता. औरंगजेबाच्या दरबारात महाराजांना जावे लागले. औरंगजेबासारख्या कपटी माणसावर विश्वास ठेवता येणार नाही हे जरी माहित असले तरी महाराजांना जाणे भाग होते. महाराज दरबारात गेले, दरबारात महाराजांचा अवमान झाला तरी त्यांनी औरंगजेबासारख्या अतिबलाढ्य बादशहास खडे बोल सुनावले होते.. महाराज दुःखी व्यथित झाले. आणि कपटाने बादशाह जे करील अशी शंका होती नेमके तेच झाले. शिवाजी महाराज , शंभु...
Read More
Fitness coach in Pune Motivational Blogs Performers

आशा पल्लवीत करणारी पल्लवी

आमच्या करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी आल्या की मन भरुन येते. मी राजकीय सन्यास घेतला होता, काही व्यवसाय बंद होते तर काही बंद पडण्याच्या वाटेवर होते. खुपच कमी वयात मिळालेले चटक्यांमुळे मी अकाली वृध्द झालो होतो. माझी ही अवस्था माझ्या शरीरावर देखील दिसत होती तसेच माझ्या स्वभावात देखील कमालीचा पोक्तपणा आला होता. अनुभवांनी माणुस शहाणा होतो व अपयशांनी समृध्द होतो असे म्हणतात खरे पण ते प्रत्येकाच्या बाबतीत लागु होते असे नाही. मला मात्र या संघर्षातुन काहीतरी शिकण्यासाठी खुप वेळ लागत होता, किंबहुना मी यातुन बाहेर कसा पडणार ही वेगळी चिंता मला आतुन पोखरत होती. त्या पडत्या काळात देखील मला कधीतरी पल्लवीविषयी...
Read More
Motivational Blogs

मरतुकडी म्हैस का मारली?

सामान्य लोकांच्या आयुष्यातील अडचणी सामान्य असतात, दुःखे सामान्य असतात तसेच त्यांना होणारा सुखाचा अनुभव देखील सामान्यच असतो. सा-या आयुष्यात तोच तो पणा असतो. त्यांची चाकोरी मर्यादीत असते. या चाकोरी मध्ये फिरते राहण्यासाठी जितकी ऊर्जा आवश्यक आहे तितकी कशी मिळवायची याची कला त्यांना अवगत असते. यासोबतच त्यांनी अजुन एक गोष्ट नकळत शिकलेली असते ती म्हणजे, जेवढी आवश्यक ऊर्जा आहे तेवढीच मिळवायची, कारण त्यांना कधीही चाकोरी सोडावी असे वाटतच नाही. त्याच चाकोरी मध्ये त्यांना सतत भ्रमण करायचे असल्याने त्यांस कधीही अधिकच्या ऊर्जेची आवश्यकता देखील नसते. त्यामुळे त्या चाकोरीच्या बाहेरील जग कसे आहे, त्यातील समस्या, अडचणी, आव्हाने, व्याप्ती किती आहे याचा तसुभरही अंदाज...
Read More
Motivational Blogs

स्वप्न ते ध्येयपुर्ती – नक्की कसे?

कोविड-१९ च्या संकटाने सपुंर्ण जगाला ग्रासले असताना, आपणा सर्वांच्याच पुढे आता अनेक प्रश्न आ वासुन उभे आहेत. जग पुर्वीसारखे कधी होईल? जगाची बिघडलेली आर्थिक घडी कधी पुर्ववत होईल? जगाचे काय व्हायचे ते होऊ द्या पण आपणा सर्वांनाच जास्त काळजी आहे की आपली स्वतःची आर्थिक घडी कधी पुर्वपदावर येईल? आजही अनेक व्यावसायिक कोरोनामुळे व्यवसाय पुन्हा सुरु करु शकत नाहीत. यात प्रामुख्याने जिम, हॉटेल्स, रीसॉर्ट्स,खासगी शाळा, स्पोर्ट्स कोचिंग सेंटर्स, खासगी शिकवण्या, सलुन, ब्युटी पार्लर इत्यादींचा समावेश आहे. हे असे व्यावसायिक आहेत की ज्यांची समाजाला ख-या अर्थाने गरज आहे तरी देखील यांना व्यवसाय सुरु करता येत नाहीत. त्यांच्या पुढे व्यवसाय कसा सांभाळावा, कामगार,...
Read More
Motivational Blogs

स्वप्न ते ध्येयपुर्ती – ध्येय

जोआन रोव्लिंग या लेखिकेच्या अदभुत प्रवासाविषयी आपण मागील लेखामध्ये थोडक्यात पाहिले. ज्याप्रमाणे आपल्या सर्वांच्याच आयुष्यात संकटे येतात तशी संकटे तिच्या आयुष्यात देखील आलीच. सामान्य माणसे आणि तिच्यासारखी माणसे यांच्यामध्ये मुलभुत फरक असतो तो म्हणजे उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्ने व ती स्वप्ने पुर्ण करण्यासाठी केलेली धडपड. जोआन रोव्लिंग हि लेखिका काय एकटीच असे उदाहरण आहे का बरे अशा माणसांचे की ज्यांनी प्रचंड विपरीत परिस्थीतीमध्येसुध्दा आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला आणि ती स्वप्ने पुर्ण केली. तुम्हाला अशा अजुन जास्त व्यक्तिमत्वांची माहीती करुन घ्यायची असेल तर आमचा श्रीमंतीचा महामार्ग – १ हा लेख अवश्य वाचा याच वेबसाईट वरील. या लेखमालेतील पहिला भाग तुम्ही अद्याप...
Read More
Motivational Blogs

स्वप्ने पाहिलीच नाही तर ?……..

एकदा उशिरा सुटलेल्या ट्रेन प्रवास करताना, झालेल्या उशिरामुळे व उगाचच मनात आलेल्या कल्पनांना नकळत कागदावर उतरवले तिने. तो कागद तरी काय तर चक्क पेपर नॅपकिन होते. तिने कागदावर मांडलेली कल्पना व व्यक्तिरेखा स्वतः तिला स्वतःलाच खुप आवडले. पण एका पाठोपाठ आयुष्यात संकटांच्या मालिकाच सुरु झाल्या. आईचा मृत्यु, मुलाचा जन्म, जबाबदा-यांमध्ये वाढ, प्रचंड आर्थिक अडचणी, त्यातच भर म्हणुन वैवाहिक जीवनात देखील भुकंप झाला. पण तिने त्या ट्रेन मध्ये ज्या व्यक्तिरेखेला जन्म दिला होता ती अजुनही तिच्या मनात आणि त्याच नॅपकिन पेपरवर जतन झालेली होती. तिने त्या व्यक्तिरेखेला तिने आता अधिक खुलवण्याचे ठरवले. पानामागुन पाने लिहिली गेली. व्यक्तिरेखा खुलत गेली. तिला कल्पनाविलासाचे...
Read More
Motivational Blogs

स्वप्न ते ध्येयपुर्ती – स्वप्न

एक मोठा बिझनेसमन एकदा एका मस्त क्रुझ वर , आराम खुर्चीत बसुन, हातात मद्याचा प्याला घेऊन समुद्रामध्ये मावळणा-या सुर्याकडे पाहत असतो. त्याची नजर किना-यावर अगदी जास्तच आरामात बसलेल्या एका कोळ्याकडे जाते. बिझनेसमन ला त्या कोळ्याला भेटायची इच्छा अनावर होती. तो किनारा गाठतो कोळ्याकडे येतो. साधारण पणे पसतीशीतील त्या कोळ्याला इतक्या आरामात पाहुन बिझनेसमन त्याला प्रश्न विचारतो की तु कोण आहेस? काय करतोस? घरी कोणकोण आहे? वगेरे वगैरे.. कोळी त्याला सांगतो मी दररोज सकाळी थोडा वेळ मासे पकडतो, बाजारात नेऊन ते विकतो. घरी जाऊन मुलांसोबत खेळतो. दुपारचे जेवण करुन मस्तपैकी वामकुक्षी घेतो. संध्याकाळ झाली की रोज असाच समुद्र किना-यावर येऊन, मावळत्या...
Read More
Motivational Blogs

काबिल बनो, कामयाब अपने आप बन जाओगे – स्वप्नांना सत्यात उतरवणारे सुप्रिया व राहुल

“मला लहाणपणापासुनच काम, व्यवसाय करण्याची सवय होती. वडीलांचा केटरींग चा व्यवसाय आहे व रेस्टॉरंट सुध्दा आहे. त्यामुळे माझे व भावाचे लहानपण शाळा सुटल्यानंतर व सुटीच्या दिवशी वडीलांना मदत करण्यातच गेले”, हे सांगत होती सुप्रिया. सुप्रियाला लहानपणापासुनच कला क्षेत्राची जास्त ओढ होती. शाळेतुन विविध स्पर्धांमध्ये ती भाग घ्यायची. अभिनय, एकांकिका स्पर्धांमध्ये तिने राज्य स्तरापर्यंत झेप घेतली होती तर जिल्हा स्तरावर ती विजयी देखील झाली होती. या बालपणात अभिनयासोबत थोडे थोडे डान्स मध्ये देखील तिची रुची वाढु लागली. अभ्यास देखील सुरुच होता. अभ्यासामध्ये ती अजिबात कमी नव्हती. सुप्रियाने वडीलांना मदत करीत करीत स्वतःचे इंजिनियरींग पुर्ण केले. इंजिनियरींग पुर्ण झाल्यावर सर्वांना नोकरी, पुढचे...
Read More
Motivational Blogs

एक ॲथलेट विद्यार्थी जेव्हा फिटनेस कोच होतो …

सांगलीतील एका खेडेगावात, एका सामान्य कुटूंबामध्ये जन्मलेला ‘तो’. कसलीही ग्लॅमरस कौटुंबिक पार्श्वभुमी नसताना देखील तो स्वःतच्या मेहनत, जिद्दीच्या जोरावर, अनेक राज्य, राष्ट्रिय स्तरावरीर स्पर्धा जिंकुन, आज ऑलिंपिक, एशियन सारख्या आंतरराष्ट्रिय स्पर्धामद्ये खेळुन भारतासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न पाहतोय. ही गोष्ट प्रथम दर्शनी एखाद्या सिनेमाची पटकथाच वाटते आहे, बरोबर ना? पण ही कोणत्याही सिनेमाची कथा नाहीये मित्रांनो.  ही आहे सत्यकथा अमित भडकमकर नावाच्या एका भयंकर आत्मविश्वासु, कष्टाळु अशा सांगलीतील बांबवडे या गावातील युवकाची. एकदा शाळेमध्ये सहज म्ह्णुन धावण्याच्या एका स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतला व त्यात त्याचा प्रथम क्रमांक आला. आपल्या बाबतीत ही असे घडले असेलच. मी देखील शाळेत असताना विविध स्पर्धांमध्ये भाग...
Read More
Motivational Blogs

फिटनेस कोच = येत्या काळात सर्वाधिक महत्वाचा ठरणारा पेशा

फिटनेस कोच म्हणजे कोण? समाजाला खरेच फिटनेस कोच सारख्या तज्ञांची गरज असते का? फिटनेस कोच बनणे हे एक यशस्वी करीयर होऊ शकते का? वयाच्या कोणत्या टप्प्यात फिटनेस कोच बनता येईल? या करीयरचा ग्राफ नक्की कसा असतो? काय यामध्ये उत्पन्नाच्या संधी आहेत का? असतील तर किती? असे अनेक प्रयत्न मला बरेच जण विचारतात. हे प्रश्न विचारताना अनेकांना यातुन केवळ करीयर संदर्भातच माहिती हवी असते. तर अगदी क्वचितच लोक असतात, की जे या पेशाच्या (पैशाच्या असे वाचु नका कृपया) महानतेमुळे याकडे आकर्षित होत असतात. अनेक यशस्वी फिटनेस कोच लोकांना प्रत्यक्ष भेटलो आहे, त्यांना फॉलो करतो, त्यांच्या कडुन शिकण्याचा प्रयत्न करत असतो. यातील...
Read More
Motivational Blogs

असे झाले रॉबर्ट कायोसाकी मल्टीमिलेनीयर…

नमस्कार मित्रांनो कोरोना जनित कोविड-१९ या साथीच्या आजाराच्या पार्श्वभुमिवर, आपण सारेच अजुनही आपापल्या घरातच आहोत. लॉकडाऊन ने हे सारे जग जणु थांबल्यासारखे झाले आहे. भविष्य कसे असेल? मार्केट कसे असेल? अर्थव्यवस्था कशी असेल? बाजारात तेजी असेल की मंदी असेल? रोजगारांची अवस्था कशी असेल? स्वयंरोजरागांची अवस्था कशी असेल? असे अनेक प्रश्न अनेकांसमोर आ वासुन उभे आहेत. कालच स्पाईस एयरवेज या विमान कंपनी ने दोन महिने कामगारांचे पगार केले नसल्याची बातमी देखील आपण पाहिली. अजुन काही बातम्या तर काही अफवा आपल्या मनात अधिकच संभ्रम निर्माण करीत आहेत. या सा-या संभ्रमात आपण नक्की कसे रहायला हवे? आपली मनोभुमिका कशी हवी? आपली स्वतःची आर्थिक...
Read More
Motivational Blogs

जरा विसावु या वळणावर

बघता बघता आणखी एक वर्ष सरले. आमच्या सहजीवनाला काल म्हणजे २३ एप्रिल या दिवशी बरोब्बर १२ वर्षे पुर्ण झाली. प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी काही वळणे येत असतात की जिथे थोडा वेळ थांबुन जर मागे पाहिले तर आपणास आपल्या आयुष्यातील, भुतकाळातील आठवणी, जीवनप्रवास, संघर्ष अशा सर्वांकडे पाहुन क्षणभर का होईना स्वःतच स्वःत कडे पाहुन स्मित हास्य करावेसे वाटते.   २३ एप्रिल २०१९ ला लग्नाचा वाढदिवस साजरा करताना आम्ही दोघे. नुकताच साज-या केलेल्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाने मला पुन्हा एकदा मागे वळुन बघण्याची संधी दिली. मला पल्लवी च्या साथीने, एकमेकांच्या सोबतीत घालविलेले, घालवित असलेले सगळे कटु-गोड प्रसंग आठवतात. माझ्या करीयरची सुरुवातीची वर्षे म्हणजे लग्नाच्या...
Read More
Motivational Blogs

श्रीमंतीचा महामार्ग  (भाग ८) – पॉझ बटण

श्रीमंतीचा महामार्ग अशा शीर्षकाने या लेखांचे लिखाण मी करीत आहे. त्यामुळे माझ्या लेखणाचा मुख्य हेतु हाच आहे की आपल्यापैकी प्रत्येकास ऐश्वर्य, समृध्दी प्राप्त व्हावी. मी जसजसा या विषयाच्या खोलात जातो आहे तसतसे नवनवीन विचार, की जे तसे पाहता अगदी छोटे आहेत, अशा छोट-छोट्या गोष्टींचा आपल्या यश-अपयशावर कसा परिणाम होतो हे मला समजु लागले. या गोष्टी नवीन नाहीत पण आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, ज्याप्रकारे आपल्या सवयीचे गुलाम झालेलो आहोत, त्यामुळे आपण आपल्यातील मुलभूत प्रवृत्त्या विसरण्याच्या मार्गावर आहोत. होय मी अशा मुलभूत प्रवृत्त्यांविषयी बोलत आहे की ज्या अगदी आपल्या सर्वांमध्ये, कोणत्याही भेदभावाशिवाय, निसर्गाने मुक्तहस्ताने ठासुन भरलेल्या आहेत. होय या जगात एखादा माणुस...
Read More
Motivational Blogs

पैसा कमाविला’च’ पाहिजे, तोही अमर्याद!

लॉकडाऊन च्या दिवसांमध्ये घरी बसुन काय करायचे यावर मी आपल्याशी सविस्तर चर्चा केली आहेच. खरतर मी जे काही माझ्या विविध लेखांमध्ये लिहिले आहेत त्या गोष्टी केवळ लॉकडाऊन च्या दिवसांमध्येच करण्यासाठीच्या आहेत असे नाही मित्रांनो. या सा-या गोष्टी आपण निरंतर आपल्या जीवनशैलीचा भाग बनविल्या पाहिजेत. मनुष्याच्या सर्वांगिण विकासासाठी हे खुपच महत्वाचे आहे. तर मित्रांनो मला नक्की सांगायचे आहे काय हे अजुन नीटसे स्पष्ट झाले नसावे असे मला वाटते. मी ह्या ब्लॉगच्या सुरुवातीला एक लेखमाल लिहिला होती. आर्थिक साक्षरते विषयी. या लेखमालेतील हा लेख (इथे क्लिक करा) . या मध्ये मी आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत भारतीय मानसिकता काय आहे यावर लिहिले आहे. तुम्ही...
Read More
Motivational Blogs

वयाच्या २०व्या वर्षीच कोट्याधीश होण्याचे स्वप्न पाहणारा सन्मित…

आमच्या टीमचा भाग झालेला प्रत्येकजण मुळातच यशस्वी असतो असे नाही. पण मुळातच त्यांच्या त्यांच्या व्यवसाय, उद्योगात यशस्वी असलेले व नवीन काहीतरी करण्याची उमेद आहे, शिकण्याची तयारी आहे, कष्ट करण्याची इच्छा आहे असे अनेक जण आमच्या कडे आले व यशस्वी झाले आहेत. यामध्ये डॉक्टर्स, जिम ओनर्स, जिम इंस्ट्रक्टर्स, शिक्षक, प्राध्यापक, इंजिनीयर्स, उद्योजक, गृहिणी आहेत. या सोबतच विद्यार्थी देखील आमच्या टीम मध्ये येत आहेत व ते त्यांच्या उज्वल भविष्याचा पाया भरीत आहेत. आज मी तुम्हाला ओळख करुन देणार आहे आमच्या टीम मधील वयाने सर्वात लहान अशा सन्मित ची. सन्मित जरी वयाने लहान असला तरी त्याची महत्वकांक्षा उच्च कोटीची आहे. त्याला वयाच्या २५...
Read More
Motivational Blogs

एल आय सी अजेंट जेव्हा फिटनेस कोच होतो तेव्हा…

मित्रांनो, आशा आहे तुम्ही सगळे घरात सुरक्षित असाल. कोरोना विषाणुच्या धास्तीने सा-या जगाला स्तब्ध केले आहे. हजारोंच्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत आहेत व लाखोंच्या संख्येने हा आजार एका माणसामधुन दुस-या माणसामध्ये पसरत आहे. हा संसर्गजन्य आजार आहे व अद्याप त्यावर इलाज किंवा प्रतिबंधात्मक लस शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले नाही. त्यामुळे सर्वत्रच चिंता आहे. मित्रांनो एवढ्या सगळ्या दुःखद बातम्यांमध्ये एक आनंदाची बातमी अशीही आहे की हा आजार स्वतःहुन तुमच्या घरी येत नाही. एकतर या आजाराला आणण्यासाठी तुम्ही घराबाहेर जाल तेव्हा किंवा तुमच्या घरातील सदस्यापेक्षा वेगळ्या व्यक्तिस तुम्ही स्वतःच्या घरात घ्याल तेव्हाच हा आजार तुमच्या घरात प्रवेश करील. त्यामुळे औषधाचा शोध लागेपर्यंत...
Read More
Motivational Blogs

कोरोना लॉकडाऊन मधील फिटनेस इंडस्ट्री..

कोरोना विषाणुच्या संसर्गाने होणा-या कोविड-१९ या आजाराने अवघे विश्व व्यापले आहे. आज जगात असे एकही क्षेत्र नाही की ज्यावर या साथीच्या आजाराचा विपरीत परीणाम झालेला नाही. वैद्यकिय, जीवनावश्यक सामाजिक सेवा व उत्पादने वगळता सगळे जग स्तब्ध झालेले आपण पाहत आहोत. जीवनावश्यक सेवा व उत्पादनांमध्ये देखील दळणवळणाच्या योग्य सुविधांसाठी अभावी अनेक उत्पादक, सेवा पुरवणारे, शेतकरी यांच्यावर देखील नामुष्की आलेली आपण पाहात आहोत. आपल्या सुदैवच म्हणावे की आज या संकटच्या काळात माणसामाणसामधील दुरावा प्रत्यक्ष जरी वाढलेला असला तरी माणुसकी मात्र अधिक ठळकपणे दिसत आहे. अनेक बड्या कंपन्या, उद्योगपती, सिने कलाकार, खेळाडु समाजाच्या अशा कठीण प्रसंगी समाजाला भरभरुन देत आहेत. यामुळे साहजिकच या...
Read More
Motivational Blogs

उभा देश झाला आता एक बंदीशाळा…

‘उभा देश झाला आता एक बंदिशाळा’ ही ओळ एका सुप्रसिध्द मराठी गाण्यातील आहे. हे गाणे मनुष्याला नवीन उमेद देण्याचे काम करते. कोणते आहे हे गाणे, माहीत आहे का तुम्हाला? उषःकाल होता होता काळरात्र झाली… हो, काळरात्रीच्या गर्भातच उषःकालाचे बीज असते. नव्या उमेदींचे बीज असते, नव्या संधीचे बीज असते. जग एका नवीन, अनोळखी उंबरठ्यावर येऊन थांबले आहे. हो चक्क थांबलेच आहे. आपण सगळे जण आपल्याच घरांत बंदी आहोत. उभा देश बंदीशाळा झाला आहे. आणि आता जगाने थांबणेच इष्ट आहे. कारण आपण आत्ता थांबलो नाही तर आपण मनुष्य जातीच्या इतिहासातील सर्वात मोठे मृत्युचे तांडव अनुभवु यात शंका कोणत्याही जाणत्या माणसाला अजिबात असु...
Read More
1 2 3 4

 

Facebook Comments