स्वप्ने पाहिलीच नाही तर ?……..

एकदा उशिरा सुटलेल्या ट्रेन प्रवास करताना, झालेल्या उशिरामुळे व उगाचच मनात आलेल्या कल्पनांना नकळत कागदावर उतरवले तिने. तो कागद तरी काय तर चक्क पेपर नॅपकिन होते. तिने कागदावर मांडलेली कल्पना व व्यक्तिरेखा स्वतः तिला स्वतःलाच खुप आवडले. पण एका पाठोपाठ आयुष्यात संकटांच्या मालिकाच सुरु झाल्या. आईचा मृत्यु, मुलाचा जन्म, जबाबदा-यांमध्ये वाढ, प्रचंड आर्थिक अडचणी, त्यातच भर म्हणुन वैवाहिक जीवनात देखील भुकंप झाला. पण तिने त्या ट्रेन मध्ये ज्या व्यक्तिरेखेला जन्म दिला होता ती अजुनही तिच्या मनात आणि त्याच नॅपकिन पेपरवर जतन झालेली होती.

तिने त्या व्यक्तिरेखेला तिने आता अधिक खुलवण्याचे ठरवले. पानामागुन पाने लिहिली गेली. व्यक्तिरेखा खुलत गेली. तिला कल्पनाविलासाचे नवनवीन धुमारे फुटले. या व्यक्तिरेखेने आणि तिच्या मनाने कल्पनाविलासातच आकाशाला गवसणी घातली. तिचे पुस्तक लिहुन झाले. तिला कधी झोपेत असताना पडलेल्या स्वप्नातही वाटले नव्हते की तिच्याकडुन एखादे पुस्तक लिहुन होईल. पण झाले लिहुन!

आता पुढचा प्रश्न होता कोण तिच्या या पुस्तकाला प्रकाशित करील? तिने एका प्रकाशकाकडे पुस्तक पाठवले. काही दिवसांतच तिला नकार आला. मग दुसरा नकार , मग तिसरा, चौथा, पाचवा असे चक्क दोन वर्षांत तिने केवळ फक्त आणि फक्त नकारच मिळवले. एवढे नकार मिळाल्यावर कुणीही काय करेल? विषय सोडुन देऊन, जे काही करीत आहे तेच करीत राहुन स्वप्न पाहणं सोडुन देईल, पाहिलेल्या स्वप्नांना सत्यात उतरवण सोडुन देईल. बरोबर ना?

पण तिने असे केले नाही. तिने लिहिणे अखंड सुरुच ठेवले. तिची दोन, तीन, चार अशी एका पाठोपाठ एक चक्क सहा पुस्तके लिहुन झाली. पण छापणारे मात्र मिळाले नाहीत. तिने नवनवीन प्रकाशक शोधले, आणखी जास्त नकार मिळवले. नकारांना देखील आता कंटाळा पण तिला कंटाळा आला नाही अपयशाचा. एका प्रकाशकाने एकदा होकार दिला.

तो होकार काय सहज मिळाला नव्हता मित्रांनो. कदाचित हा होकार तिला पहिल्याच वेळी मिळाला असता तर काय झाले असते?

जसे एक पुस्तक प्रकाशित झाले तसे दुसरे, मग तिसरे, अशी एका पाठोपाठ एक सहा पुस्तके प्रकाशित झाली. नुसतीच प्रकाशित नाही झाली तर ती सर्वाधिक लोकप्रिय देखील झाली. या पुस्तकांच्या सीरीज मुळे ती जगातील सर्वात श्रीमंत लेखिका म्हणुन नावारुपास आली. तिच्या पुस्तकांच्या सीरीजवर आधारीत अशी हॉलिवुड चित्रपटांची मालिका सुरु झाली. ती देखील जगभर लोकप्रिय झाली. तिची ही पुस्तकांची सीरीज म्हणजेच हॅरी पॉटर!

तिने या व्यक्तिरेखेचे स्वप्न पाहिलेच नसते तर काय हॅरी पॉटर जन्माला आला असता का?  अडचणींना घाबरुन, नकारांना घाबरुण तिने स्वप्न पाहणे सोडुन दिले असते तर काय ती जगातील सर्वात श्रीमंत लेखिका झाली असती का?

ती म्हणते ,”माणसाला हॅरी पॉटर सारख्या जादुची गरज नाहीये हे जग बदलण्यासाठी! हे जग बदलण्यासाठी आवश्यक असणा-या सगळ्या शक्ति आपल्याठाई उपजतच आहेत. आपणाकडे कल्पकता नावाची गोष्ट आहे की जी आपणास अधिक बलवान करते.

आपल्याकडे काय आहे आणि काय नाही; हे महत्वाचे नसुन आपण काय निवडतो यावरुन आपण काय होणार हे ठरते.”

त्यामुळे स्वप्न पहा मित्रांनो. पण ही स्वप्न उघड्या डोळ्यांनी पहा! ही स्वप्ने पुर्ण कशी करायची याविषयी जाणुन घेण्यासाठी वाचत रहा आमचे लेख.

#Dreamerstoachievers #ownbusiness #dreambig #dreamer #achiever

आपला

महेश ठोंबरे

Business leader

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *