एक ॲथलेट विद्यार्थी जेव्हा फिटनेस कोच होतो …

सांगलीतील एका खेडेगावात, एका सामान्य कुटूंबामध्ये जन्मलेला ‘तो’. कसलीही ग्लॅमरस कौटुंबिक पार्श्वभुमी नसताना देखील तो स्वःतच्या मेहनत, जिद्दीच्या जोरावर, अनेक राज्य, राष्ट्रिय स्तरावरीर स्पर्धा जिंकुन, आज ऑलिंपिक, एशियन सारख्या आंतरराष्ट्रिय स्पर्धामद्ये खेळुन भारतासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न पाहतोय.

ही गोष्ट प्रथम दर्शनी एखाद्या सिनेमाची पटकथाच वाटते आहे, बरोबर ना?

पण ही कोणत्याही सिनेमाची कथा नाहीये मित्रांनो.  ही आहे सत्यकथा अमित भडकमकर नावाच्या एका भयंकर आत्मविश्वासु, कष्टाळु अशा सांगलीतील बांबवडे या गावातील युवकाची.

एकदा शाळेमध्ये सहज म्ह्णुन धावण्याच्या एका स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतला व त्यात त्याचा प्रथम क्रमांक आला. आपल्या बाबतीत ही असे घडले असेलच. मी देखील शाळेत असताना विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला व काही स्पर्धांमध्ये यशस्वी सुध्दा झालो पण पुढच्या आयुष्यात माझ्या लक्षात देखील राहिल्या नाहीत त्या स्पर्धा व त्यातील यश. अमित मात्र त्याची ती स्पर्धा व त्यातील ते पहिले सुवर्णपदक विसरला नाही.

खेळात आवड जरी निर्माण झाली तरी त्याने शिक्षणाचा मार्ग सोडला नाही. इंजिनियरींग मध्ये डिल्पोमाला प्रवेश घेतला. रनिंग या खेळ प्रकारात आवड असल्याने स्वःतहुनच त्याने प्रॅक्टीस करण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागातुन असल्याने मुळातच या खेळातील अनेक तांत्रिक बाबी त्याला माहित देखील नव्हत्या आणि पुण्या सारख्या शहरात येईपर्यंत त्याला त्या समजल्या देखील नाहीत.

“ग्रामीण भागातील मुले व खेळातील संधी याविषयी अमित म्हणतो,”ग्रामीण भागात टॅलेंट जबरदस्त आहे. मुले मुळातच काटक असतात, मेहनती असतात. पण त्यांना योग्य मार्गदर्शन कधीच मिळत नाही. नुसते मार्गदर्शनच नाही तर त्या मुलांमधील ते कौशल्य कुण्या पारखी व्यक्तिने ओळखुन त्याला त्या खेळामध्ये प्रोत्साहन देखील मिळेल इतपत व्यवस्था देखील ग्रामीण भागात नाही. व असे होत असल्याने ग्रामीण भागातील हजारो मुले ज्यामध्ये क्षमता, कौशल्य, जिद्द असते ते कधीच खेळ-क्रिडा संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत”

अमितने ला ग्रामीण तसेच मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांच्या बाबतीत मांडलेले हे मत त्याच्या स्वःतच्या अनुभवातुन आलेले आहे.

कसलेही मार्गदर्शन, कोचिंग नसताना अमित ने सन २०१२ व २०१३ मध्ये इंटरइंजियनियरींग डिप्लोमा मीट या टेक्निकल बोर्डाच्या, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अनुक्रमे सिल्हर व ब्रॉंझ पदके मिळवली. एकलव्यासारखी त्याची क्रिडा-साधना सुरु होती.

पदविका पुर्ण केल्यावर मात्र त्याने निर्धारच केला की या खेळामध्ये पुढचे पाऊल टाकायचेच. पण सांगली-कोल्हापुर मध्ये त्याला पाहिजे तसे प्रशिक्षक मिळणार नव्हते म्हणुन त्याने पुणे शहरात यायचे ठरवले व त्याप्रमाणे तो पुण्यात दाखल झाला देखील. आता एकलव्यासारखे न राहता अर्जुन व्हायचे, योग्य मार्गदर्शन मिळवायचे, तांत्रिक बाबी समजुन घ्यायच्या, शिकायच्या असा निर्धार करुन पुण्यात आलेला अमित, पुण्यात मात्र थोडा बिचकला. याचे कारण होते पुण्यात राहणे-खाणे याचा खर्च कसा मिळवायचा. घरची आर्थिक परीस्थिती उत्तम आहेच. पण संस्कार ही सर्वोत्तम असल्याने अमित ने वडीलांकडुन शक्य तितकी कमी आर्थिक मदत घेऊन, किंवा अजिबात न घेऊन पुण्यात राहण्याचे ठरवले होते. पण पुण्यातील राहणीमानचा खर्च परवडण्यासारखा नव्हता. त्यामुळे आपल्या सत्यकथेतील नायकाने चक्क मॅक्डोनल्ड्स मध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याप्रमाणे सलग तीन वर्षे नोकरी करुन, इंजिनियरींगच्या पदवीचा अभ्यास करुन राहिलेल्या वेळामध्ये प्रॅक्टीस केली. पण अजुनही योग्य मार्गदर्शक-कोच मिळालेला नव्हता.

अशाचत त्याची भेट आदीनाथ नाईक या भन्नाट क्रिडा मार्गदर्शकाशी झाली. नाईक सरांना अमितचा स्वभाव व मेहनती बाणा खुप आवडला. नाईक सरांनी अमितला रनिंग मधील बारकाव्यांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. एकलव्याला आता द्रोणाचार्य मिळाला. मग काय अमित ने आपल्या ध्येयाशी एकनिष्ट राहुन जास्तीत जास्त वेळ खेळासाठी देण्यास सुरुवात केली. सोबत नोकरी व इंजिनियरींगचे शिक्षण सुरु होतेच.

एकेका स्पर्धेमध्ये भाग घेण्यास सुरुवात झाली. विविध पदके आता त्याच्या घराच्या भिंतीवर लटकावयास सुरुवात झाली.

ॲथेलेट ने त्याच्या त्याच्या खेळाची तयारी करताना कशी करावी या विषयी अमित सांगतो,

”भारतात मुळातच चपळ, काटक शरीरयष्टी असणारी मुले-मुली आहेत. खेळाची तयारी
करताना आपले खेळाडु अक्षरशः जीव ओतुन सराव करताना मी पाहिले आहे. शारीरीक
मेहनत, कष्ट हे गरजेचे आहेच त्यासोबतच आवश्यकता आहे योग्य तंत्र व पोषक आहाराची.
जे खेळाडु दिवसातील ४-५ तास ट्रेनिंग करतात त्यांच्या शरीराची झीज लवकर भरुन
येण्यासाठी व परफॉर्मन्स सुधारण्यासाठी योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स व प्रोटीन्स ची
गरज असते व नेमके भारतात याच गोष्टी मध्ये खेळाडु कमी पडतात. अपार कष्ट
करुन सराव करणा-या आपल्या मुला-मुलींना तंत्र व पोषण नेहमीच कमी पडते.”

२०१४ मध्ये आयोजित केलेल्या आयडीएसए गेम्स मध्ये, राज्य स्तरावर सुवर्णपदक मिळविले.

२०१७ मध्ये अमित ने आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केले. त्या वर्षी अश्वमेध गेम्स मध्ये देखील भाग घेऊन कौतुकास्पद कामगिरी केली.

२०१७ व २०१८ अशी सलग दोन वर्षे YCMOU विद्यापीठामध्ये सुवर्णपदक मिळविले. २०१६ मधील रुरल गेम्स मध्ये देखील सुवर्णपदक मिळविले.

सोबतच इतर डझन भर स्थानिक, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने अनेक पदके मिळविली आहेतच.

खेळाचे तंत्र अमित, नाईक सरांकडुन शिकला व अजुन ही शिकत आहे. सोबतच योग्य पोषण देखील खेळाडुंसाठी अतिमहत्वाचे असल्याचे समजल्याने त्याने माझ्याशी संपर्क साधला. त्याच्या एकुणच दिनचर्येमध्ये शारीरीक कष्ट खुपच जास्त होत असल्याने व त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्याची स्वप्ने पुर्ण करण्याच्या त्याच्या जिद्दीने त्याने माझ्याकडुन न्युट्रीशन सपोर्ट साठी मार्गदर्शन घेतले. या न्युट्रीशन सपोर्ट मुळे त्याला येणारा थकवा कमी झाला. मसल्सची झीज लवकर भरुन येते तसेच त्याच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली.

४०० मीटर स्प्रिंट मध्ये वेळेच्या बाबतीत सुधारणा करीत तो सध्या ४८ सेकंदात पुर्ण करतो. धावण्याच्या शर्यतीमध्ये एकेका सेकंदालाच नव्हे तर सेकंदाच्या एकेका भागाला (मिलीसेकंदाला) देखील खुप महत्व असते. त्यात एक दोन सेंकदांची सुधारणा आणण्यासाठी स्टॅमिना वाढणे व मसल्स ची झीज भरुन येणे महत्वाचे आहे.

अमितच्या यशाचे रहस्य त्याच्या मेहनतीसोबतच शिकण्याच्या त्याच्या वृतीमध्ये देखील दडलेले आहे. जिथे जिथे म्हणुन काही शिकता येईल तेथुन तो नवनवीन गोष्टी शिकत असतो.

आणि मागील काही वर्षांमध्ये अमित नुसताच शिकणारा राहिलेला नाही बर का! अमित स्वतः एक कोच व फिटनेस कोच म्हणुन काम करु लागला आहे. दररोज तो, पुणे शहरातील ५० मुला-मुलींना ॲथेलेटीक्स चे प्रशिक्षण देतो. सकाळी मोठ्यांसाठी फिटनेस बॅच घेतो.

अमित ने इंजिनियरींग पुर्ण केले आणि आता त्याचा पुढचा मैलाचा दगड आहे आशियन स्पर्धा व ऑलिंपिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करुन देशाला पदक मिळवुन द्यायचे.

अमित सारख्याला मैदानावर अथवा व्यायामशाळेत अधिकाधिक वेळ घालवावा लागतो. घाम,अ गाळावा लागतो जेणे करुन तो त्याचे ध्येय गाठेल. पण सामान्य माणसाला इतका वेळ व्यायामासाठी घालवणे गरजेचेही नसते व शक्य देखील नसते. कोणत्याही सामान्य माणसासाठी आरोग्याचा मंत्र अगदी सोपा आहे. तो  म्हणजे २० टक्के व्यायाम व ८० टक्के न्युट्रीशन. अमित मुळातच एक प्रभावशाली तरुण आहे, सोबतच फिटनेस कोच, स्पोर्ट्स कोच देखील आहे. त्यामुळेच अमित ने नुसते स्वतःपुरताच विचार न करता, स्वतःकडील कौशल्य व लोकांची गरज लक्षात घेऊन सामान्यांना फिटनेसचे धडे देण्यास सुरुवात केली. अमितच्या कामाचे परिणाम असे झाले की डझनभर लोकांनी पहिल्याच महिन्यामध्ये त्याच्या मार्गदर्शनासाठी वजन कमी केले.

यातुन अमितला नुसत उत्पन्नाच साधनच मिळाल अस नाही तर त्याच्या ऑलिंपिक जिंकण्याच्या स्वप्नाला जणु पंख मिळाल्यासारखे झाले. कारण त्याला माहित आहे ऑलिंपिक सारख्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी त्याच्याकडे चांगला फिटनेस हवा आहे, चांगली साधने हवी आहेत, चांगल्या संधी हव्या आहेत, चांगले कोचिंग त्याला स्वतःला देखील हवे आहे. व या सर्वांसाठी पैसा लागणार आहे. एकीकडे उच्च शिक्षण घेण्याचा विचार आहेच तर दुसरी कडे खेळामध्ये करीयर करण्याचे ध्येय आहे. अशात त्याला नऊ ते सहा अशी नोकरी करता येणार नाही याची जाणिव आहेच. उलट त्याला एकदोन अश्या संधी देखील आल्या नोकरीच्या पण त्याने त्या संधी सोडुन दिल्या व फिटनेस मध्येच करीयर करण्याचे ठरवुन एकीकडे स्वतःच्या खेळासाठी मेहनत तर दुसरीकडे इतरांना वजन कमी करण्यासाठी मदत करीत कायम स्वरुपी उत्पन्नाचे साधन निर्माण करीत आहे. त्याच्या या कामात तो यशस्वी देखील होतोय.

लॉकडाऊन च्या काळात देखील त्याला त्याच्या न्युट्रीशन कस्टमर्सनी न्युट्रीशन सपोर्ट ची मागणी केली. त्याला आशा आहे की लवकरच तो त्याच्या सर्व कस्टमर्सच्या मागण्या पुर्ण करील.

अमित म्हणतो की फिटनेस कोच म्हणुन काम करताना त्याला अमर्याद उत्पनाच्या संधी तर मिळाल्याच आहेत. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्याला मिळणारे व्यवसाय प्रशिक्षण की जे व्यक्तिमत्व विकासावरच अवलंबुन आहे. फिटनेस कोच म्हणुन काम करण्यासाठी कसल्याही ऑफीस, फॅक्टरी, वर्कशॉपची गरज नाही. व्यवसाय सुरु करण्यासाठी देखील भांडवल असलेच पाहीजे असेही नाही. त्यामुळे जे लोक आधीच फिटनेस कोच किंवा जिम मध्ये कोच आहेत, किंवा झुंबा कोच आहेत, क्रिडा शिक्षक . योगा शिक्षक आहेत अशांसाठी आमचा हा व्यवसाय खुपच चांगली संधी आहे असे अमित ला वाटते.

अमित च्या पुढच्या उज्वल वाटचालीस आम्हा ड्रीमर्स-टु-अचिव्हर्स टीम कडुन भरभरुन शुभेच्छा. त्याचे कष्ट व ईश्वराची कृपा दोहोंच्या योगाने आपल्या भारतासाठी आंतरराष्ट्रीत स्तरावर तो चमकदार कामगिरी करेल यात शंका नाहीये.

अमित लवकरच कोथरुड येथील थोरात उद्यान परिसरात, दररोज सकाळी फिटनेस कोचिंग सुरु करणार आहे. तुम्हाला जर त्याच्या मार्गदर्शनाखाली तंदुरुस्त व्हायचे असेल तर अवश्य त्याच्या फिटनेस कोचिंगचा फायदा तुम्ही करुन घ्या. सोबतच तुम्हाला जर अमितच्या तसेच आमच्या मार्गदर्शनाखाली एक प्रभावी फिटनेस कोच व्हायचे असेल तर अवश्य अमित अथवा माझ्याशी संपर्क साधा.

अमित चा मोबाईल नंबर – 90962 47296

कळावे

आपलाच

महेश ठोंबरे – 9923062525

Business leader and motivator

आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525

मी एक यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे कारण नक्की काय आहे, हेच मी “श्रीमंतीचा महामार्ग” या लेखमालेतुन लिहित आहे. तुम्हाला माझ्या सोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा, व्यवसाय, तोही कमीत कमी भांडवलामध्ये सुरु करायचा असेल व माझ्या सारखेच (किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त) यश मिळवायचे असेल तर मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiY2l0eSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiUHVuZSIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJzZWxlY3RsaXN0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsImxhYmVsX2RlbGltIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJpY29uX2NsYXNzIjoiIiwiaWNvbl9zaXplIjoiIiwiaWNvbl9jb2xvciI6IiIsInRlcm1zIjoiIiwib3B0aW9ucyI6W3sibmFtZSI6IlB1bmUiLCJsYWJlbCI6IlB1bmUgLSBcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJBaG1lZG5hZ2FyIiwibGFiZWwiOiJBaG1lZG5hZ2FyIC0gXHUwOTA1XHUwOTM5XHUwOTJlXHUwOTI2XHUwOTI4XHUwOTE3XHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiU2hpcmRpIiwibGFiZWwiOiJTaGlyZGkgLSBcdTA5MzZcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NGRcdTA5MjFcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJOYXNoaWsiLCJsYWJlbCI6Ik5hc2hpayAtIFx1MDkyOFx1MDkzZVx1MDkzNlx1MDkzZlx1MDkxNSJ9LHsibmFtZSI6IkF1cmFuZ2FiYWQiLCJsYWJlbCI6IkF1cmFuZ2FiYWQgLSBcdTA5MTRcdTA5MzBcdTA5MDJcdTA5MTdcdTA5M2VcdTA5MmNcdTA5M2VcdTA5MjYifSx7Im5hbWUiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIiwibGFiZWwiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIC0gXHUwOTM1XHUwOTIxXHUwOTE3XHUwOTNlXHUwOTM1IFx1MDkyZVx1MDkzZVx1MDkzNVx1MDkzMyJ9LHsibmFtZSI6IlRhbGVnYW9uIiwibGFiZWwiOiJUYWxlZ2FvbiAtIFx1MDkyNFx1MDkzM1x1MDk0N1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkxvbmF2bGEiLCJsYWJlbCI6IkxvbmF2bGEgLSBcdTA5MzJcdTA5NGJcdTA5MjNcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MzJcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJLaG9wb2xpIiwibGFiZWwiOiJLaG9wb2xpIC0gXHUwOTE2XHUwOTRiXHUwOTJhXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNmIn0seyJuYW1lIjoiRmFsdGFuIiwibGFiZWwiOiJQaGFsdGFuIC0gXHUwOTJiXHUwOTMyXHUwOTFmXHUwOTIzIn0seyJuYW1lIjoiQWtvbGEiLCJsYWJlbCI6IkFrb2xhIC0gXHUwOTA1XHUwOTE1XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQW1yYXZhdGkiLCJsYWJlbCI6IkFtcmF2YXRpLSBcdTA5MDVcdTA5MmVcdTA5MzBcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MjRcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJCZWVkIiwibGFiZWwiOiJCZWVkIC0gXHUwOTJjXHUwOTQwXHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiQmhhbmRhcmEiLCJsYWJlbCI6IkJoYW5kYXJhIC0gXHUwOTJkXHUwOTAyXHUwOTIxXHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQnVsZGhhbmEiLCJsYWJlbCI6IkJ1bGRoYW5hIC0gXHUwOTJjXHUwOTQxXHUwOTMyXHUwOTIyXHUwOTNlXHUwOTIzXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQ2hhbmRyYXB1ciIsImxhYmVsIjoiQ2hhbmRyYXB1ciAtIFx1MDkxYVx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0ZFx1MDkzMFx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IkRodWxlIiwibGFiZWwiOiJEaHVsZSAtIFx1MDkyN1x1MDk0MVx1MDkzM1x1MDk0NyJ9LHsibmFtZSI6IkdhZGNoaXJvbGkgIiwibGFiZWwiOiJHYWRjaGlyb2xpIC0gXHUwOTE3XHUwOTIxXHUwOTFhXHUwOTNmXHUwOTMwXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiR29uZGlhIiwibGFiZWwiOiJHb25kaWEgLSBcdTA5MTdcdTA5NGJcdTA5MDJcdTA5MjZcdTA5M2ZcdTA5MmZcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJIaW5nb2xpIiwibGFiZWwiOiJIaW5nb2xpIC0gXHUwOTM5XHUwOTNmXHUwOTAyXHUwOTE3XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiSmFsZ2FvbiIsImxhYmVsIjoiSmFsZ2FvbiAtIFx1MDkxY1x1MDkzM1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkphbG5hIiwibGFiZWwiOiJKYWxuYSAtIFx1MDkxY1x1MDkzZVx1MDkzMlx1MDkyOFx1MDkzZSJ9LHsibmFtZSI6IktvbGhhcHVyIiwibGFiZWwiOiJLb2xoYXB1ciAtIFx1MDkxNVx1MDk0Ylx1MDkzMlx1MDk0ZFx1MDkzOVx1MDkzZVx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IkxhdHVyIiwibGFiZWwiOiJMYXR1ciAtIFx1MDkzMlx1MDkzZVx1MDkyNFx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBDaXR5IiwibGFiZWwiOiJNdW1iYWkgQ2l0eSAtIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBTdWJ1cmJhbiIsImxhYmVsIjoiTXVtYmFpIFN1YnVyYmFuIC0gXHUwOTI4XHUwOTM1XHUwOTQwIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik5hZ3B1ciIsImxhYmVsIjoiTmFncHVyIC0gXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTE3XHUwOTJhXHUwOTQxXHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiTmFuZGVkIiwibGFiZWwiOiJOYW5kZWQgIC1cdTA5MjhcdTA5M2VcdTA5MDJcdTA5MjZcdTA5NDdcdTA5MjEifSx7Im5hbWUiOiJOYW5kdXJiYXIiLCJsYWJlbCI6Ik5hbmR1cmJhciAtIFx1MDkyOFx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDkyY1x1MDkzZVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik9zbWFuYWJhZCIsImxhYmVsIjoiT3NtYW5hYmFkIC0gXHUwOTA5XHUwOTM4XHUwOTRkXHUwOTJlXHUwOTNlXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTJjXHUwOTNlXHUwOTI2In0seyJuYW1lIjoiUGFsZ2hhciIsImxhYmVsIjoiUGFsZ2hhciAtIFx1MDkyYVx1MDkzZVx1MDkzMlx1MDkxOFx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IlBhcmJoYW5pIiwibGFiZWwiOiJQYXJiaGFuaSAtIFx1MDkyYVx1MDkzMFx1MDkyZFx1MDkyM1x1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlJhaWdhZCIsImxhYmVsIjoiUmFpZ2FkIC0gXHUwOTMwXHUwOTNlXHUwOTJmXHUwOTE3XHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiUmF0bmFnaXJpIiwibGFiZWwiOiJSYXRuYWdpcmkgLSBcdTA5MzBcdTA5MjRcdTA5NGRcdTA5MjhcdTA5M2VcdTA5MTdcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJTYW5nbGkiLCJsYWJlbCI6IlNhbmdsaSAtIFx1MDkzOFx1MDkzZVx1MDkwMlx1MDkxN1x1MDkzMlx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlNhdGFyYSIsImxhYmVsIjoiU2F0YXJhIC0gXHUwOTM4XHUwOTNlXHUwOTI0XHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiU2luZGh1ZHVyZyIsImxhYmVsIjoiU2luZGh1ZHVyZyAtIFx1MDkzOFx1MDkzZlx1MDkwMlx1MDkyN1x1MDk0MVx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkxNyJ9LHsibmFtZSI6IlNvbGFwdXIiLCJsYWJlbCI6IlNvbGFwdXIgLSBcdTA5MzhcdTA5NGJcdTA5MzJcdTA5M2VcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MzAifSx7Im5hbWUiOiJUaGFuZSIsImxhYmVsIjoiVGhhbmUgLSBcdTA5MjBcdTA5M2VcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJXYXJkaGEiLCJsYWJlbCI6IldhcmRoYSAtIFx1MDkzNVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkyN1x1MDkzZSJ9LHsibmFtZSI6Ildhc2hpbSIsImxhYmVsIjoiV2FzaGltIC0gXHUwOTM1XHUwOTNlXHUwOTM2XHUwOTNmXHUwOTJlIn0seyJuYW1lIjoiWWF2YXRtYWwiLCJsYWJlbCI6IllhdmF0bWFsIC0gXHUwOTJmXHUwOTM1XHUwOTI0XHUwOTJlXHUwOTNlXHUwOTMzIn1dfSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiI4NDMwIiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiNTgxOSIsImFjdGlvbnMiOiI5MSIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNjQyNzk0Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzY0Mjc5NCIsImNvbm5lY3RfaGFzaCI6ImE2Mjk2MjA0OWFlNDI0ZTZhMzEyYmIzNmZiY2ZmYWE2In0=

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *