व्यवसायाची चतुसुत्री   २ – मनी पावर (कॅपिटल पावर)

आपल्या कडे व्यवसाय सुरु करायचा म्हंटल्यावर सर्वात पहिला प्रश्न आ वासुन उभा राहतो तो म्हणजे भांडवल. एखाद्या कुटुंबामध्ये, पुढच्या पिढ्यांसाठी, शिक्षण व्यवसायासाठी जमा पुंजी असेल तर त्या कुटूंबातील तरुणांना भांडवल हा तसा फारसा मोठा प्रश्न नसतो. पण सामान्य मध्यमवर्गीय कुटूंबांतील तरुण-तरुणींना भांडवल हा प्रश्न नक्कीच सतावत असतो. याचे कारण व्यवसाय सुरू करताना भांडवल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. भांडवल कसे उभे करायचे याचा विचार करता करताच निम्म्याहुन अधिक लोकांचे स्वःतचा व्यवसाय करण्याचे स्वप्न भंगलेले असते. त्यातुन ही जर कोणी प्रत्यक्ष भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न करु लागलाच तर सरकारी चाल-ढकल, बाबु गिरी ला वैतागुन त्यातील ही अनेक जण व्यवसाय करण्याचे स्वप्न सोडुन देतात. आणि उरलेले जे भांडवल उभे करु शकतात ते भांडवल उभे करण्याच्या प्रक्रियेमुळे इतके बेजार झालेले असतात की त्यांना त्यांचा मुळ स्किलसेटचे विस्मरण झालेले असावे.

व्यवसाय करण्यासाठी खरच भांडवलाची गरज आहे का?

हो. कोणताही व्यवसाय असो त्या व्यवसायामध्ये भांडवल लागतेच. आपण आता हे पाहुयात की भांडवल लागते ते नेमके कशासाठी?

  • वर्कशॉप/फॅक्टरी/कार्यशाळा/विक्री केंद्र
  • ऑफीस/कार्यालय
  • प्रशिक्षण
  • मशिनरी
  • कच्चा माल
  • नियमित खर्च
  • विक्री व जाहिरात खर्च
  • ब्रॅंडींग खर्च
  • खेळते भांडवल कर्मचारी/कामगार पगार, मजुरी

ही अगदी थोडक्यात दिलेली यादी आहे. यापेक्षा आणखीही खुप जास्त गोष्टींसाठी, व्यवसाय सुरु करताना भांडवलाची आवश्यकता असते.

याचा अर्थ ज्यां होतकरु तरुणांकडे कौशल्य आहे, मोठे स्वप्न पाहण्याची व ते पुर्ण करण्याची क्षमता आहे काय अशा युवा वर्गाने भांडवल उभे राहत नाही म्हणुन व्यवसाय सुरु करुच नये का?

भांडवल नाही म्हणुन भारतातील कित्येक तरुण-तरुणी आपल्या स्वप्नांना तिलांजली देतात. व हे भारताच्या अभुद्यासाठी नक्कीच चांगले नाही.

त्यामुळे आज आपण कमीत कमी शब्दांमध्ये भांडवल या विषयावर माहिती घेणार आहोत, जेणेकरुन भांडवला अभावी कुणाचेही उद्योजक होण्याचे स्वप्न भंगले जाऊ नये.

भांडवल म्हणजे काय तर व्यवसायामध्ये खर्च करण्यासाठी रखुन ठेवलेला पैसा. हा पैसा जाणीवपुर्वक व्यवसायाच्या निर्मितीसाठीच खर्च झाला पाहिजे. आपल्या व्यवसायासाठी कुणाला कमी तर कुणाला जास्त भांडवल गरजेचे असते. पण भांडवल लागते नेमके कशासाठी? तर वर जी यादी दिली आहे त्या गोष्टींसाठीच भांडवलाची आवश्यकता असते, बरोबर ना?

मग काय आपण वरील यादीतील बहुतांश गोष्टी पैशांशिवाय (भांडवलाशिवाय), आपणास कशा वापरण्यासाठी व आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळवता येतील हे पाहिले पाहिजे.

आपल्या कडील मुलांमध्ये अगदी बालपणापासुनच व्यावसायिक दृष्टीकोणाचा अभाव असल्या कारणाने कोणता व्यवसाय करायचा हे ठरविण्यामध्येच त्यांचे निम्मे अधिक आयुष्य निघुन गेलेले असते. शालेय शिक्षणापासुनच या व अशा गोष्टींचा समावेश नसल्याने आपली अशी अवस्था होत असते.

त्यातही जर कुणी धाडस केलेच तर त्याला व्यवसाय कोणता करायचा या मुलभुत प्रश्नापासुन सुरुवात करावी लागते. व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल जसे गरजेचे आहे तसे व्यवसायाची निवड अचुक असणे देखील गरजेचे आहे. ८०% तरुणांची इथेच गफलत होते.

मागील लेखामध्ये सांगितल्या प्रमाणे व्यवसाय कशासाठी करायचा आहे हे नीट माहित नसल्याने अशी गफलत होत असते. मी पुन्हा एकदा सांगतो. व्यवसाय कशासाठी करायचा तर तो करायचा नफा मिळवण्यासाठी. व्यवसाय जर आवड आहे म्हणुन करणार असाल तर तुम्ही तुमचा छंद जोपासल्या सारखाच व्यवसाय कराल. त्यात नफा नाही होणार. त्यात तुम्हाला जास्तीत जास्त रोजगार आणि मानसिक समाधान मिळेल. पण तुम्ही जाणीवपुर्वक जर व्यवसाय नफा कमावण्यासाठी करणार असाल तर तुम्ही नफा कमाविणार हे नक्की समजा. पण दररोज तुम्हाला स्वःतला या मुलभुत तत्वाची आठवण करुन द्यावी लागेल.

त्यामुळे तुमचे ध्येय जर नफा कमावणे असेल तर तुम्ही भांडवला नाही असे म्हणुन थांबु शकत नाही. नफा म्हणजे नक्की काय? तर, गुंतवणुकी वर, श्रमावर विशिष्ट नफा कमावणे. म्हणजे एखादी वस्तु बाजारामध्ये १० रुपयांना मिळत असेल तर तुम्ही तीच वस्तु ५ रुपयांना मिळवुन, बाजारात १० रुपयांना विकली,. ही कला तुम्हाला जमली की तुम्ही व्यावसायिक झाले असे समजा. एवढे सोपे आहे.

व्यवसायाचे ध्येय नफा कमावणे हेच असेल तर तुम्ही खुप कमी पैशातुन देखील सुरु करु शकता तुमचा व्यवसाय व सातत्यपुर्ण, बुध्दीचातुर्याने मोठे उद्योजक होऊ शकता!

पण ती वस्तु नेमकी कोणती घ्यावी याचे भान असणे आवश्यक आहे. तर याचे उत्तर देखील अगदी सोपे आहे. अशाच वस्तु मध्ये आपण पैसे गुंतवले पाहिजे की ज्या वस्तु ला बाजारात मागणी आहे.

मग ती वस्तु असो किंवा सेवा असो. काहीही असो. बाजारात ज्या गोष्टीला मागणी आहे तिचा पुरवठा करता येणे म्हणजे यशस्वी उद्योजक होणे होय.

मग मला सांगा, व्यवसायाला सुरुवात करताना तुम्ही असा व्यवसाय निवडावा की ज्यामध्ये गुंतवणुक कमीत कमी असेल व अगदी छोट्या प्रमाणात सुरु करुन देखील तुम्ही नफा कमावणे अगदी पहिल्या दिवसापासुन सुरु करु शकाल.

त्यामुळे भांडवला अभावी व्यवसायिक होण्याचे स्वप्न तुटता आतातरी कामा नये. तुम्ही एखाद्या अशा एस्टॅबलिश्ड कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीने व्यवसायास सुरुवात करु शकता की जी कंपनी तुम्हाला वरील यादी मध्ये मांडलेल्या सर्वच्या सर्व गोष्टी, गरजा तुम्हाला वापरासाठी अगदी पहिल्या दिवसापासुन उपलब्ध करुन देईल. कोणता ही व्यवसाय करायचा असतो कशासाठी लक्षात आहे ना? तर नफा कमाविण्यासाठीच.

हा एक मार्ग झाला दुसरा मार्ग आहे, छोट्या स्वरुपात एखादे उत्पादन बाजारात आणणे. पण यात देखील स्पर्धा, व गुणवत्ता यांमुळे तुम्ही बाजारपेठेत टिकालच असे नक्की नसते. अशा कमी भांडवलातील व्यवसाय कोणकोणते असतात हे माहिती करुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

तुम्ही जे प्रॉडक्ट मार्केट मध्ये आणणार तशा प्रकारचे दुसरे प्रॉडक्ट मोठमोठ्या कंपन्या अल्प दरात व उत्तम दर्ज्याच्या देऊ शकते.

तिसरा पर्याय –  तुमचे प्रॉडक्ट किंवा सेवा जर अशी असेल की ते तुमच्या शिवाय अन्य कुणीही करुच शकणार नाही तर मात्र तुम्हाला कमी भांडवलामध्ये किंवा शुन्य भांडवलात एखादा व्यवसाय सुरु करता ही येईल व पुढे तो वाढवता देखील येईल. याचे एक अनोखे उदाहरण तुम्हाला इथे वाचायला मिळेल. सरोज नावाच्या या महिलेची ही यशोगाथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

वरील तीन पर्यायांपैकी कोणता तरी एक सोपा आहे व बाकीचे अवघड आहेत असे काहीही नाही. व्यवसाय म्हणजे नफा. तुम्हाला किती नफा कमवायचा आहे त्यानुसार तुम्ही तुमचा पर्याय निवडु शकता. लक्षात ठेवा, आज जगभरात जे म्हणुन उद्योग यशस्वी दिसत आहेत एकेकाळी ते देखील सुरु होताना छोटेच होते.

तुम्हाला जर खरच मार्केटच्या मागणीनुसार, गरजेनुसार व्यवसाय करायचा असेल, व वरील पैकी पहिला पर्याय जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधु शकता.

पण मित्रांनो, लक्षात ठेवा, भांडवल नाही म्हणुन व्यवसाय करता येत नाही असे म्हणणे म्हणजे केवळ एक पळवाट आहे. नाचता येईना अंगण वाकडे अशातला प्रकार आहे.

चला आपण नोकरी-चाकरी सोडुन, नोकरी देणारे, रोजगार निर्माण करणारे उद्योजक होऊयात.

धन्यवाद

आपला

महेश ठोंबरे – 9923062525

Business leader, Pune

माझ्या सोबत माझ्या मार्गदर्शनाखाली जर तुम्हाला उद्योजक व्हायचे असेल, स्वःतचा व्यवसाय करायचा असेल तर खालील फॉर्म भरुन माझ्या संपर्क साधा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiY2l0eSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiUHVuZSIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJzZWxlY3RsaXN0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsImxhYmVsX2RlbGltIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJpY29uX2NsYXNzIjoiIiwiaWNvbl9zaXplIjoiIiwiaWNvbl9jb2xvciI6IiIsInRlcm1zIjoiIiwib3B0aW9ucyI6W3sibmFtZSI6IlB1bmUiLCJsYWJlbCI6IlB1bmUgLSBcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJBaG1lZG5hZ2FyIiwibGFiZWwiOiJBaG1lZG5hZ2FyIC0gXHUwOTA1XHUwOTM5XHUwOTJlXHUwOTI2XHUwOTI4XHUwOTE3XHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiU2hpcmRpIiwibGFiZWwiOiJTaGlyZGkgLSBcdTA5MzZcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NGRcdTA5MjFcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJOYXNoaWsiLCJsYWJlbCI6Ik5hc2hpayAtIFx1MDkyOFx1MDkzZVx1MDkzNlx1MDkzZlx1MDkxNSJ9LHsibmFtZSI6IkF1cmFuZ2FiYWQiLCJsYWJlbCI6IkF1cmFuZ2FiYWQgLSBcdTA5MTRcdTA5MzBcdTA5MDJcdTA5MTdcdTA5M2VcdTA5MmNcdTA5M2VcdTA5MjYifSx7Im5hbWUiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIiwibGFiZWwiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIC0gXHUwOTM1XHUwOTIxXHUwOTE3XHUwOTNlXHUwOTM1IFx1MDkyZVx1MDkzZVx1MDkzNVx1MDkzMyJ9LHsibmFtZSI6IlRhbGVnYW9uIiwibGFiZWwiOiJUYWxlZ2FvbiAtIFx1MDkyNFx1MDkzM1x1MDk0N1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkxvbmF2bGEiLCJsYWJlbCI6IkxvbmF2bGEgLSBcdTA5MzJcdTA5NGJcdTA5MjNcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MzJcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJLaG9wb2xpIiwibGFiZWwiOiJLaG9wb2xpIC0gXHUwOTE2XHUwOTRiXHUwOTJhXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNmIn0seyJuYW1lIjoiRmFsdGFuIiwibGFiZWwiOiJQaGFsdGFuIC0gXHUwOTJiXHUwOTMyXHUwOTFmXHUwOTIzIn0seyJuYW1lIjoiQWtvbGEiLCJsYWJlbCI6IkFrb2xhIC0gXHUwOTA1XHUwOTE1XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQW1yYXZhdGkiLCJsYWJlbCI6IkFtcmF2YXRpLSBcdTA5MDVcdTA5MmVcdTA5MzBcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MjRcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJCZWVkIiwibGFiZWwiOiJCZWVkIC0gXHUwOTJjXHUwOTQwXHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiQmhhbmRhcmEiLCJsYWJlbCI6IkJoYW5kYXJhIC0gXHUwOTJkXHUwOTAyXHUwOTIxXHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQnVsZGhhbmEiLCJsYWJlbCI6IkJ1bGRoYW5hIC0gXHUwOTJjXHUwOTQxXHUwOTMyXHUwOTIyXHUwOTNlXHUwOTIzXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQ2hhbmRyYXB1ciIsImxhYmVsIjoiQ2hhbmRyYXB1ciAtIFx1MDkxYVx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0ZFx1MDkzMFx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IkRodWxlIiwibGFiZWwiOiJEaHVsZSAtIFx1MDkyN1x1MDk0MVx1MDkzM1x1MDk0NyJ9LHsibmFtZSI6IkdhZGNoaXJvbGkgIiwibGFiZWwiOiJHYWRjaGlyb2xpIC0gXHUwOTE3XHUwOTIxXHUwOTFhXHUwOTNmXHUwOTMwXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiR29uZGlhIiwibGFiZWwiOiJHb25kaWEgLSBcdTA5MTdcdTA5NGJcdTA5MDJcdTA5MjZcdTA5M2ZcdTA5MmZcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJIaW5nb2xpIiwibGFiZWwiOiJIaW5nb2xpIC0gXHUwOTM5XHUwOTNmXHUwOTAyXHUwOTE3XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiSmFsZ2FvbiIsImxhYmVsIjoiSmFsZ2FvbiAtIFx1MDkxY1x1MDkzM1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkphbG5hIiwibGFiZWwiOiJKYWxuYSAtIFx1MDkxY1x1MDkzZVx1MDkzMlx1MDkyOFx1MDkzZSJ9LHsibmFtZSI6IktvbGhhcHVyIiwibGFiZWwiOiJLb2xoYXB1ciAtIFx1MDkxNVx1MDk0Ylx1MDkzMlx1MDk0ZFx1MDkzOVx1MDkzZVx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IkxhdHVyIiwibGFiZWwiOiJMYXR1ciAtIFx1MDkzMlx1MDkzZVx1MDkyNFx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBDaXR5IiwibGFiZWwiOiJNdW1iYWkgQ2l0eSAtIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBTdWJ1cmJhbiIsImxhYmVsIjoiTXVtYmFpIFN1YnVyYmFuIC0gXHUwOTI4XHUwOTM1XHUwOTQwIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik5hZ3B1ciIsImxhYmVsIjoiTmFncHVyIC0gXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTE3XHUwOTJhXHUwOTQxXHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiTmFuZGVkIiwibGFiZWwiOiJOYW5kZWQgIC1cdTA5MjhcdTA5M2VcdTA5MDJcdTA5MjZcdTA5NDdcdTA5MjEifSx7Im5hbWUiOiJOYW5kdXJiYXIiLCJsYWJlbCI6Ik5hbmR1cmJhciAtIFx1MDkyOFx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDkyY1x1MDkzZVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik9zbWFuYWJhZCIsImxhYmVsIjoiT3NtYW5hYmFkIC0gXHUwOTA5XHUwOTM4XHUwOTRkXHUwOTJlXHUwOTNlXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTJjXHUwOTNlXHUwOTI2In0seyJuYW1lIjoiUGFsZ2hhciIsImxhYmVsIjoiUGFsZ2hhciAtIFx1MDkyYVx1MDkzZVx1MDkzMlx1MDkxOFx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IlBhcmJoYW5pIiwibGFiZWwiOiJQYXJiaGFuaSAtIFx1MDkyYVx1MDkzMFx1MDkyZFx1MDkyM1x1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlJhaWdhZCIsImxhYmVsIjoiUmFpZ2FkIC0gXHUwOTMwXHUwOTNlXHUwOTJmXHUwOTE3XHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiUmF0bmFnaXJpIiwibGFiZWwiOiJSYXRuYWdpcmkgLSBcdTA5MzBcdTA5MjRcdTA5NGRcdTA5MjhcdTA5M2VcdTA5MTdcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJTYW5nbGkiLCJsYWJlbCI6IlNhbmdsaSAtIFx1MDkzOFx1MDkzZVx1MDkwMlx1MDkxN1x1MDkzMlx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlNhdGFyYSIsImxhYmVsIjoiU2F0YXJhIC0gXHUwOTM4XHUwOTNlXHUwOTI0XHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiU2luZGh1ZHVyZyIsImxhYmVsIjoiU2luZGh1ZHVyZyAtIFx1MDkzOFx1MDkzZlx1MDkwMlx1MDkyN1x1MDk0MVx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkxNyJ9LHsibmFtZSI6IlNvbGFwdXIiLCJsYWJlbCI6IlNvbGFwdXIgLSBcdTA5MzhcdTA5NGJcdTA5MzJcdTA5M2VcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MzAifSx7Im5hbWUiOiJUaGFuZSIsImxhYmVsIjoiVGhhbmUgLSBcdTA5MjBcdTA5M2VcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJXYXJkaGEiLCJsYWJlbCI6IldhcmRoYSAtIFx1MDkzNVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkyN1x1MDkzZSJ9LHsibmFtZSI6Ildhc2hpbSIsImxhYmVsIjoiV2FzaGltIC0gXHUwOTM1XHUwOTNlXHUwOTM2XHUwOTNmXHUwOTJlIn0seyJuYW1lIjoiWWF2YXRtYWwiLCJsYWJlbCI6IllhdmF0bWFsIC0gXHUwOTJmXHUwOTM1XHUwOTI0XHUwOTJlXHUwOTNlXHUwOTMzIn1dfSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiI4NDMwIiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiNTgxOSIsImFjdGlvbnMiOiI5MSIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNDA4NjU4Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzQwODY1OCIsImNvbm5lY3RfaGFzaCI6ImE2Mjk2MjA0OWFlNDI0ZTZhMzEyYmIzNmZiY2ZmYWE2In0=

 

Facebook Comments

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *