श्रीमंतीचा महामार्ग -भाग २

श्रीमंत होणे, श्रीमंत राहणे कुणाला आवडणार नाही? अगदी सर्वांनाच आवडेल. श्रीमंत असणे म्हणजे नेमके काय तर आपण आपल्या मर्जीचे मालक असणे. आपणास जे काही हवे असेल ते मिळविण्याचे क्षमता आपणामध्ये निर्माण करणे. आपल्या उपलब्ध वेळेपैकी जास्तीत जास्त वेळ अशा कामामध्ये व गोष्टीमध्ये घालवण्याची आपली क्षमता म्हणजे श्रीमंती.

या श्रीमंती मध्ये पैसा हे फक्त एक माध्यम आहे. पैसा-अडका हे एक केवळ साधन आहे. पैसा हे साध्य नव्हे. व हे गुपित ज्यांना समजले त्यांच्या आयुष्याला दिशा मिळाली व त्यांचे आयुष्य जगातील लाखो करोडो लोकांसाठी आदर्श, अनुकरणीय होऊन जाते.

मागील लेखामध्ये म्हंटल्याप्रमाणे, श्रीमंत लोकांनी श्रीमंत होण्यासाठी म्हणुन काहीच केले नाही. तर त्यांनी जे काही केले त्यामुळे ते श्रीमंत झाले. त्यांनी मग नेमके काय केले बरे, की ज्यामुळे ते श्रीमंत झाले. चला आपण समजुन घेण्याचा प्रयत्न करुयात.

तुम्ही म्हणाल श्रीमंत होण्यासाठी काही करायचे नाही तर आपण श्रीमंत कसे होणार? आपल्या पुढे काहीतरी ध्येय तर हवे ना? आणि ध्येय नसेल तर आपण ते गाठु कसे शकणार? आपणास कुठे जायचे आहे हे माहित नसेल तर आपण तिथे पोहोचणार तरी कसे? आपण नुसतेच भटकत राहु असे ध्येयहिन, दिशाहिन! असेच तुम्हाला वाटले असेल, बरोबर ना?

मागील लेखातील सर्व उदाहरणे, सर्व श्रीमंत माणसांच्या बाबतीत आणखी एक सत्य मी उघड करतो. हे सत्य म्हणजेच ख-या अर्थाने त्यांच्या श्रीमंतीचे गुपित आहे. आणि हे गुपित आहे असे म्हणण्याचे कारण असे की आपल्या डोळ्यावर असलेल्या चुकीच्या पट्ट्यांमुळे, हे धडधडीत सत्य की जे उघड आहे ते आपणास कधी दिसतच नाही. आपण फक्त श्रीमंती पाहतो. मग काय पाहिले? काय आहे हे सत्य?

यशस्वी होण्याची सवय तुम्हाला श्रीमंत करते.

तुम्ही म्हणाल यशस्वी होण्याची सवय म्हणजे नेमके काय? आपणास जशा अनेकविध सवयी जडतात तशी यशस्वी होण्याची सवय आपणास जडली पाहिजे.

आपल्यापैकी अनेकांनी आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक वेळा यश संपादन केले असेल. तुमचा भुतकाळ आठवा. अगदी बालपणापासुन छोट्या छोट्या गोष्टी आठवा की ज्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात. मग ते यश चालायला शिकण्यापासुन, सायकल चालवण्यास शिकण्यापासुन ते अगदी शाळा , कॉलेजातील विविध परिक्षा, स्पर्धा यात मिळविलेले यशापर्यंत. तुमच्या पहिल्या नोकरीतील तुमची एखादी अचिव्हमेंट असेल किंवा तुमच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवसातील तुमचे एखादे यश असेल.

यश आपण सर्वांनीच चाखले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की आपल्यामध्ये आणि ‘त्या’ श्रीमंत लोकांमध्ये काय फरक आहे?

आपणास यश मिळते. व ‘त्या’ यशस्वी लोकांच्या बाबतीत हेच वाक्य काहीसे असे होईल.

हे लोक यश मिळवितात. व जेव्हा पाहिजे तेव्हा मिळवितात. यश मिळविणे हे त्यांच्या सवयीचे होऊन गेले आहे. यश ‘मिळेल’ म्हणुन ते काहीच करीत नाहीत. तर यश मिळवायचेच आहे म्हणुन ते सर्व काही करीत असतात. आणि हे लोक यश मिळवितात(च).

मला वाटते एव्हाना तुम्हाला समजले असेल मला काय म्हणायचे आहे. आता तुमचा पुढचा प्रश्न असेल ही सवय स्वतःला कशी लावुन घ्यायची.

हे समजण्यासाठी आपण आधी ‘सवय’ म्हणजे काय व ती कशी लागते, नवीन सवयी लावता येतात का? जुन्या, अनुपयोगी सवयी सोडता येतात का? हे सारे समजुन घेतले पाहिजे.

आपणाकडुन एखादे काम अगदी सहज घडुन येते, ते करण्यासाठी आपणास काही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत, ते काम आपल्या अंगवळणी पडलेले असते. आपल्या नकळत देखील हे काम आपोआप उत्तम होते. आपल्या नकळत, आपल्या अंतर्मनातुनच आपोआप आपण एखादे काम उत्तम करीत असु तर समजा ती आपली सवय आहे.

सवय ही अशी गोष्ट आहे की एकदा जडली की सुटता सुटत नाही. ते आपल्या अंगवळणी पडलेले असते.

तुम्हाला इंग्रजी मधील हा व्हिडीयो सवयींच्या बाबतीत खुप काही सांगेल अवश्य पहा.

आपणास अनेक सवयी असतात. काही चांगल्या तर काही वाईट. चांगले व वाईट हे सापेक्ष आहे. अर्थात सवयी अशा की ज्यामुळे तुम्ही एक चांगले माणुस बनता त्या सर्व सवयी, जास्तीत जास्त सवयी आपणास जड्ल्या पाहिजेत.

माझे स्वतःचेच एक उदाहरण देतो. साधारणपणे सहा वर्षापुर्वी मी एक अतिशय स्थुल, लठ्ठ, पोट सुटलेला एक व्यावसायिक व राजकारणी होतो. राजकारणातील अपयशामुळे मला व्यवसयातदेखील अपयश चाखावे लागले. आणि निराशेच्या गर्ते मध्ये मी अधिकच लठ्ठ झालो. माझे वजन प्रमाणापेक्षा खुपच जास्त वाढले. त्या काळात मी ज्या मानसिक, भावनिक दःखाचा अनुभव घेत होतो तो माझ्या आयुष्यातील सर्वात घाणेरडा अनिभव होता. काहीही करण्याची इच्छा नव्हती. जसा भुतकाळ अंधारात गेला होता तसेच भविष्यही अंधारात होते. पण त्याच खडतर काळात मला योग्य संगत लाभली. माझा हा ट्रान्सफॉर्मेशनचा काळ देखील एक लेखमालाच होऊ शकतो. या विषयी मी माझ्या आधीच्या लेखांमध्ये ही लिहिले आहेच. अवश्य वाचा माझे जुने लेख याच वेबसाईट वरील. आज मला माझ्या एका सवयी विषयी तुम्हाला सांगायचे आहे. यातुन तुम्ही हे शिकु शकता, की नवीन सवय कशी लावली जाऊ शकते. खुपच वजन वाढलेले असल्याने मला अगदी थोडे जरी चालले तरी दम लागायचा. धाप लागायची. पण पुढील सहाच महिन्यांच्या आतच मी चक्क मॅरेथॉन मध्ये न थांबता चक्क २१ किमी धावलो. मी हे करु शकलो ते केवळ मला जडलेल्या ‘दररोज धावण्याच्या’  सवयीमुळे. एखादा दिवस जर रनिंग नाही केले तर मला चुकल्यासारखे वाटायचे. रनिंग करणे माझ्या सवयीचे झाले होते. पण हे काही एका दिवसात झालेले नव्हते. त्यासाठी मला जाणीवपुर्वक, सातत्यपुर्ण प्रयत्न करावे लागले. हे प्रयत्न मला सुरुवातीचे काही दिवस करावे लागले. व मग मला लागली सवय.

तुम्ही सायकल चालवायला शिकलात तेव्हा तुम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टींकडे जाणिवपुर्वक लक्ष द्यावे लागायचे. पेडल मारणे, तोल सांभाळणे, रस्त्यातील वळणे व खड्ड्यांकडे लक्ष देणे, ब्रेक्स वर हात ठेवणे, आजुबाजुला लक्ष ठेवणे, मागुन येणा-या वाहनांचे आवाज ऐकणे, हॉर्न ऐकणे. आठवतय का तुम्हाला? हे सर्व तुम्ही अगदी जाणिवपुर्वक केले जेव्हा तुम्ही सायकल शिकलात तेव्हा. पण जेव्हा तुम्ही सायकल चालवणे खुप जास्त वेळा केले, तेव्हा मात्र  वरील सर्व गोष्टी आपोआप होत गेल्या. बरोबर ना? यालाच सवय म्हणतात.

सवय कशी लावता येऊ शकते यासाठी सविस्तर लेख मी पुढील काळात लिहिणार आहेच. तुर्त आपण आपल्या मुळ मुद्याकडे येऊ.

यश मिळविण्याची सवय.

यश मिळविणे सवयीचे होण्यासाठी, तुम्ही सतत यश मिळविले पाहिजे. व हे करण्यासाठी तुम्हाला वेगळे काहीच करण्याची गरज नाही. तुम्ही जे काही करीत आहात ते आधिक प्रभावीपणे, अचुकपणे, सटिकपणे करणे गरजेचे आहे.

अशी कोणतीही छोटी गोष्ट घ्या की जी तुम्हाला वाटते की तुम्हाला चांगले जमत नाही. ती गोष्ट व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. शोधा ती गोष्ट तुमच्या पेक्षा चांगली कोण करते. त्या व्यक्तिला पहा, त्याचे अनुकरण करा. तसेच करण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न सतत करा. इथपर्यंत करा की त्या गोष्टीची तुम्हाला सवय लागेल. अगदी बसावे कसे, चालावे कसे, उभे कसे रहावे, मृदभाषी कसे व्हावे, या गोष्टींपासुन सुरुवात करा. एकेक गोष्ट निवडा, त्यावर फोकस करा, ते कौशल्य आत्मसात करा. एकेक छोटे-छोटे यश मिळवा. अशा पध्दतीने तुम्हाला यश मिळवण्याच्या सवय लागेल.

माझ्या या क्षेत्रातील सुरुवातीच्या काही महिन्यामध्ये मला रोज जिंकण्याची सवय लागली. रोज सकाळी मी रनिंग करायचो. दररोज माझ्या समोर विशिष्ट किमी अंतर पळण्याचे ध्येय मी ठरवायचो. धावायचो. घामाघुम व्हायचो. आणि दररोज, रोजच्या रोज मी यशस्वी व्हायचो.

अशाच प्रकारे छोट्या-छोट्या आव्हानांतुन तुम्ही यश चाखायला सुरुवात करा. हे सर्व करताना मला एक गोष्ट समजली. हा सर्व संघर्ष जग जिंकण्यासाठी नाहीये. हा संघर्ष आहे स्वतःवर विजय मिळविण्यासाठी. स्वतःमधील सर्वोत्तम रोजच्या रोज बाहेर आणण्यासाठीचा हा संघर्ष आहे. आणि रोजच्या रोज तुम्हाला स्वतःवर च विजय मिळवायचा असतो.

त्यामुळे आज किमान एक गोष्ट समजुन घ्या. ती ही की, यश मिळेल म्ह्णुन काहीही करु नका. जाणिवपुर्वक यश मिळवायचेच आहे म्हणुन कार्यप्रवृत्त व्हा.

त्या श्रीमंत लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय आहे? आहे का लक्षात?

आपण यश मिळेल म्हणुन काम करतो तर ते लोक यश मिळवायचेच आहे म्हणुन काम करतात.

यश मिळविणे तुमच्या सवयीचे होण्यासाठी तुम्हाला रोज छोट्या-छोट्या बाबतीत यश मिळवावे लागेल. आणि या गोष्टी ज्यांना मी आता छोट्या छोट्या म्हणतोय त्यावर विजय मिळवला की तुम्हाला समजेल की खरतर या गोष्टी छोट्या छोट्या नाहीत.

विस्तार भयास्तव इथे विराम घेतो.

वाचीत रहा माझे हे लेख जे तुम्हाला श्रीमंतीच्या महामार्गावरुन जाण्यासाठी दिशादर्शकाचे करतील.

कळावे,

आपला

महेश ठोंबरे – 9923062525

Business leader and motivational speaker

माझ्यासोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय करण्यासाठी खालील फॉर्म भरुन माझ्याशी संपर्क साधा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiY2l0eSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiUHVuZSIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJzZWxlY3RsaXN0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsImxhYmVsX2RlbGltIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJpY29uX2NsYXNzIjoiIiwiaWNvbl9zaXplIjoiIiwiaWNvbl9jb2xvciI6IiIsInRlcm1zIjoiIiwib3B0aW9ucyI6W3sibmFtZSI6IlB1bmUiLCJsYWJlbCI6IlB1bmUgLSBcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJBaG1lZG5hZ2FyIiwibGFiZWwiOiJBaG1lZG5hZ2FyIC0gXHUwOTA1XHUwOTM5XHUwOTJlXHUwOTI2XHUwOTI4XHUwOTE3XHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiU2hpcmRpIiwibGFiZWwiOiJTaGlyZGkgLSBcdTA5MzZcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NGRcdTA5MjFcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJOYXNoaWsiLCJsYWJlbCI6Ik5hc2hpayAtIFx1MDkyOFx1MDkzZVx1MDkzNlx1MDkzZlx1MDkxNSJ9LHsibmFtZSI6IkF1cmFuZ2FiYWQiLCJsYWJlbCI6IkF1cmFuZ2FiYWQgLSBcdTA5MTRcdTA5MzBcdTA5MDJcdTA5MTdcdTA5M2VcdTA5MmNcdTA5M2VcdTA5MjYifSx7Im5hbWUiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIiwibGFiZWwiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIC0gXHUwOTM1XHUwOTIxXHUwOTE3XHUwOTNlXHUwOTM1IFx1MDkyZVx1MDkzZVx1MDkzNVx1MDkzMyJ9LHsibmFtZSI6IlRhbGVnYW9uIiwibGFiZWwiOiJUYWxlZ2FvbiAtIFx1MDkyNFx1MDkzM1x1MDk0N1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkxvbmF2bGEiLCJsYWJlbCI6IkxvbmF2bGEgLSBcdTA5MzJcdTA5NGJcdTA5MjNcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MzJcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJLaG9wb2xpIiwibGFiZWwiOiJLaG9wb2xpIC0gXHUwOTE2XHUwOTRiXHUwOTJhXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNmIn0seyJuYW1lIjoiRmFsdGFuIiwibGFiZWwiOiJQaGFsdGFuIC0gXHUwOTJiXHUwOTMyXHUwOTFmXHUwOTIzIn0seyJuYW1lIjoiQWtvbGEiLCJsYWJlbCI6IkFrb2xhIC0gXHUwOTA1XHUwOTE1XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQW1yYXZhdGkiLCJsYWJlbCI6IkFtcmF2YXRpLSBcdTA5MDVcdTA5MmVcdTA5MzBcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MjRcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJCZWVkIiwibGFiZWwiOiJCZWVkIC0gXHUwOTJjXHUwOTQwXHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiQmhhbmRhcmEiLCJsYWJlbCI6IkJoYW5kYXJhIC0gXHUwOTJkXHUwOTAyXHUwOTIxXHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQnVsZGhhbmEiLCJsYWJlbCI6IkJ1bGRoYW5hIC0gXHUwOTJjXHUwOTQxXHUwOTMyXHUwOTIyXHUwOTNlXHUwOTIzXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQ2hhbmRyYXB1ciIsImxhYmVsIjoiQ2hhbmRyYXB1ciAtIFx1MDkxYVx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0ZFx1MDkzMFx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IkRodWxlIiwibGFiZWwiOiJEaHVsZSAtIFx1MDkyN1x1MDk0MVx1MDkzM1x1MDk0NyJ9LHsibmFtZSI6IkdhZGNoaXJvbGkgIiwibGFiZWwiOiJHYWRjaGlyb2xpIC0gXHUwOTE3XHUwOTIxXHUwOTFhXHUwOTNmXHUwOTMwXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiR29uZGlhIiwibGFiZWwiOiJHb25kaWEgLSBcdTA5MTdcdTA5NGJcdTA5MDJcdTA5MjZcdTA5M2ZcdTA5MmZcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJIaW5nb2xpIiwibGFiZWwiOiJIaW5nb2xpIC0gXHUwOTM5XHUwOTNmXHUwOTAyXHUwOTE3XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiSmFsZ2FvbiIsImxhYmVsIjoiSmFsZ2FvbiAtIFx1MDkxY1x1MDkzM1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkphbG5hIiwibGFiZWwiOiJKYWxuYSAtIFx1MDkxY1x1MDkzZVx1MDkzMlx1MDkyOFx1MDkzZSJ9LHsibmFtZSI6IktvbGhhcHVyIiwibGFiZWwiOiJLb2xoYXB1ciAtIFx1MDkxNVx1MDk0Ylx1MDkzMlx1MDk0ZFx1MDkzOVx1MDkzZVx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IkxhdHVyIiwibGFiZWwiOiJMYXR1ciAtIFx1MDkzMlx1MDkzZVx1MDkyNFx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBDaXR5IiwibGFiZWwiOiJNdW1iYWkgQ2l0eSAtIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBTdWJ1cmJhbiIsImxhYmVsIjoiTXVtYmFpIFN1YnVyYmFuIC0gXHUwOTI4XHUwOTM1XHUwOTQwIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik5hZ3B1ciIsImxhYmVsIjoiTmFncHVyIC0gXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTE3XHUwOTJhXHUwOTQxXHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiTmFuZGVkIiwibGFiZWwiOiJOYW5kZWQgIC1cdTA5MjhcdTA5M2VcdTA5MDJcdTA5MjZcdTA5NDdcdTA5MjEifSx7Im5hbWUiOiJOYW5kdXJiYXIiLCJsYWJlbCI6Ik5hbmR1cmJhciAtIFx1MDkyOFx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDkyY1x1MDkzZVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik9zbWFuYWJhZCIsImxhYmVsIjoiT3NtYW5hYmFkIC0gXHUwOTA5XHUwOTM4XHUwOTRkXHUwOTJlXHUwOTNlXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTJjXHUwOTNlXHUwOTI2In0seyJuYW1lIjoiUGFsZ2hhciIsImxhYmVsIjoiUGFsZ2hhciAtIFx1MDkyYVx1MDkzZVx1MDkzMlx1MDkxOFx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IlBhcmJoYW5pIiwibGFiZWwiOiJQYXJiaGFuaSAtIFx1MDkyYVx1MDkzMFx1MDkyZFx1MDkyM1x1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlJhaWdhZCIsImxhYmVsIjoiUmFpZ2FkIC0gXHUwOTMwXHUwOTNlXHUwOTJmXHUwOTE3XHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiUmF0bmFnaXJpIiwibGFiZWwiOiJSYXRuYWdpcmkgLSBcdTA5MzBcdTA5MjRcdTA5NGRcdTA5MjhcdTA5M2VcdTA5MTdcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJTYW5nbGkiLCJsYWJlbCI6IlNhbmdsaSAtIFx1MDkzOFx1MDkzZVx1MDkwMlx1MDkxN1x1MDkzMlx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlNhdGFyYSIsImxhYmVsIjoiU2F0YXJhIC0gXHUwOTM4XHUwOTNlXHUwOTI0XHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiU2luZGh1ZHVyZyIsImxhYmVsIjoiU2luZGh1ZHVyZyAtIFx1MDkzOFx1MDkzZlx1MDkwMlx1MDkyN1x1MDk0MVx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkxNyJ9LHsibmFtZSI6IlNvbGFwdXIiLCJsYWJlbCI6IlNvbGFwdXIgLSBcdTA5MzhcdTA5NGJcdTA5MzJcdTA5M2VcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MzAifSx7Im5hbWUiOiJUaGFuZSIsImxhYmVsIjoiVGhhbmUgLSBcdTA5MjBcdTA5M2VcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJXYXJkaGEiLCJsYWJlbCI6IldhcmRoYSAtIFx1MDkzNVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkyN1x1MDkzZSJ9LHsibmFtZSI6Ildhc2hpbSIsImxhYmVsIjoiV2FzaGltIC0gXHUwOTM1XHUwOTNlXHUwOTM2XHUwOTNmXHUwOTJlIn0seyJuYW1lIjoiWWF2YXRtYWwiLCJsYWJlbCI6IllhdmF0bWFsIC0gXHUwOTJmXHUwOTM1XHUwOTI0XHUwOTJlXHUwOTNlXHUwOTMzIn1dfSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIxMTY0OSIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjgwNzkiLCJhY3Rpb25zIjoiMjA2Iiwic29ydF9vcmRlciI6IjEiLCJpc19wcm8iOiIwIiwiYWJfaWQiOiIwIiwiZGF0ZV9jcmVhdGVkIjoiMjAxNi0wNS0wMyAxNTowMTowMyIsImltZ19wcmV2aWV3X3VybCI6Imh0dHA6XC9cL3N1cHN5c3RpYy00MmQ3Lmt4Y2RuLmNvbVwvX2Fzc2V0c1wvZm9ybXNcL2ltZ1wvcHJldmlld1wvYmFzZS1jb250YWN0LmpwZyIsInZpZXdfaWQiOiIxMV83ODc2MjgiLCJ2aWV3X2h0bWxfaWQiOiJjc3BGb3JtU2hlbGxfMTFfNzg3NjI4IiwiY29ubmVjdF9oYXNoIjoiZmU3NmIzMmNkZWY4MmM4NjgyYWUxMDgyODc3OGJiZjcifQ==

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *