श्रीमंतीचा महामार्ग -भाग ३

मागील वर्षी एक सर्वेक्षण करण्यात आले जगभरात. हे सर्वेक्षण ऑक्सफॅम नावाच्या आर्थिक क्षेत्रात काम करणा-या एका संस्थेने केले. या सर्वेक्षणानुसार गेल्या वर्षी, दर दोन दिवसांमध्ये एक कोट्याधीश तयार झाल्याचे या संस्थेने प्रसिध्द केलेल्या अहवालात नमुद केले.

दर दोन दिवसांनी एक कोट्याधीश तयार होणे म्हणजे एखादा विनोद असल्यासारखे तुम्हाला वाटेल. पण हे खरे आहे. संपत्ती मध्ये सतत वाढ होत राहणे व एका विशिष्ट निकषानंतर किंवा बेंचमार्क नंतर त्या लोकांची गणना वरच्या श्रेणीमध्ये केली जाते.

हे काही दोनच दिवसांत होत असते का मित्रांनो. तर नाही.

माझ्या पहिल्या लेखामध्ये मी श्रीमंत, अतिश्रीमंत लोकांची काही उदाहरणे दिली आहेत. या लोकांसारखे श्रीमंत होण्यासाठी काय करावे लागते हे देखील थोडक्यात मी सांगितले होते. हे सांगताना सामान्य मध्यमवर्गीय माणुस आणि श्रीमंत माणुस या मधील मुख्य फरक मी सांगितला होता. आज आपण त्यावर खोलात जाऊन चर्चा करुयात.

श्रीमंत लोक श्रीमंत होण्यासाठी काहीही करीत नाहीत. तर ते जे काही करतात त्यामुळे ते श्रीमंत होतात.

श्रीमंत होणे हा केवळ एक बोनस आहे या मंडळीसाठी. सहज जाता जाता त्यांना हाती गवसलेले अभुषण म्हणजे श्रीमंती होय. मग यांना जायचे कुठे आहे? श्रीमंती हे ध्येय ठेवुन त्यांनी काहीच केले नाही. याउलट त्यांनी जे काही केले, करीत गेले त्यामुळे ते श्रीमंत झाले.

मग ते लोक असे वेगळे काय करतात की ज्यामुळे ते श्रीमंत झाले व आपण मात्र अजुनही संघर्षच करीत आहोत? तर मित्रांनो त्यांनी वेगळे काहीच केलेले नसते. आपण जे काही करीत असतो दररोज अगदी तेच या लोकांनी देखील केले, करीत असतात.

जसे आपणास दोन हात आहेत, तसेच त्यांना ही दोनच आहेत. व त्याच दोन हातांनी ते देखील काम करतात. आपणाकडे जसे २४ तास आत आहे दिवसाचे तसेच त्यांच्याकडेदेखील २४ च तास आहेत. देवाने किंवा दैवाने त्यांच्यावर वेगळी कृपा केलेली नाहीये. आपणास भुक लागते तशीच त्यांना ही लागतेच. सगळेच्या सगळे अगदी आपल्यासारखेच आहे. व आपण जशी कामे करतो पोट भरण्यासाठी तशीच कामे ते देखील करतात. मग फरक कशामध्ये आहे?

फरक आहे काम करण्याच्या पध्दतीमध्ये. काम करण्याच्या प्रेरणेमध्ये!

आपल्या प्रेरणा काय आहेत काम करण्याच्या जरा आठवुन पहा बरे! आपणास गाडीचे हफ्ते भरायचे आहे, फ्लॅट चे हफ्ते भरायचे आहेत, मुलांच्या शाळा-कॉलेजच्या फी भरायच्या आहेत. आणि आपणास पक्के ठाऊक झालेले आहे की आपण काम नाही केले की आपण हे सगळे खर्च करु शकणार नाही. त्यामुळे आपली काम करण्याची प्रेरणा खर्च भागवणे अशी आपल्या नकळतच होऊन जाते. यालाच आपल्याकडे पाट्या टाकण्याचे काम म्हणतात. नकळत आपण सगळेच फक्त आणि फक्त पाट्या टाकणारेच होऊन जातो.

तुम्ही म्हणाल की खर्च भागवणे ही प्रेरणा असण्यात काय गैर आहे? यात गैर काहीच नाही. पण ज्यांना आयुष्यामध्ये काहीतरी विशेष करायचे आहे, यशाची उत्तुंग शिखरे गाठायची आहेत, त्यांच्यासाठी अशी प्रेरणा म्हणजे हातातील बेडी होय. ही बेडी तुमच्या कडुन इतकेच काम करुन घेईल जितके तुमच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक आहे. तुम्हाला त्यापलीकडे पाहु देणार नाही. हा एक प्रकारचा पिंजरा आहे बर का! एक सोनेरी पिंजरा. गाडी आहे, फ्लॅट आहे, मुल शिकताहेत सगळ काही आहे ! सगळ छान आहे. पण सोनेरी असला तरी आहे हा पिंजराच. या पिंज-याच्या बाहेर एक अख्खे विश्व, की ज्याला मर्यादा, सीमा नाही, असे अफाट विश्व व अफाट संधी आपली वाट पाहत आहेत. पण या पिंज-यातुन बाहेर यायचे नेमके कसे?

श्रीमंत लोकांच्या (स्व-कष्टाने श्रीमंत झालेलेच बर का!)  कामाची काम करण्याची प्रेरणा सामान्यांपेक्षा वेगळी आहे. मी पहिल्याच लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे, असे लोक काम फक्त पदरी पडले आहे म्हणुन करीत नाहीत. तर ते सर्वोत्तम करायचे आहे म्हणुन करतात. आपले जे काही काम असेल ते आपण सर्वोत्तम करण्याचा सतत प्रयत्न करीत राहणे गरजेचे आहे. कदाचित तेच किंवा तशाच प्रकारचे काम अन्य कुणीतरी आपल्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे करीत असेल. तसेच अन्य कुणीतरी आपल्यापेक्षा कमी चांगले करीत असेल. पण यशस्वी माणसे स्वतच्या कामाचे मुल्यमापन करताना कधीच त्याची तुलना दुस-यासोबत करीत नाहीत. ते दुस-या सोबत स्पर्धा कधीच करीत नाहीत. त्यांची स्पर्धा असते स्वतःशीच. आपल्यातील सर्वोत्तम अभिव्यक्त करीत राहणे व सातत्याने करीत राहणे ही आहे त्यांच्या कामाची प्रेरणा. स्वतःशीच स्पर्धा करीत राहणे, हे आहे त्यांच्या यशाचे रहस्य.

आता पुढचा प्रश्न येतो की अशी प्रेरणा आपल्यामध्ये कशी काय आणता येईल. हे काय एखादे गाणे किंवा एखादा पाढा थोडीच आहे की जो पाठ केल्यावर काम झाले.

तुमची प्रेरणा म्हणजेच तुमचा ॲटीट्युड ,  ही काही बाहेरुन आत टाकता येणारी गोष्ट नाहीये. तुमच्या प्रेरणा बदलल्या, उच्च पातळीवर गेल्या की आपोआपच, फलश्रुती देखील तितक्याच उच्च पातळीवरील असते.

माझ्या ऑरगनायझेशन मधील एक उदाहरण देतो. मध्य शहरातील एक जोडप माझ्याशी, माझे ग्राहक म्हणुन जोडल गेल. त्यांचा आधीपासुनच बांधकाम व्यवसाय होता. त्या व्यवसायामध्ये त्यांना कामे मिळविणे, पुर्ण करणे, मोबदला मिळवणे असे नेहमीच करावे लागायचे. सर्वांना असेच करावे लागते. तरीही त्यांच्या आर्थिक अडचणी कधीही संपत नसायच्या. सतत चिंता दिसायची त्यांच्या चेह-यावर. व या चिंतेमुळे त्यांना आहे ते काम देखील नीट, व्यवस्थित करता यायचे नाही.परिणाम कामात चुका, पेनल्टी अशा व्हायचा.

मी त्यांना माझ्या ऑरगनायझेशन बद्दल माहिती सांगुन काम करण्याचा प्रस्ताव दिला. व हे सांगताना त्यांना एकच सांगितले की, तुम्ही पैसा कमाविण्यासाठी हे करुच नका. हे काम करताना पैसा तर मिळणार आहेच. पण तो अशाच लोकांना मिळतो ज्यांना हे काम (खरतर जगातील कोणतेही काम) खुप चांगले करता येते. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या कामामधील तज्ञ असणे आवश्यक आहे.त्यामुळे पार्टटाईम म्हणुन त्यांनी माझ्यासोबत काम करावयास सुरुवात केली. सुरुवातीच्याच सुचना त्यांनी नीटशा लक्षात ठेवल्यामुळे, व माझ्या सर्व ट्रेनिंग्जला हजर राहुन, शिकुन घेऊन सांगितल्या प्रमाणे सुचनांचे पालन केल्याने, या नवीन कामामध्ये त्यांचा सर्व फोकस फक्त गुणवत्ता सुधारणे, कौशल्ये शिकणे, कामगिरी सुधारत राहणे यावरच होता व अजुनही तसाच आहे. याचाच परिणाम मागील एकदिड वर्षात असा झालाय की, बांधकाम व्यवसाय हा त्यांचा आता पार्टटाईम व्यवसाय झालाय व अत्यंत आकर्षक उत्पन्न देणारा, माझा व्यवसाय हा त्यांचा मुख्य व्यवसाय झालेला आहे. आणि गमंत म्हणजे बांधकाम व्यवसायात देखील त्यांचा फोकस आता सर्वोत्तम कामगिरी हा झालेला आहे. त्यांच्या यशाचे रहस्य काय आहे? तर ॲटीट्युड! प्रेरणा!

त्यामुळे यशाच्या अतिउच्च शिखरावर जाण्यासाठी तुम्हाला कायमस्वरुपी हे लक्षात ठेवावे लागेल की तुमच्या काम करण्याच्या प्रेरणा देखील उच्चच हव्यात.

दर दोन दिवसाला एक कोट्याधीश तयार होतोय जगात, आणि असे कोट्याधीश घडत आहेत. त्यामुळे ‘मी कोट्याधीश होईल का?’ हा प्रश्न विचारणे बंद करा स्वतःला. इतर लोक कोट्याधीश होऊ शकतात तर तुम्ही का नाही होणार? होणार, १००% होणार.

आधीच प्रश्न विचारला आहे या लेखामध्येच, की या प्रेरणा आपण आपल्यामध्ये कशा आणु शकतो बरे? हे काम बिघडलेल्या मनाला घडवण्याचे आहे. हे काम हळुवार पणे करावयाचे आहे. आपल्या प्रेरणा इतक्या सहजासहजी बदलणे सोपे नाही. त्यासाठी आपणास जाणीवपुर्वक प्रयत्न करावे लागतील.

वाचत रहा, आणि अवश्य तुमचा अभिप्राय मल कळवा. यापुढील लेखांमध्ये आपण प्रत्यक्ष काय काय आणि कसे कसे केले पाहिजे या विषयी माहिती घेणार आहोत.

तुमचा अभिप्राय कळवा, शेयर, फॉरवर्ड करा.

कळावे

आपलाच

महेश ठोंबरे – 9923062525

Business leader and motivator

आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525

माझ्यासोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय करण्यासाठी खालील फॉर्म भरुन माझ्याशी संपर्क साधा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIzNjMzIiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiMjIxMCIsImFjdGlvbnMiOiI0OSIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfOTYxMTY4Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzk2MTE2OCIsImNvbm5lY3RfaGFzaCI6IjllODUxN2I1ZGFiOGI0NWEwNjI0MDFlMDVhYjA3NGQwIn0=

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *