श्रीमंतीचा महामार्ग -भाग ४

कधी कधी आपणास एक प्रश्न सतावतो. अगदी सर्वांनाच. किमान जे जे लोक प्रयत्नांची पराकाष्टा करतात, अगदी जिवाचे रान करतात, रात्र अन दिवस एक करतात आणि तरीही त्यांना अपेक्षित यश मिळत नाही, अशा लोकांना सतावणारा तो प्रश्न मलाही काही वर्षांपुर्वी सतावित होताच.

मी इतके कष्ट करुन देखील मला अपेक्षित यश का मिळत नाही? जेव्हा मी , त्या काळात माझी तुलना माझ्या अन्य मित्रांसोबात करायचो तेव्हा मला न्युनगंड यायचा. मी त्यांच्या इतका यशस्वी का होत नाहीये? कधी कधी तर मला असेही लोक दिसले अजुनही दिसत आहेत की ज्यांच्या कडे तेवढी योग्यता नसतानाही त्यांनी अमाप संपत्ती अवघ्या काही वर्षांतच कमावली. अशा वेळी न्युनगंड निर्माण होणे अगदी साहजिक आहे. मला देखील झाला आणि अनेकांना होतो.

अशी योग्यता नसलेली तरीही श्रीमंत झालेली माणसे आपल्या आसपास आपण पाहतोच आणि जागतिक स्तरावर देखील अशा व्यक्तिंची कमी नाहीये. अशा व्यक्तिंमध्ये आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे अवैध मार्गाने पैसा कमावुन श्रीमंत झालेले. अशा लोकांसाठी पैसा कमाविणे हेच आणि केवळ हेच एक उद्दीष्ट असते. मग येन केन प्रकारेन हे लोक त्यांचे ध्येय गाठतातच. त्यांच्यासाठी नैतिक, अनैतिक, वैध-अवैध असे फरक अजिबात नसतात. फक्त त्यांनी अवलंबलेला मार्ग सामाजिक, न्यायिक दृष्ट्या कसा योग्य व वैध आहे असे दाखवले की त्यांचे काम सहज होते.

आणखी एक प्रकार असतो झटपट श्रीमंत होणारांचा. या तिस-या प्रकारामध्ये लोकांना त्यांनी वापरलेला मार्ग वैध आहे असे दाखविण्याची देखील गरज भासत नाही. सरळ सरळ बेकायदेशीर व्यवहार, खंडण्या, चो-या, गुन्हे करणे हाच त्यांचा व्यवसाय होऊन जातो. आणि आपल्या समाजाचे दुर्दैव पहा अशा लोकांना देखील आपल्या समाज जीवनामध्ये उंच मान करुन चालता येतेच. आणि जर कुणी यांना विरोध केलाच तर त्यांचा विरोध मोडुन काढुन, तो ही धाकदपटशा, हे लोक त्यांचे गैरओरकार सुरुच ठेवतात.

आणि चौथा प्रकार आहे स्वतःच्या हिम्मतीवर, कष्टावर, सगळ्या विपरीत परीस्थितीमधुन मार्ग काढीत सचोटीने काम करुन पैसा कमावणारे. या प्रकारच्या लोकांना सामाजिक आर्थिक न्यायिक चाकोरीमध्ये राहुनच काम करावे लागते, नव्हे ते असेच करतात. व लौकिकार्थाने सधन होतात. आपल्या या लेखमालेतील पहिल्या भागात ज्या व्यक्तिंचा समावेश आहे ती सर्व मंडळी याच चौथ्या प्रकारात मोडतात. चाकोरीमध्ये राहुनच काम केल्याने ते यशस्वी होतात, असे जर आपण म्हंटले तर प्रथम दर्शनी हे वाक्य अर्धवट व दिशाभुल करणारे वाटेल. पण हेच सत्य आहे व ते कसे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच.

आता आपण ज्या चार प्रकारच्या लोकांविषयी माहिती पाहिली त्यातील एक कदाचित तुम्ही असु शकता की जे अजुन ही अपेक्षेप्रमाणे श्रीमंत होत नाहीत. दुसरे, तिसरे व चौथे असे तीन प्रकारचे लोकांच्या बाबतीत एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो.

या लोकांपैकी श्रीमंत कदाचित सगळे असतील पण यशस्वी कोण आहेत?

या प्रश्नाचे उत्तर जर तुम्ही मिळवु शकलात तर तुम्हाला समजेल की या तीन ही प्रकारच्या लोकांमध्ये काय फरक आहे ते.

आपल्या पहिल्या लेखामध्ये ज्या ज्या व्यक्तिंचा उल्लेख आहे ते श्रीमंत तर आहेतच पण ते कमालीचे यशस्वी आहेत. यातुन आपणास एक गोष्ट समजली पाहिजे. एक गुपित समजले पाहिजे. ते असे की या सर्व लोकांनी श्रीमंत होण्यासाठी काहीच केले नाही. त्यांनी यशाचा पाठपुरावा केला. व यश मिळविण्याच्या या मार्गावर त्यांना जे जे मिळत गेले, श्रीमंती त्यातील एक भाग आहे.

आज कदाचित तुम्ही अपार कष्ट करता आहात तरीही तुम्हाला अपेक्षित श्रीमंती तुम्हाला मिळत नाहीये याचा अर्थ तुम्ही काम श्रीमंतीसाठी करता आहात. श्रीमंती हे ध्येय नाही, हे लक्षात ठेवा. यश मिळविले की तुम्ही आपोआप श्रीमंत होताच.

मग तुमच्या मध्ये आणि त्या यशस्वी लोकांच्या मध्ये नेमका फरक काय आहे बरे? तुम्ही नेमके कुठे कमी पडता की ज्यामुळे त्यांचा आणि तुमचा आर्थिक स्तर भिन्न आहे? मागील एका लेखामध्ये मी तुम्हाला एका सवयी विषयी सांगितले होते. सतत यशस्वी होण्याची सवय. नेहमी ध्येय गाठण्याची सवय. ठरवलेले ध्येय गाठणे म्हणजे या लोकांसाठी काळ्या दगडावरील रेघच.

तुम्ही हा लेख, अजुनही वाचता आहात याचा अर्थ, माझ्याकडे तुमच्या साठी एक चांगली बातमी अशी आहे की तुम्ही पहिल्या प्रकारात मोडता. व चांगली बातमी अशामुळे आहे की तुम्ही जाणीवपुर्वक हा मार्ग निवडलेला आहे. खडतर कष्टाचा, सामाजिक चाकोरीत राहुन काम करण्याचा, व यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्न करण्याचा. दुस-या व तिस-या प्रकारात तुम्ही नाही ही आनंदाची व साजरी करण्याची गोष्ट आहे. याचा अर्थ असा ही आहे की तुम्ही मुलभूत माणुस म्हणवुन घेण्याच्या योग्यतेचे आहात. दुस-या आणि तिस-या प्रकारातील लोक अमानवीय, अनिर्बंध कामे करुन फक्त श्रीमंत होत आहेत, यशस्वी नाही.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दोन संकल्पना आहेत. त्याविषयी मी तुम्हाला सांगतो थोडक्यात म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही जे आयुष्य जगत आहात ते देखील किती महान आहे.

आपल्याकडे (कदाचित खेड्यांमध्ये अजुनही) गाईची धार काढायची एक विशिष्ट पध्दत होती. यात वासराला जेवढे प्यायचे आहे तेवढे, सरळ गाईच्या कासेलाच पाजले जायचे. वासराच्या योग्य वाढीसाठी व गाय-वासरु यांमधील वात्सल्य वृध्दींगत होण्यासाठी हे खुप गरजेचे असते. वासराने पिऊन झाल्यावर मग बाकीचे दुध भांड्यात काढले जायचे. याला दोहन म्हणतात.

याच्या विपरीत हल्ली भारतात देखील गायीकडे एक पशु म्हणुन न पाहता फक्त दुध देणारे यंत्र म्हणुन पाहिले जाते. ती जास्तीत जास्त दुध कशी देईल याचाच फक्त विचार केला जातो. व अक्षरशः यंत्राद्वारे तिच्या कासेतील दुधाचा अगदी शेवटचा थेंब देखील काढला जातो. वासराला नंतर बाटलीने दुध पाजले जाते मोजुन मापुन. याला शोषण म्हणतात.

समाजामध्ये शोषण करणारांची संख्या वाढते आहे. दुस-या व तिस-या प्रकारातील लोक फक्त आणि फक्त शोषण करताहेत इतरांचे. यातुन विकास होणार नाहीच. कुणाचाच होणार नाही कारण असे करणे सृष्टीच्या नियमांच्या, चाकोरीच्या बाहेर आहे. जशी आपली सामाजिक चाकोरी आहे तशीच सृष्टीची देखील एक चाकोरी आहे. या चाकोरीला सामंजस्य, हार्मनी असे म्हणतात. यामध्ये प्रत्येक जीव त्याला जेवढे हवे आहे तेवढेच घेतो प्रकृतीमधुन. व असे केल्यानेच आनंदाचा अनुभव अगदी सर्वांनाच मिळतो. वाघाने कधी महिनाभरासाठी पुरेल एवढी शिकार आधीच करुन ठेवल्याचे आपण ऐकले पाहिले आहे का बरे?

तुम्ही म्हणाल मग माणसाने देखील अन्न संचय, धन संचय करणे सोडुन द्यावे का? तर नाही. अन्न संचय, धनसंचय अवश्य करावा, नव्हे प्रत्येकाने केलाच पाहिजे, पण त्याच चाकोरीमध्ये राहुन.

आपण पुन्हा चाकोरी कडे आलो. चाकोरीमध्ये म्हणजेच सिस्टीम मध्ये राहुनच यश मिळवता येते, असे वाक्य या लेखामध्ये आधी देखील आले आहेच. आता आपण पाहुयात की चाकोरीमध्ये राहुनच हमखास यश कसे मिळविता येऊ शकते ते.

यासाठी मी एक अगदी साधे, आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरण देतो. समजा तुम्हाला तुमच्या मुला-मुलीला शाळेत सोडण्यासाठी जायचे आहे. तुम्ही दुचाकी-चारचाकी असे कोणतीही वाहन वापरुन हे काम करु शकता. शाळेत फोचे पर्यंत अनेक स्पीडब्रेकर्स आहेत, आणि अनेक सिग्नल्स देखील आहेत. एकेरी वाहतुकीचा रस्ता आहे.

पुढील वाहतुकीचा विचार करुन आपण ५-१० मिनिटे लवकरच घरातुन निघतो. डाव्या बाजुने गाडी चालवतो. पण उजवी बाजु जरी मोकळी दिसली, विरुध्द दिशेने जरी एक ही वाहन येत नसेल तरीही आपण नो एंट्रीमधुन गाडी घालत नाही. स्पीड ब्रेकर माहित असल्यामुळे वेग कमी करतो. सिग्नल असेल तर हिरवा दिवा लागे पर्यंत थांबतो. घाई जरी असेल तरी आपण मर्यादीत वेगानेच गाडी चालवतो. असे केल्यमुळे तुम्ही खात्रीशीर पणे शाळेत योग्य वेळी मुलांना सोडु शकता.

पण समजा तुम्ही घाईघाईत, उशीरा घरुन निघालात, नोंएंट्रीमध्ये गाडी घालवुन चालवु लागतात, स्पीडब्रेकर न पाहता तुम्ही धडाधड गाडी आदळत आपटत चालवता, सिग्नल जरी लाल असला तरीही सिग्नल ला न थांबता तुम्ही सिग्नल तोडुन जाता तर अशा वेळी काय होईल बरे? कदाचित १०० पैकी १०-२० वेळा तुम्ही वेळेत पोहोचु शकता शाळेत, पण इतर वेळी मात्र तुम्ही नवीन संकटांना जन्म देत असता. व ती संकटे निस्तरण्यामध्येच तुमची सगळी शक्ति खर्च करता.

मला सांगा, चाकोरीमध्ये म्हणजे पध्दतशीर, नियम पाळुन जर तुम्ही गाडी चालविली तर हमखास तुम्ही शाळेत ठराविक वेळेत पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. त्या उलट जार नियम धाब्यावर बसवुन तुम्ही गाडी चालवण्याचा प्रयत्न केला तर कुणालाच माहित नाही की तुम्ही कुठे पोहोचणार, कदाचित जेल, दवाखाना किंवा देवाघरी देखील पोहोचु शकता. निर्णय तुमचा आहे लक्षात ठेवा.

मग आता प्रश्न येतो चाकोरीमध्ये राहुनच यश कसे मिळविता येईल. यशस्वी होण्याची सवय स्वतःला कशी लावुन घेता येईल?

यासाठी आपणास काही कौशल्ये शिकावी लागतील. काही नवीन सवयी स्वतःमध्ये वृध्दींगत कराव्या लागतील. माझी खात्री आहे की या सवयी जर तुम्ही स्वतःल लावुन घेतल्या तर तुम्ही यशस्वी १००% होणारच कारण मी ही तेच करतो यशस्वी होण्यासाठी.

वाचीत रहा माझे लेख जे तुम्हाला श्रीमंतीच्या महामार्गावर दिशादर्शकाचे काम करतील.

लेख आवडल्यास अवश्य तुमचा अभिप्राय कळवा, शेयर, फॉरवर्ड करा.

कळावे

आपलाच

महेश ठोंबरे – 9923062525

Business leader and motivator

आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525

माझ्यासोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय करण्यासाठी खालील फॉर्म भरुन माझ्याशी संपर्क साधा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiY2l0eSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiUHVuZSIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJzZWxlY3RsaXN0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsImxhYmVsX2RlbGltIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJpY29uX2NsYXNzIjoiIiwiaWNvbl9zaXplIjoiIiwiaWNvbl9jb2xvciI6IiIsInRlcm1zIjoiIiwib3B0aW9ucyI6W3sibmFtZSI6IlB1bmUiLCJsYWJlbCI6IlB1bmUgLSBcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJBaG1lZG5hZ2FyIiwibGFiZWwiOiJBaG1lZG5hZ2FyIC0gXHUwOTA1XHUwOTM5XHUwOTJlXHUwOTI2XHUwOTI4XHUwOTE3XHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiU2hpcmRpIiwibGFiZWwiOiJTaGlyZGkgLSBcdTA5MzZcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NGRcdTA5MjFcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJOYXNoaWsiLCJsYWJlbCI6Ik5hc2hpayAtIFx1MDkyOFx1MDkzZVx1MDkzNlx1MDkzZlx1MDkxNSJ9LHsibmFtZSI6IkF1cmFuZ2FiYWQiLCJsYWJlbCI6IkF1cmFuZ2FiYWQgLSBcdTA5MTRcdTA5MzBcdTA5MDJcdTA5MTdcdTA5M2VcdTA5MmNcdTA5M2VcdTA5MjYifSx7Im5hbWUiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIiwibGFiZWwiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIC0gXHUwOTM1XHUwOTIxXHUwOTE3XHUwOTNlXHUwOTM1IFx1MDkyZVx1MDkzZVx1MDkzNVx1MDkzMyJ9LHsibmFtZSI6IlRhbGVnYW9uIiwibGFiZWwiOiJUYWxlZ2FvbiAtIFx1MDkyNFx1MDkzM1x1MDk0N1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkxvbmF2bGEiLCJsYWJlbCI6IkxvbmF2bGEgLSBcdTA5MzJcdTA5NGJcdTA5MjNcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MzJcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJLaG9wb2xpIiwibGFiZWwiOiJLaG9wb2xpIC0gXHUwOTE2XHUwOTRiXHUwOTJhXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNmIn0seyJuYW1lIjoiRmFsdGFuIiwibGFiZWwiOiJQaGFsdGFuIC0gXHUwOTJiXHUwOTMyXHUwOTFmXHUwOTIzIn0seyJuYW1lIjoiQWtvbGEiLCJsYWJlbCI6IkFrb2xhIC0gXHUwOTA1XHUwOTE1XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQW1yYXZhdGkiLCJsYWJlbCI6IkFtcmF2YXRpLSBcdTA5MDVcdTA5MmVcdTA5MzBcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MjRcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJCZWVkIiwibGFiZWwiOiJCZWVkIC0gXHUwOTJjXHUwOTQwXHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiQmhhbmRhcmEiLCJsYWJlbCI6IkJoYW5kYXJhIC0gXHUwOTJkXHUwOTAyXHUwOTIxXHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQnVsZGhhbmEiLCJsYWJlbCI6IkJ1bGRoYW5hIC0gXHUwOTJjXHUwOTQxXHUwOTMyXHUwOTIyXHUwOTNlXHUwOTIzXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQ2hhbmRyYXB1ciIsImxhYmVsIjoiQ2hhbmRyYXB1ciAtIFx1MDkxYVx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0ZFx1MDkzMFx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IkRodWxlIiwibGFiZWwiOiJEaHVsZSAtIFx1MDkyN1x1MDk0MVx1MDkzM1x1MDk0NyJ9LHsibmFtZSI6IkdhZGNoaXJvbGkgIiwibGFiZWwiOiJHYWRjaGlyb2xpIC0gXHUwOTE3XHUwOTIxXHUwOTFhXHUwOTNmXHUwOTMwXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiR29uZGlhIiwibGFiZWwiOiJHb25kaWEgLSBcdTA5MTdcdTA5NGJcdTA5MDJcdTA5MjZcdTA5M2ZcdTA5MmZcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJIaW5nb2xpIiwibGFiZWwiOiJIaW5nb2xpIC0gXHUwOTM5XHUwOTNmXHUwOTAyXHUwOTE3XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiSmFsZ2FvbiIsImxhYmVsIjoiSmFsZ2FvbiAtIFx1MDkxY1x1MDkzM1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkphbG5hIiwibGFiZWwiOiJKYWxuYSAtIFx1MDkxY1x1MDkzZVx1MDkzMlx1MDkyOFx1MDkzZSJ9LHsibmFtZSI6IktvbGhhcHVyIiwibGFiZWwiOiJLb2xoYXB1ciAtIFx1MDkxNVx1MDk0Ylx1MDkzMlx1MDk0ZFx1MDkzOVx1MDkzZVx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IkxhdHVyIiwibGFiZWwiOiJMYXR1ciAtIFx1MDkzMlx1MDkzZVx1MDkyNFx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBDaXR5IiwibGFiZWwiOiJNdW1iYWkgQ2l0eSAtIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBTdWJ1cmJhbiIsImxhYmVsIjoiTXVtYmFpIFN1YnVyYmFuIC0gXHUwOTI4XHUwOTM1XHUwOTQwIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik5hZ3B1ciIsImxhYmVsIjoiTmFncHVyIC0gXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTE3XHUwOTJhXHUwOTQxXHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiTmFuZGVkIiwibGFiZWwiOiJOYW5kZWQgIC1cdTA5MjhcdTA5M2VcdTA5MDJcdTA5MjZcdTA5NDdcdTA5MjEifSx7Im5hbWUiOiJOYW5kdXJiYXIiLCJsYWJlbCI6Ik5hbmR1cmJhciAtIFx1MDkyOFx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDkyY1x1MDkzZVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik9zbWFuYWJhZCIsImxhYmVsIjoiT3NtYW5hYmFkIC0gXHUwOTA5XHUwOTM4XHUwOTRkXHUwOTJlXHUwOTNlXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTJjXHUwOTNlXHUwOTI2In0seyJuYW1lIjoiUGFsZ2hhciIsImxhYmVsIjoiUGFsZ2hhciAtIFx1MDkyYVx1MDkzZVx1MDkzMlx1MDkxOFx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IlBhcmJoYW5pIiwibGFiZWwiOiJQYXJiaGFuaSAtIFx1MDkyYVx1MDkzMFx1MDkyZFx1MDkyM1x1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlJhaWdhZCIsImxhYmVsIjoiUmFpZ2FkIC0gXHUwOTMwXHUwOTNlXHUwOTJmXHUwOTE3XHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiUmF0bmFnaXJpIiwibGFiZWwiOiJSYXRuYWdpcmkgLSBcdTA5MzBcdTA5MjRcdTA5NGRcdTA5MjhcdTA5M2VcdTA5MTdcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJTYW5nbGkiLCJsYWJlbCI6IlNhbmdsaSAtIFx1MDkzOFx1MDkzZVx1MDkwMlx1MDkxN1x1MDkzMlx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlNhdGFyYSIsImxhYmVsIjoiU2F0YXJhIC0gXHUwOTM4XHUwOTNlXHUwOTI0XHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiU2luZGh1ZHVyZyIsImxhYmVsIjoiU2luZGh1ZHVyZyAtIFx1MDkzOFx1MDkzZlx1MDkwMlx1MDkyN1x1MDk0MVx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkxNyJ9LHsibmFtZSI6IlNvbGFwdXIiLCJsYWJlbCI6IlNvbGFwdXIgLSBcdTA5MzhcdTA5NGJcdTA5MzJcdTA5M2VcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MzAifSx7Im5hbWUiOiJUaGFuZSIsImxhYmVsIjoiVGhhbmUgLSBcdTA5MjBcdTA5M2VcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJXYXJkaGEiLCJsYWJlbCI6IldhcmRoYSAtIFx1MDkzNVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkyN1x1MDkzZSJ9LHsibmFtZSI6Ildhc2hpbSIsImxhYmVsIjoiV2FzaGltIC0gXHUwOTM1XHUwOTNlXHUwOTM2XHUwOTNmXHUwOTJlIn0seyJuYW1lIjoiWWF2YXRtYWwiLCJsYWJlbCI6IllhdmF0bWFsIC0gXHUwOTJmXHUwOTM1XHUwOTI0XHUwOTJlXHUwOTNlXHUwOTMzIn1dfSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiI1NjA2IiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiMzgxMyIsImFjdGlvbnMiOiI3MyIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfMTk2MDI1Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzE5NjAyNSIsImNvbm5lY3RfaGFzaCI6IjdhMzUxODZiNjUyYTQyNDQ0ZTdjYjMyNGFiYmQ2NDA3In0=

Facebook Comments