श्रीमंतीचा महामार्ग -भाग १

भगवान बुध्दांनी उन्नत मानवी जीवनासाठी अनेक उपदेश दिले आहेत. ते सर्वच्या सर्व अनुकरणीय आहेत यात बिलकुल शंका नाही. मला त्यांच्या उपदेशातील एक उपदेश सर्वात जास्त भावला. तो  असा.

जेव्हा तुम्हाला कशाचीही गरज नसते तेव्हा तुमच्यापाशी सर्वकाही असते.

खुप गहन अर्थ आहे या वचनाचा. वरकरणी हे वचन तुम्हाला सन्यासी वृत्तीला बळ देणारे वाटले असेल. बरोबर ना? पण खुप खोल विचार करुन पहा तुम्हाला यातील खरा आशय समजेल.

मागील लेखामध्ये म्हंटल्याप्रमाणे आज मी तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय व ते कसे मिळवता येऊ शकते या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. आधी सांगितल्याप्रमाणे आर्थिक स्वातंत्र्य ही यशाची एक पायरी आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजेच जीवनाची सार्थकता नाही हे लक्षात ठेवा. पण आर्थिक स्वातंत्र्याशिवाय तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होणार नाही हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

आज आपल्या देशात एक फकिर मल्टीमिलियन डॉलर चा बिझनेस करतोय. या फकिराला, भगवान बुध्दांच्या वचनाप्रमाणे कशाचीही आवश्यकता नाहीये. तरीही त्याच्याकडे लौकिक जीवनात माणसाकडे जे काही असावयास हवे, किंवा खरेदी करण्याची क्षमता हवी ती त्याच्याकडे आहे. म्हणजे काय त्याला गरज कशाचीही नाही, तरीही त्याच्याकडे सर्व काही आहे. आठवला का हा भारतातील सन्यासी?

नाही आठवला !  बाबा रामदेव

वॅरन बफेट नावाचा एक अतिश्रीमंत मनुष्य आहे. एकेकाळी तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति होता व जोपर्यंत तो व्यवसायामध्ये सक्रिय तो पर्यंत तो जगातील मोजक्या अतिश्रीमंत लोकांच्या अग्रस्थानी होता. वॉरन बफेट च्या श्रीमंती विषयी सर्वच जण जाणतात. पण त्यांच्या बाबतीत एक सत्य मात्र खुप कमी लोकांना माहित आहे. वॉरन बफेट दररोज स्वःतसाठी केवळ दोन-अडीचशे रुपयेच खर्च करायचे. त्यापेक्षा जास्त खर्च स्वतःवर ते होऊ देत नसत. तुम्ही म्हणाल ही तर चिंधीगिरी आहे. एवढा पैसा, संपत्ती काय कामाची जर ती खर्च करायची नसेल तर? तुमच्या या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या लेखामध्ये पुढे मिळेल. वाचत रहा!

फेसबुकचा मालक मार्क झुकरवर्ग माहित नसेल असा मनुष्य या पृथ्वीतलावर अगदी क्वचितच असेल. मार्क झुकरबर्ग फेसबुक चा मालक म्हणुन जितका प्रसिध्द आहे तितकाच तो अतिश्रीमंत म्हणुन देखील प्रसिध्द आहे. तुम्ही म्हणाल हे तर सर्वांनाच माहित आहे. यात नवीन ते काय सांगितल मी? हो पण थोड नवीन मार्क झुकरबर्गच्या बाबतीत मी सांगतो. मार्कचे सोशल मीडीयावरील फोटो तुम्ही पाहिलेत का? नसतील पाहिले तर अवश्य मार्कला फॉलो करा फेसबुक वर. मार्कच्या य फोटोंची खासियत म्हणजे त्याच्या बहुतांश फोटोमध्ये त्याचे टी-शर्ट्स आलटुन पलटुन घातलेले दिसतात. अगदी चार-चार, पाच-पाच वर्षे मार्क तेच कपडे वापरतो. कपड्यांवर तो आवश्यक तेवढाच खर्च करतो. अनाठायी खर्च करीत नाही. एवढेच काय ! जेव्हा त्याचे लग्न झाले तेव्हा तो त्याच्या नववधुला घेऊन हॉटेलिंगसाठी गेला. तुम्हाला माहित आहे का तो कुठे गेला असेल डिनर साठी? कदाचित एखाद्या पंचतारांकित, प्रायव्हेट बेटावरील, मनमोहक, रोमॅंटिक अशा हॉटेलात गेला असेल. बरोबर ना? पण मार्क त्याच्या बायकोला घेऊन गेला तो त्याच्या शहरातील एका मॅक्डोनल्ड्स मध्ये बर्गर खाण्यासाठी. वॉरन बफेट प्रमाणे तुम्हाला मार्क झुकरबर्ग देखील चिंधीगिरी करणारा वाटला असेल. बरोबर ना?

बिल गेट्स कोण होता हे माहिती नसेल असा माणुस देखील क्वचितच असेल या जगात. जगातील प्रत्येक मनुष्याच्या जीवनाला स्पर्श करणारा बिल गेट देखील जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये कित्येकदा सर्वप्रथम क्रमांकावर असायचा. मी तुम्हाला बिल गेट्स ची एक छोटीशी गोष्ट सांगतो. एकदा बिल गेट्स एका हॉटेलात दुपारच्या जेवणासाठी गेला. जेवण झाले. त्याला मेन्यु आणि सर्व्हिस आवडली. म्हणुन त्याने त्या हॉटेलातील वेटरला १० डॉलर ची टिप दिली व तेथुन निघाला. बिल गेट्स दरवाज्यापर्यंत पोहोचला व त्याने सहज मागे वळुन पाहिले तर त्याला दिसले की तो वेटर होता त्याच ठिकाणी, कुत्सितपणे हसत, बिलगेट्स कडे पाहत उभा होता. बिल गेट्स ला काही समजले नाही की वेटर असा का हसतोय ते. तेव्हा न राहवुन बिल गेट्स  माघारी वेटर पाशी गेला व त्याला विचारले असे कुत्सितपणे हसण्याचे कारण काय ? त्यावर वेटर म्हणाला साहेब काही दिवसांपुर्वी तुमची मुलगी इथे जेवायला आली होती. तिला देखील जेवण व सर्व्हिस आवडली म्हणुन तिने देखील टिप दिली. व तिने दिलेली टिप १०० डॉलर इतकी होती. आणि तुम्ही तर  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति असुनदेखील मला फक्त १० डॉलर इतकीच टिप दिलीत. बिल गेट्स यापुढे काय म्हणाला त्यात त्याच्या यशाचे रहस्य आहे. हे रहस्य देखील तुम्हाला याच लेखामध्ये वाचावयास मिळेल. त्यामुळे वाचत रहा.

इलॉन मस्क नावाचा आणखी एक अवलिया आहे. हो हा माणुस जिवंत आहे. साधारण ४५ वर्षे वय असेल याचे. जगातील अतिश्रीमंत लोकांच्या यादीमध्ये याचे ही नाव आहे. शुण्यातुन विश्व निर्माण करणा-या वरील सर्व व्यक्तिमत्वांपैकीच इलॉन मस्क हा देखील आहे. आधुनिक विज्ञानवादी लोकतर या  इलॉन मस्क ला मानवतेला तारणारा म्हणजे माणसाचा आधुनिक तारणहार देखील म्हणतात. हे असे का म्हणतात हे तुम्ही स्वतः शोधुन काढा. या इलॉन मस्क विषयी एक भन्नाट गोष्ट मी तुम्हाला सांगतो. त्याचे वडील काही गरीब वगैरे नव्हते.  अतिश्रीमंत जरी नसले तर श्रीमंत होतेच ते.  म्हणजे मुलांसाठी लागेल तेवढा पैसा देण्याची त्यांची तयारी व क्षमता देखील होती. पण इलॉन मस्क जेव्हा कॉलेजात शिक्षणासाठी गेला तेव्हा त्याचा दररोजचा खर्च कधीही एक डॉलरपेक्षा जास्त झाला नाही आणि त्याने केला ही नाही. त्या काळी कॉलेजमधील मुले-मुली सरसरी २० डॉलर खर्च करायचे. वरील सर्व व्यक्तिरेखांप्रमाणे तुम्हाला इलॉन मस्क देखील कंजुस वाटला असेल तर यात नवल नाही.

माझ्या देण्यासाठी उदाहरणे असंख्य आहेत. पण मला वाटते आज एवढी पुष्कळ झाली. या सर्वांमध्ये तुम्हाला दिसलेले साम्य काय आहे?

मी सांगतो.

वरील सर्व उदाहरणे अशा व्यक्तिंची आहेत की जी आर्थिक दृष्ट्या जगातील सर्वात श्रीमंत म्हणुन संबोधली जातात. या सर्व व्यक्तिंच्या बाबतीत मला दिसलेले साम्य असे आहे की या सर्व व्यक्तिंनी श्रीमंत होण्यासाठी काहीच केले नाही. तर त्यांनी जे काही केले त्यामुळे ते श्रीमंत झाले.

आपल्याल जेवढे आवश्यक आहे तेवढेच वापरणे, घेणे किंवा तेवढाच पैसा खर्च करणे हे श्रीमंतीचे लक्षण आहे.

यामध्ये गरज आणि चंगळ यातील फरक ज्यांना समजतो तेच श्रीमंत होतात.

याचाच अर्थ असा की वरील सर्व व्यक्तिंना त्यांच्या कडील पैसे कुठे कसे खर्च करायचे याचा विचार करण्याची गरज पडली नाही. किंबहुना पैसा खर्च कसा करायचा हा विचार करणे त्यांच्या स्वभावात कधीही नव्हते, नाही. त्यांच्या स्वभाव मग नक्की कसा आहे?

सतत उद्यमशील राहुन, कल्पकपणे आपण करीत असलेले काम अधिक प्रभावशाली कसे करता येईल या एकाच गोष्टीवर त्यांनी आयुष्यात भर दिला. व हि एकच गोष्ट त्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन गेली. या शिखरावर त्यांना प्रचंड आत्मिक समाधान, धन्यता तर मिळालीच पण त्यासोबतच मिळाले आर्थिक स्वातंत्र्य.

पण गम्मत बघा मित्रांनो, भगवान बुध्दांच्या त्या वचनाप्रमाणेच या सर्व लोकांच्या गरजा अगदी कमी आहेत, अगदी तुमच्या आमच्यासारख्याच. व ते फक्त त्या गरजांपुरतेच खर्च करतात. त्यांच्या कमाईच्या तुलनेमध्ये त्यांचा खर्च अगदी नगण्य आहे म्हणजे नसल्यासारखाच आहे. म्हणजेच काय भगवान बुध्दांचे वचन सत्यात, प्रत्यक्षात जगणारे नुसते साधु सन्यांसीच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत, गर्भश्रीमंत, अतिश्रीमंत लोक देखील आहेत व ते संख्येने काही कमी नाहीत.

या सर्व लोकांच्या जीवनाकडे बघुन, त्यांच्या जीवनाचा अभ्यास करुन मी, पुढच्या लेखामध्ये तुम्हाला हेच यशाचे मंत्र सांगणार आहे.

लेख आवडल्यास अवश्य तुमचा अभिप्राय कळवा, शेयर, फॉरवर्ड करा.

कळावे

आपलाच

महेश ठोंबरे – 9923062525

Business leader and motivator

आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *