दुसरी बाजु पहा – आर्थिक मंदीतुन फायदा कसा करुन घ्यायचा

माझ्या २०-२५ वर्षांच्या करीयर मध्ये मी अनेकदा आर्थिक मंदी, आर्थिक सावट, औद्योगिक मंदी असे शब्द ऐकले. मंदीचा
प्रत्यक्ष प्रभाव माझ्यावर व माझ्या व्यवसायांवर कधीच पडला नसला तरी अनेक वेळा या मंदीच्या काळात, अनेक मित्र-सहकारी
यांच्या कडुन मी मंदी विषयी गप्पा मात्र ऐकल्या आहेत. विशिष्ट क्षेत्रात मंदी येणे म्हणजे काय केवळ त्या एका क्षेत्रापुरताच
तिचा प्रभाव असतो असे नाही तर त्या क्षेत्राशी निगडीत अन्य सगळ्याच क्षेत्रात विशेषतः संलग्न छोटे पुरवठादार व सेवा
देणा-यांवर याचा अधिक प्रभाव पडत असतो. मोठे मोठे उद्योग देखील अशा काळात कामगार कपात करतात व बेरोजगारीची
कु-हाड अनेकांवर कोसळते. जे नोक-या करतात त्यांच्यासाठी दुसरी नोकरी शोधण्याशिवाय पर्याय नसतोच. पण व्यावसायिक
मानसिकता असलेल्या माणसांच्या बाबतीत म्हणाल तर मंदी ही त्यांच्यासाठी आत्मपरिक्षण करुन, नव्याने पुन्हा उभारी
घेण्यासाठी एक सर्वोत्तम संधी होऊ शकते. त्यासाठी फक्त आवश्यकता असते बदलणा-या काळाची दशा व दिशा समजुन,
उमगुन; योग्य निर्णय, योग्य वेळी घेण्याची.

मागील दोन तिमाह्यांमध्ये भारताचा जीडीपी सतत घसरतो आहे. ६.६ (डिसेंबर २०१८) वरुन तो ऑगस्ट २०१९ मध्ये ५.० या,
सर्वात कमी निर्देशंकावर घसरला. नोक-यांमध्ये कपात, कामगार काढुन टाकणे, विक्री व नफ्यामध्ये घट या सगळ्या गोष्टी
असुनदेखील सरकार आशावादी चित्र उभे करीत आहे. तरीदेखील ५.० म्हणजे खरोखरीच एक धोक्याची घंटा आहेच, हे कुणी
नाकारु शकत नाही. मागील दोन दशकांमधील हा सर्वात निचांकी स्तर आहे. एकट्या वाहन उद्योगाने तीन लक्ष नोक-या कमी
केल्याचे म्हंटले जात आहे. अशा स्थितीमध्ये सर्वसामान्य माणसावर याचे अनेक परिणाम पडणार यात शंका नाहीच.
नोकरीवरुन कमी केले तर दुसरी नोकरी मिळेल ही पण उच्च पगाराच्या नोकरीमुळे जगत असलेल्या राहणीमानात आमुलाग्र
बदल करीत अनेकांना, कमी पगाराच्या नोक-यांवर समाधान मानावे लागणार आहे. यामुळे मंदीची झग आणखी जास्त
जमिनीस्तरापर्यंत पोहोचेल. लाईफस्टाईल खर्च जर कमी केले तर त्याशी निगडीत छोटे छोटे अनेक व्यवसायांवर त्याचा
दुषपरिणाम होणार हे नक्कीच. कुणी खर्च केलाच नाही तर दुस-या कुणाला उत्पन्न मिळणार तरी कसे? समाजाने
नकळत अवलंबलेली आर्थिक संस्कृतीचा (Spend more so that someone else can
earn more) हा फटका आहे.

मुळची बचतीची कास व सवय असलेल्या भारतीयांकडे काही ना काही संपत्ती रोख, शेयर्स, सोने , सदनिका अशा स्वरुपात
आहेच. ही बचतीची सवय आपणास अनेक वेळा तारणारी सिध्द झालीये. गेल्या अनेक मंद्यांमध्ये या सवयीने सामान्यातील
सामान्य माणसाला वाचवले आहे. बाजारातील काही ठळक मुद्द्यांचा, घटनांचा व परिणामांचा अभ्यास करुन मी
सर्वसामान्यांसाठी , या मंदीतुन फायदा कसा करुन घेता येईल या विषयी थोडे सांगणार आहे. व्यावसायिक मानसिकता
असलेल्यांनी माझा पुढचा लेख अवश्य वाचावा. त्यामध्ये मंदीचा उपयोग व्यवसायामध्ये गरुडभरारी घेण्यासाठी कसा करता
येईल हे मी सविस्तर सांगणार आहे.

यातील ही सध्या ज्या संपत्ती साधनाचे मुल्य घसरत आहे, अशाच साधनात

सामान्यांनी या मंदीच्या काळात काही गोष्टी करता येतील त्या अशा

१ शेयर/स्टॉक –

समुद्राच्या लाटांप्रमाणेच हे जीवन आहे. सुख दुख देखील तसेच आहे. हे कधी लाटेसोबत वाहत असताना लाटेच्या अतिउच्च
शिखरावर असते तर कधी लाटेसोबत खुप खोलवर जाते. लाट देखील किना-याला लागतातच विरुन जाते. पण मी म्हणतो
आपण किना-याला लागायचेच का बरे? आपण योग्य पध्दतीने पोहायला शिकलो की, आपल्या मर्जीप्रमाणे कोणत्याही लाटेवर
स्वार होऊ शकतो. या लाटांचे जसे आहे तसेच आहे शेयर मार्केट मधील शेयर्सचे. हे कधी वर जातात तर कधी खाली जातात.
व सध्या काळ आहे खाली जाण्याचा. खाली गेले व आणखीही खाली जातीलच. पण एक सत्य आहे की लाटेप्रमाणेच ते पुन्हा
वर येणारच. मग आता उतरत्या बाजारात, शेयरचे भाव कमी होण्याच्या काळात काय बरे केले पाहिजे?


योग्य तज्ञाचा सल्ला घेऊन, आर्थिक नियोजन करुन, बचतीमधील काही भाग, याच वेळी शेयर मार्केट मध्ये गुंतवला पाहिजे.
पण हे लांब पल्ल्याचे आहे. म्हणजे गुंतवणुक करुन पुढचा डझनभर महिन्यांचा काळ धैर्य धरण्याची तुमची क्षमता असेल तर,
एखाद्या फायनांशिय वेलनेस कोचच्या मदतीने तुम्ही याच वेळी, तुमचे पैसे पेरले पाहिजे.

२. रीयल इस्टेट/स्थावर मालमत्ता –

वर्ष २०१४ पासुन, म्हणजे जेव्हा मोदी सरकार सत्तेत आले, अगदी तेव्हा पासुनच रीयल इस्टेट या क्षेत्राला उतरती कळा लागली आहे. ही उतरती कळा अजुनही तशीच आहे. फ्लॅट, जमिनींचे भाव काही कमी झाले नाहीत परंतु व्यवहार मात्र थंडावले.
बाजारात उठावच नाही. सरकारची विविध धोरणे याला कारणीभुत आहेत. रोखीच्या व्यवहारांवर करडी नजर आहे सध्या
सरकारची. या क्षेत्रामध्ये अगदी पावसाळ्या उगवतात तशा भुछत्रांसारखे डेवलपर्स, बिल्डर्स गल्लोगल्ली तयार झालेले आपण
पाहिले. आर्थिक निती व रेरा यामुळे या छोटेखानी व्यावसायिकांवर गदा आली. त्यामुळे सामान्य ग्राहकाचा डेवलपर वरील व
एकुणच योजनेमधील विश्वास डळमळताना दिसतो. असे चित्र जरी असले तरी या क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना मात्र ग्राहकांची
कमी नाही.

हा वेग जरी कमी असला तरी सुर मात्र आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये बांधकाम व रीयल इस्टेट या क्षेत्राचे एका
अर्थाने शुध्दीकरणच सुरु आहे. याचा दुरगामी लाभ सामान्य जनतेलाच होणार यात शंका नाही. फ्लॅट, जमिनींच्या किमती
अधिक स्थिर होताना आपण सध्या पाहतोय. ज्यांच्याकडे गंगाजळी आहे, अशांसाठी कदाचित रीयल इस्टेट मध्ये
गुंतवणुकीसाठी हाच उत्तम काळ आहे. काळजीपुर्वक व पध्दतशीर पणे आकलन करुन हे केल्यास यात नक्कीच लाभ होईल.

३. बंपर ऑफर्स


उद्योगांना मंदीचे ग्रहण लागले आहे. अशातच सरकार बीएस ६ च्या वाहनांची विक्री व उत्पादन सक्तीचे करण्यासाठी पाऊले
उचलत आहे. हे कदाचित एक एप्रिल २०२० पासुन लागु होईलच. यामुळे विकल्या न गेलेल्या गाड्या की ज्या आज मंदीमुळे
पडुनच आहेत, त्या गाड्या उत्पादन कंपन्या बंपर ऑफर्स ला नक्कीच विकतील.नुसत्या अशा गाड्याच नाही तर चलन वलन
सुरु राहण्यासाठी, आपल्या देशातील या सणा-उत्सवाच्या काळात विविध कंपन्या सर्रास बंपर ऑफर्स देणार हे निश्चित. ही गंगा वहायला अजुन सुरुवात व्हायची आहे. अजुन वेळ आहे या ऑफर्सचा पाऊस पडण्यास. पण मग काय तुम्ही तयार आहात या वाहत्या गंगेत यथेच्छ हात धुऊन घेण्यासाठी?

आहात का मग तयार मित्रांनो, मंदीतुन फायदा मिळवण्यासाठी?

कळावे
आपलाच
महेश ठोंबरे – 9923062525
Business leader and motivator
I am a wellness coach. I help people with physical well-being. Continuous support, coaching and structured/proven approach is the key. You also can become a coach like me, its easy, trust me. To contact me please call – 9923062525
आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525
मी एक यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे कारण नक्की काय आहे, हेच मी “श्रीमंतीचा महामार्ग” या लेखमालेतुन लिहित आहे. तुम्हाला माझ्या सोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा, व्यवसाय, तोही कमीत कमी भांडवलामध्ये सुरु करायचा असेल व माझ्या सारखेच (किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त) यश मिळवायचे असेल तर मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIzMjU5IiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiMTk5NCIsImFjdGlvbnMiOiI0NSIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNjA0MTMyIiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzYwNDEzMiIsImNvbm5lY3RfaGFzaCI6IjdjZjIxNGMyOGIyZWFlODBjZjQyMTdjZmY5N2FjNWRhIn0=

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *