s श्रीमंतीचा महामार्ग (भाग ७) - अक्षुण्ण प्रगल्भता - Dreamers to Achievers

श्रीमंतीचा महामार्ग (भाग ७) – अक्षुण्ण प्रगल्भता

एकदा एक कासव संथ गतीने, तळ्याकाठी आले. काठावरच एक वृक्ष होता व त्या वृक्षाच्या सर्वात जवळच्या फांदीवर, एक सुगरण तिचे घरटे विणत होती. कासवाचे लक्ष त्या सुगरणीकडे गेले. व कासव कुचेष्टेने सुगरणीला चिडविण्यासाठी तिच्याशी बोलु लागला.

अरेरे काय तुम्हा पक्षांचे नशीब! काड्या-काटक्या इकडुन तिकडुन गोळा करुन, एकमेकांत गुंतवुन, एवढी मेहनत घेऊन, तुम्हाला स्वतःलाच तुमचे घरटे तयार करावे लागते. आणि त्यातही गम्मत अशी की, वा-या वादळा, पाऊस पाण्यामध्ये तुमचे घरटे टिकत देखील नाही. माझे घर बघ, किती मजबुत आहे. मी जिथे जाईल तिथे माझे घर माझ्या पाठीवरच असते. मजबुत आणि टिकाऊ.”, कासव बोलुन, मोठमोठ्याने हसु लागले.

सुगरण त्यावर म्हणाली,”हो खरे आहे तुझे. तरीही मला माझे घरटे खुप आवडते कारण मी स्वतः ते बवनले आहे”

कासव,”तसे जरी असले तरी, माझे घर तुझ्या घरटापेक्षा नक्कीच भारी आहे. तुला हेवा वाटत असेल माझ्या कडे पाहुन?”

सुगरण उत्तरली,”हेवा? अजिबात नाही! कारण माझे घरटे फक्त माझ्यासाठी नाहीये. माझे कुटूंब व मित्रपरिवाराला सामावुन घेईल इतकी मोकळीक मझ्या घरट्यामध्ये आहे, तुझे कवच कुटूंबीयांसाठी नाहीये, बरोबर ना? तुझ्या कडे चांगली इमारत आहे पण माझ्याकडे नुसती इमारत नाही, तर घर आहे”

हि गोष्ट व यातुन काय शिकायचे हे मी तुमच्यावर सोपवतो. कदाचित पुढील लिखाण वाचुन तुम्हाला या गोष्टीचा अन्वयार्थ आणखी चांगला लावता येईल.

मागील लेखामध्ये आपण दृष्टीकोन या विषयावर चर्चा केली. आपला दृष्टीकोन किती महत्वाचा आहे व तो बदलल्यावर काय परिणाम होतो हे उदाहरण सहित आपण पाहिले. आपल्या या लेख मालेचा हेतु श्रीमंती असा जरा वरकरणी दिसत असला तरी, ती श्रीमंती कधीही न संपणारी व मुलभुत जीवनतत्वांवर आधारलेली कशी असावी याबाबतीत अधिक माहिती मिलवणे असा आहे. कधी कधी एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक किंवा एकापेक्षा जास्त रस्ते असु शकतात. काही रस्ते कमी अंतराचे ही असु शकतात. त्यांना आपण शॉर्ट कट म्हणतो. पण आपणा सर्वांना माहित आहे की शॉर्ट कट कधीही सोपा नसतो. मुख्य रस्ता सोडुन आपण शॉर्ट कट ने जायचे ठरवले तर आपणास रस्ता कच्चा मिळु शकतो किंवा जास्त ट्राफिक असु शकते. जास्त धोकादायक देखील असु शकतो शॉर्ट कट. बरोबर ना? शॉर्टकट च्या बाबतीत तुमचा अनुभव असाच आहे ना? त्यामुळे शॉर्ट कट जरी रस्ता असला तरी सुखरुप, हमखास तो तुम्हाला वेळेत, पाहिजे त्या ठिकाणी पोहोचवेलच असे नाही. वाटेत काहीही होऊ शकते, एखादा अपघात, ट्राफिक जाम, गाडी घासणे, खड्ड्यात आदळणे, असे काहीही होऊ शकते. अगदी तसेच आहे जीवनाच्या ध्येयाबबतीत. जीवन ध्येय गाठायचे तर आहेच, पण शॉर्टकट च्या नादी लागुन, अपघात करुन घेण्यात काय हाशील आहे मित्रानो?

मी, जो श्रीमंतीचा महामार्ग सांगतोय, तो लांबचा जरी वाटत असला तरी लक्षात ठेवा, हाच एकमेव व भरवशाचा मार्ग आहे परिपुर्ण असे यशस्वी जीवन जगण्याचा.

या मार्गावर जाण्यासाठी तुम्हाला, मला, आपणा सर्वांना एक वाहन पाहिजे. व दैवयगे करुन आपणा सर्वांकडे ते वाहन आहेच. हे वाहन म्ह्णजे आपण स्वतः .

तुमचे वाहन जितके जास्त ताकतीचे, जास्त मायलेज देणारे, कमी मेंटेनन्स असणारे, व अधिक भरवशाचे असेल तर तुम्ही तुमचे ध्येय गाठणे अवघड गोष्ट नाहीये.

आपले हे वाहन अधिक भरवशाचे कसे करता येईल? या वाहनाचा वेग जास्तीत जास्त कसा वाढवता येईल, याची वेळोवेळी काळजी कशी घ्यावी जेणेकरुन , या वाहनाचे आयुष्य वाढेल? अशा अनेक गोष्टी आपण या लेखमालेमधुन शिकणार आहोत.

हे वाहन म्हणजे मी. मी म्हणजे माझे हे शरीर. पण खरच का आपले हे शरीर म्हणजेच फक्त मी. खरा मी जो आहे तो , तन आणि मन या दोन्हींनी बनतो, बरोबर ना?

शरीर म्हणजे तन व माझे मन म्हणजे काय बरे? मन म्हणजे काय हा तसा पाहता खुप मोठा व सविस्तर , वेगळे लिहिण्याचा विषय होऊ शकतो. या लेखामध्ये, समजण्या सोपे जावे म्हणुन, उपमा पधद्तीने संगण्याचा प्रयत्न करतो.

आपणा प्रत्येकाकडे मोबाईल आहे. हॅंडसेट म्हणजे जणु शरीर व हॅंडसेट मधील सॉफ्टवेयर म्हणजे मन! येतय का लक्षात मंडळी! कधी कधी मोबाईल खुप स्लो चालायला लागला की, आपणास एक अनाहुत सल्ला बरेच जण देतात, तो म्हणजे ,”सॉफ्टवेयर मारुन घे!” बरोबर ना?

सॉफ्टवेयर मध्ये आज्ञा असतात, त्या आज्ञा हार्डवेयर ला म्हणजेच हॅंडसेट ला दिल्या जातात व त्या आज्ञांप्रमाणेच हॅंडसेट म्हणजेच हार्डवेयर काम करते.

मी म्हणजे आपल्या प्रत्येक जण अगदी असाच आहे. शरीर हार्डवेयर आहे व मन आपले सॉफ्टवेयर आहे.

म्हणजेच काय तर आपले तन व आपले मन यांनी सामंजस्याने, सौहार्दाने एकत्रित पणे काम केले तरच आपली गाडी अधिक जास्त भरवशाची, जास्त वेगाची व कमी मेंटेनन्सची होईल.

आता यापुढचे थोडे जास्त व महत्वाचे सांगतो. आपले तन व मन यांनी मिळुन आपण जे काही करु ते आपले कर्म असते. व आपली अनेक कर्मे, आजतागायत केलेली व इथुन पुढे आपल्याकडुन होतील ती कर्मे मिळुन आपले जीवन बनत असते.

पण आपली कर्मे नक्की कशी काय जन्म घेतात बरे? आपल्या (शरीराकडुन) कडुन कर्मे करुन घेण्याचे काम आपले मन करते.

आपल्याकडुन होणारे प्रत्येक कर्म दोन प्रकारचे असते. पहिले असते जाणीवपुर्वक केलेले कर्म व दुसरे आपणाकडुन आपोआप होणारे कर्म. जी कर्म जाणिवपुर्वक केले जाते त्याचे परिणाम मर्यादित कालावधीचे असतात. तर जी कर्मे आपणाकडुन आपोआप होत असतात, तीच कर्मे आपल्या जीवनातील लांब पल्याच्या ध्येयपुर्तीवर परिणाम करतात.

व ती आपोआप होणारी कर्मे म्हणजेच आपल्या सवयी होय.

स्टीफन कव्ही, त्यंच्या पुस्तकात सवयींबाबत खालील प्रमाणे लिहितात.

“Sow a though, reap an action;sow an action, reap a habit; sow a habit, reap reap a character and sow a character, reap destiny.”

अरीस्टॉटल नावाचा एक पाश्चात्य, प्राचीन साहित्यीक काय लिहितो ते वाचा,”We are what we repeatedly do, Excellence, then, is not an act , but a habit!”

आपल्या जीवनातील सर्वात जास्त शक्तिशाली गोष्ट कोणती असेल तर ती आहे आपल्या सवयी. कारण त्या सातत्यपुर्ण असतात सोबतच त्या बहुतांश आपल्या नकळतच घडतात. अगदी प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी याच सवयींमुळेच आपले चरीत्र काय आहे, कसे आहे, याची अभिव्यक्ति होत असते. सवयी आपल्या अजाणतेपणी आपल्याकडुन कार्य करुन घेत असतात. एकदा का या सवयी (कोणत्याही असोत) आपणास जडल्या की त्या सवयी आपणास आयुष्यभर चिकटुन राहतात. आपल्या चरीत्राचा अविभाज्य भाग असतात आपल्या सवयी. नव्हे नव्हे, आपल्या सवयी म्हणजेच आपले चरीत्र होय.

आयुष्य भर चिकटुन जरी राहत असल्या तरी सवयी, जाणीवपुर्वक प्रयत्न करुन जुन्या सवयी मोडता येतात व नवीन लावता देखील येतात. हे शक्य आहे. याचाच अर्थ आपले चरीत्र देखील, सवयी बदलल्याने बदलता येते. हे शक्य आहे. पण मित्रांनो, लक्षात ठेवा हे सहज साध्य, सहज शक्य नाहीये.

असे करण्यासाठी योग्य पध्दत, चिकाटी व स्वतः बदलण्यासाठी समर्पण करण्याची तयारी आवश्यक आहे.

नुकतेच भारताने चांद्रयान २, अवकाशात, आपल्या चंद्राकडे पाठवले. याआधी , अमेरिकेच्या नासा या संस्थेने चाळीसेक वर्षापुर्वी प्रत्यक्ष मनुष्यच चंद्रावर पाठवला. जे यान चंद्राकडे झेपावले त्या यानास पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर पडण्यासाठी खुपच जास्त जोर आणि वेग लावावा लागतो. सुरुवातीस हा वेग खुपच जास्त असतो. व तितकीच जास्त शक्ति देखील आवश्यक असते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडण्यासाठी. सुरुवातीस जेवढा जास्त वेग, शक्ति व उर्जा लागते, पुढे कदाचित तेवढी लागत नाही. याचे कारण असते पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण. अपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी तर कमालच केली आहे. सुरुवातीला एकदाच वातावरणाच्या बाहेर पडण्यासाठी शक्ति, वेग व उर्जा जास्त खर्च केली व नंतर मात्र, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तिचाच उपयोग करुन, टप्याटप्प्याने यानास चंद्राकडे सरकवण्याचे तंत्र त्यांनी विकसीत केले. यामुळे इंधन कमी लागणार, शक्ति कमी लागणार परिणामी एकुण मोहीमेचा खर्च देखील कमी होणार. असो!

तर मुद्दा असा आहे की, आपल्या सवये देखील पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षासारख्याच आहेत. त्यांचा खुपच जबरदस्त परिणाम आपल्यावर होत असतो. सवयींच्या जोखडातुन स्वतःला मुक्त करण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्तिची आवश्यकता असते. जबरद्स्त समर्पण व सततचे जाणीवपुर्वक प्रयत्न गरजेचे आहेत. सिगरेटचे व्यसन सोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला असेल त्यांना हे माहित असेल. पण एक मात्र खरे की, सवयी मोडता येतात व नवीन सवयी जडवुन देखील घेता येतात.

एकदा का आपण सवयींच्या गुरुत्वाकर्षण शक्तिच्या जोखडातुन मुक्त झालो तर मग सगळे अवकाश आपले असते, मुक्त विहार करण्यासाठी. व जसे भारतीय शास्त्रज्ञांनी नुकतेच केले आहे, गुरुत्वाकर्षण शक्तिचा उपयोग यानास दिशा देण्यासाठी केला आहे तसाच आपण देखील सवयीम्चा उपयोग आपल्या कल्याणासाठी करु घेऊ शकतो.

सवय म्हणजे नक्की काय?

कोणतेही कर्म करण्यासाठी आपणास तीन गोष्टींची आवश्यकता असते.

एक – ज्ञान/माहिती, कसे करायचे, का करायचे इत्यादीचे ज्ञान

दुसरे – कौशल्य/विधी/प्रोसेस व

तीन – इच्छाशक्ति/ॲटीट्युड/स्फुर्ती/प्रेरणा/मोटीव्हेशन/पॅशन

तीन पैकी एक जरी कमी असेल तर ते नुसते कर्म होते. जाणिवपुर्वक केलेले कर्म. पण या तीनही गोष्टी जिथे एकत्र आल्या आहेत, जिथे त्यांचा संगम होतो ते म्हणजे सवय.

तीन पैकी एक जरी कमी असेल तर ती सवय होत नाही. एखाद्या गोष्टीची सवय होण्यासाठी या तीन ही गोष्टींची नितांत आवश्यकता असते.

यातील ज्ञान व कौशल्य तुम्हाला सहज मिळु शकते. नव्हे आपणा प्रत्येकाकडे ते आहेच. जसे बोलता येणे, ऐकता येणे. काय बोलले पाहिजे, कसे बोलले पाहिजे याचे कौशल्य देखील आपल्याकडे आहेच. पण याच अर्थ प्रत्येक जण समुपदेशक होऊ शकतो असे नाही. एक चांगला समुपदेशक, किंवा संभाषणकुशल व्यक्ति, प्रभावी वक्ता होण्यासाठी आणखी एक गोष्ट पाहिजे ती म्हणजे आवड/पॅशन. आपण ज्या विषयात बोलणार आहोत त्या विषयाची आवड.

आधी म्हंटल्याप्रमाणे, जुन्या सवयी, जुने दृष्टीकोन, जुने आयाम सोडता येतात. हे सोडणे त्रासदायक जरी असले , शक्ति खर्च करणारे व प्रयत्न करायला लावणारे जरी असले तरी हे केल्याने फळ नक्कीच मिळते. व ते फळ आहे आनंद. निखळ आनंद. आपल्या जीवनाचा अंतस्थ हेतु म्हणजेच निखळ आनंदाचा अनुभव करणे.

आनंद म्हणजे काय तर एखादे इच्छीत फळ आणि ते मिळविण्यासाठी केलेला त्याग, मग त्यागावर ठरते, तुमचे इच्छीत फळ तुम्हाला आता मिळणार की भविष्यात.

अक्षुण्ण प्रगल्भता

भारतीय विचारधारेमध्ये एक फार सुंदर संकल्पना आहे. यात व्यक्तित्वाच्या विकासाच्या पातळ्या सांगितलेल्या आहेत. व्यष्टि, समष्टी, सृष्टी व परमेष्टी. अशा चार पातळ्यांवर, क्रमाक्रमाने मनुष्याने प्रगती केली पाहिजे. म्हणजेच, व्यक्तित्व उत्तरोत्तर प्रगल्भ होत गेले पाहिजे. व्यक्ति म्हणुन हे शरीर, मन असा जो अनुभव मी घेतो तसाच हा समाज म्हणजे मी आहे असा अधिक प्रगल्भ अनुभव प्रत्येकास आला पाहिजे. असे झाले तर सामाजिक सौहार्द आपोआप तयार होईल.

स्टीफन कव्ही यांनी हाच विचार, थोडा संक्षिप्त करुन मांडला आहे. त्यांच्या मते व्यक्तिच्या विकासाच्या, प्रगल्भेच्या  तीन पाय-या आहेत.

एक – परावलंबन

दोन – स्वावलंबन

तीन – परस्परावलंबन

आपण, नव्हे या पृथ्वीवर जन्म घेणारा प्रत्येक सजीव, सुरुवातीस परावलंबी असतो. म्हणजे या शरीराच्या गरजा पुर्ण करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी आपणास, बालक असताना दुस-यांवर अवलंबुन रहावे लागते. या विशिष्ट अवस्थेमध्ये, त्या त्या बालकाची मानसिकता काहीशी अशी असते. मी जे काही आहे ते तुझ्यामुळे, माझ्या अवस्थेला (चांगल्या अथवा वाईट) कारणीभुत तु आहेस.

कित्येकांच्या आयुष्यात ही अवस्था त्यांचे शरीर मोठे झाल्यावर देखील तशीच असते. ती म्हणजे भावनिक गरजांच्या बाबतीत. मी आनंदी व्हावे असे वाटत असेल तर दुस-या अमुक अमुक पधतीने वागले पाहिजे. मी दुःखी आहे कारण दुसर कुणी तरी माझ्याशी अमुक अमुक प्रकारे वागले, मला अमुक अमुक बोलले. ही अवस्था/पातळी आहे परावलंबन.

दुसरी आहे स्वालंबन – यात मी सक्षम असतो. मीच माझ्या वर्तमान सुख-दुःखासाठी जबाबदार असतो. मी शारीरीक, आर्थिक व भावनिक दृष्ट्या स्वयंपुर्ण असतो. इथे दुस-याला दोष देणे अजिबात नसते. पण यातुन एक आणखी विकृती जन्मास येऊ शकते, ती म्हणजे अहंकार. ‘ग’ ची बाधा. जर ही ‘ग’ बाधा झाली तर तो मनुष्य कधीही, आणखी पुढच्या पातळीवर, बढतीवर जाऊ शकणार नाही.

पुढची पातळी आहे – परस्परावलंबन

जसे जसे आपण जीवन यापन करतो तसे, आपणास (जे ख-या अर्थाने स्वावलंबी आहेत ते) हे सत्य समजते की आपला समाज, ही अवघी सृष्टीच परस्परावलंबी आहे. इथे कुणीही एकटा जगु शकत नाही. जीवे जीवस्य जीवनम, जसे निसर्गात आहे तसेच मानवी संस्कृत्यांमध्ये ही आहेच.  असे असुनही सध्याचे एकुणच जीवनमान, सामाजिक शिक्षणाचा हेतु मनुष्यास स्वावलंबी बनवण्यावरच आहे. स्वावलंबी तर बनलेच पाहिजे. पण त्याही पुढे जाऊन त्यास पुढच्या पायरीची ओळख करुन दिली पाहिजे. परस्परावलंबन कोणत्याही संस्थांमध्ये आपणास दिसतेच आहे. तो निसर्गाचा नियम आहे. पण तो नीटसा न समजल्यामुळेच, किंवा माहिती नसल्यामुळेच, समाजामध्ये अनिष्ट पहावयास मिळते. व्यवसायतील भागीदारांमध्ये वाद निर्माण होणे, आर्थिक भ्रष्टाचार, वैवाहिक जीवनामध्ये उलथापालथ, मुलांना सोडुन देणे, घटस्फोट, विवाह बाह्य संबंध या सा-या समस्यांचे मुळ आहे, अक्षुण्ण प्रगल्भेची पुढची पायरी विषयी अजिबात माहिती नसणे.

अक्षुण्ण प्रगल्भता, हा काही नवीन शोध नाहीये. हा निसर्ग नियम आहे. व याचे प्रत्यंतर तुम्हाला निसर्गात पावलोपावली येईल.

आता, या लेखाच्य सुरुवातीस मी सांगितलेली लघुकथा (कासव व सुगरण पक्षी) पुन्हा वाचा व अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करा.

आपण आपल्या या लेखमालेमध्ये, याच अक्षुण्ण प्रगल्भतेवर आधारीत सात अशा सवयींबाबत शिकणार आहोत , की नैसर्गिक आहेत. निसर्गदत्त आहेत. पण आपल्या सामाजिक अयोग्य अशा स्पर्धात्मक जीवनशैलीमध्ये आपण या सवयी विसरुन बसलो आहोत.

आपल्या पुढील लेखामध्ये आपण या नित्य-नुतन तरीही अनादी अशा जीवन-तत्वांविषयी जाणुन घेऊ की जी आपल्या जीवनाला लाईटहाऊस प्रमाणेच दिशा दाखवतात.

लेख आवडल्यास अवश्य तुमचा अभिप्राय कळवा, शेयर, फॉरवर्ड करा.

कळावे

आपलाच

महेश ठोंबरे – 9923062525

Business leader and motivator

आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525

मी एक यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे कारण नक्की काय आहे, हेच मी “श्रीमंतीचा महामार्ग” या लेखमालेतुन लिहित आहे. तुम्हाला माझ्या सोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा, व्यवसाय, तोही कमीत कमी भांडवलामध्ये सुरु करायचा असेल व माझ्या सारखेच (किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त) यश मिळवायचे असेल तर मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiI0NTYyIiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiMjk1MCIsImFjdGlvbnMiOiI2MSIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfMjY4NjU4Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzI2ODY1OCIsImNvbm5lY3RfaGFzaCI6ImNlZDM1MzAzZDJmOGU1ZWU3MWQxNjE4MmRkMWQ1NTIwIn0=

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *