आम्ही यशवंत किर्तीवंत

शुभेच्छांचा वर्षाव म्हणजे नक्की काय हे मला मागच्या काही दिवसांमध्ये आम्हाला समजले. भरभरुन शुभेच्छा आपणा सर्वांकडुन आम्हा दोघांना मिळाल्या.

निमित्त होते आम्ही नुकत्याच गाठलेल्या एका मैलाच्या दगडाचे. प्रसंग असा होता एकुण.

१५००० च्या आसपास व्यावसयिकांचा जमावडा, तोही बेंगलुरु मधील एका जगप्रसिध्द पंचतारांकित आलिशान अशा बेंगलोर इंटरनॅशनल एक्झीबीशन सेंटर मध्ये. एक भव्य स्टेज व त्यावर एक तितकाच भव्य पडदा की ज्यावर आतषबाजीचे विविध आकार, विविध रंगामध्ये उमटत होते. आम्ही दोघे ही ऑडीटोरियम मध्ये त्याच १५००० लोकांमध्ये एका ठिकाणी बसलो होतो. आमच्या शेजारी कोण बसले होते हे आम्हाला माहित नव्हते की त्यांना माहित नव्हते की महेश व पल्लवी कोण ते. म्हणजेच काय तर आम्ही त्याच १५००० लोकांच्या गर्दीचा एक, कुणाच्याही लक्षात न येणारा एक क्षुल्लक भाग होतो. कार्यक्रम पुढे सरकत होता, सुत्रसंचालन करणा-या व्यक्तिकडुन विविध प्रकारची माहिती सांगितली जात होती. अत्यंत प्रभावी व जीवनाला नवीन दिशा देणारे ज्ञान-तत्वज्ञानच जणु आमच्या कानावर पडत होते. मग सुरु झाले रीवार्ड व रेकगनिशन!

देशभरात किमान माझ्य सारखे काम करणारे ४० हजाराच्या आसपास लोक आहेत. त्यातही एका विशिष्ट उत्पन्न व कार्यविस्ताराच्या मापदंडाने १५००० लोक असे आहेत की जे या मल्टीनॅशनल, मल्टीकल्चरल कंपनीमध्ये एका विशिष्ट पात्रतेवरुन आणखी वरील स्तरावर उडी घेऊ शकणार होते. यात दहाच लोकांची निवड, ती देखील त्यांनी मागील वर्षभरात केलेल्या कामावरुन, कमावलेल्या पैशावरुन होणार होती.  सर्वांनाच उत्सुकता होती की उपस्थित असलेल्या १५००० लोकांपैकी ते दहा जण (दहा कपल्स) कोण आहेत की ज्यांनी सर्वोत्तम काम केले आहे मागील वर्षात.

कार्यक्रमाचा जो काही झगमगाट होता, जे काही बॅकग्राऊंड म्युजिक सुरु होते, ज्या पध्दतीने एकुण तामझाम होता त्यामुळे मी इतका प्रभावित झालो की माझे भानच हरपले होते. सुत्रसंचालकांनी दहाव्या क्रमांकपासुन नावे पुकारायला सुरुवात केली. दहावे, नववे, आठवे असे होत होते. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट, जल्लोष, अभिनंदन न थांबता सुरु होते. तिसरा, दुसरा व पहिला क्रमांक प्राप्त करणा-यांना स्टेजवर बोलावुन सन्मानित केले जाणार होते. तिसरा क्रमांक ज्यांनी पटकावला त्यांचा सत्कार झाला, ते स्टेजच्या खाली उतरले आणि माझ्या कानावर जे शब्द आले ते ऐकुण मी अक्षरशः जागच्या जागी स्तब्ध्द्च झालो. माझ्या हात-पायांना अक्षरशः कंप सुटला. आनंदातिशयाने मी निशब्द, निश्चल झालो.

सुत्रसंचालकांनी माझे व पल्लवी (माझी साथीदार-पार्टनर-पत्नी) चे नाव पुकारले होते. सपुर्ण भारतात ४० हजार बिजनेस असोसिएट्स मधुन, या पात्रतेच्या अटी पुर्ण करुन आम्ही दोघे आख्ख्या भारतात दुस-या स्थानावर होतो.

आम्ही दोघेही स्टेजवर गेलो. आमच्या भोवती कॅमेरे फिरु लागले, स्पॉट लाईट्स आमच्या वर होत्या. स्टेजच्या मध्यभागी आम्ही होतो. सर्वांचे लक्ष आमच्याकडे होते.स्टेजवरील त्या मोठ्या पडद्यावर देखील आमचेच लाईव्ह टेलीकास्ट सुरु होते. आम्ही सेलिब्रिटी असल्यासारखे सर्व जण जल्लोष करीत होते. टाळ्यांचा कडकडाट सुरुच होता. मी भयंकर आनंदी झाल्याचा अनुभव घेत होतो. तरीही मी शांत होतो. स्थिर राहण्याचा प्रयत्न करीत होतो. पण तरीही, माझ्या चेह-यावरील आनंद काही लपत नव्हता. हिच अवस्था पल्लवीची झाली. आजतागायत आम्ही अनेक रीवार्ड्स व रेकग्निशन्स घेतले आहेत. या ग्लॅमरचा आम्हाला अनुभव आहेच तरीही आजच्या या रीवार्ड मुळे आनंदाचे भरतेच आले.

No goal is unachievable,If you are with doing the right things with the right people at right time. Thank you 😊

Posted by Mahesh Thombare on Saturday, May 18, 2019

याचे कारण ही तसेच आहे. संपुर्ण भारतात काम करणा-या ४० हजार लोकांपैकी सर्वोत्तम काम करणा-या २४६७ लोकांमध्ये आमचा समावेश झाला. आमच्या उत्पन्नाने आमच्या आजपर्यंतच्या उत्पन्नापैकी उच्चांक गाठलेला आहे. व यापुढे आमचे उत्पन्न कधीही कमी होणार नाही. अशी अनेक कारणे आहेत मी आनंदी असण्याची.

माझ्या साठी हे यशाचे शिखरच आहे. इथे पोहो्चण्यासाठीचा रस्ता अवघड जरी असला तरी रस्ता आहे मात्र पक्का खात्रीचा. फक्त या रस्त्याने सतत चालत राहणे आपणास करावे लागते.

आजच माझ्या एका मित्राच्या फेसबुक वॉल वर एक सुंदर वाक्य वाचल मी.

Honesty and integrity are absolutely essential for success in life – all areas of life. The really good news is that anyone can develop both honesty and integrity.


हे दोन्ही आत्मसात करणे व सतत ते आणि इतर ही गुण वृध्दींगत करणे हाच यशाचा मुलमंत्र आहे. पैसा कमावणे हे ध्येय कधीही नव्हते आमचे. पण आपण जे काही करीत आहोत ते सर्वोत्तम झाले पाहिजे असा आग्रह आम्ही नेहमी ठेवला. थ्री इडियट्स मधील डायलॉग तुम्हाला आठवला असेल कदाचित

काबिल बनो कायमाबी झक मारके पीछे आयेगी !!

असो. बोलण्यासारखे, लिहिण्यासारखे खुप काही आहे. व ते मी माझ्या लेखांच्या माध्यमातुन करीत आहेच व इथुन पुढे देखील करीत राहील.

यशाच्या या शिखरावरुन आम्हाला, यशाच्या “त्या” सर्वोच्च शिखरावर जायचे आहे. व आम्ही जाणारच आहोत याची आम्हाला खात्री आहे कारण आम्ही चालत राहण्यावर, चढाई करण्यावर विश्वास ठेवणारे आहोत. सोबतच मोठ्यांचे आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा देखील आम्हाला अधिक बळ देईल याची देखील आम्हाला खात्री आहे.

तुम्हा सर्वांचे मनापासुन आभार, धन्यवाद!

कळावे

तुमचेच

महेश व पल्लवी ठोंबरे.
आमच्या या पुरस्कार सोहळ्याचा व्हिडीयो पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा

Facebook Comments

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *