असे झाले रॉबर्ट कायोसाकी मल्टीमिलेनीयर…

नमस्कार मित्रांनो

कोरोना जनित कोविड-१९ या साथीच्या आजाराच्या पार्श्वभुमिवर, आपण सारेच अजुनही आपापल्या घरातच आहोत. लॉकडाऊन ने हे सारे जग जणु थांबल्यासारखे झाले आहे. भविष्य कसे असेल? मार्केट कसे असेल? अर्थव्यवस्था कशी असेल? बाजारात तेजी असेल की मंदी असेल? रोजगारांची अवस्था कशी असेल? स्वयंरोजरागांची अवस्था कशी असेल? असे अनेक प्रश्न अनेकांसमोर आ वासुन उभे आहेत. कालच स्पाईस एयरवेज या विमान कंपनी ने दोन महिने कामगारांचे पगार केले नसल्याची बातमी देखील आपण पाहिली. अजुन काही बातम्या तर काही अफवा आपल्या मनात अधिकच संभ्रम निर्माण करीत आहेत.

या सा-या संभ्रमात आपण नक्की कसे रहायला हवे? आपली मनोभुमिका कशी हवी? आपली स्वतःची आर्थिक निती कशी हवी? की जेणे करुन येणा-या बदलत्या काळात आपण तग धरु शकु! असेच आहेत ना प्रश्न आपले? माझ्या मित्रमंडळींनी या लॉकडाऊन दरम्यान मला जे काही प्रश्न अर्थव्यवस्था व बाजारातील संभाव्य तेजी अथवा मंदी या विषयावर विचारले ते काहीसे असेच आहेत.

तुमचेदेखील प्रश्न असेच असतील तर सर्वात आधी मी तुम्हाला एकदा तुमच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला देईल. तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरे शोधायला जाल त्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. पण जर प्रश्नच चुकीचे किंवा मुळ समस्येचे समाधान करणारे नसतील तर उत्तरे तरी कशी काय बरे तुमचे समाधान करु शकतील बरे?

भारत हा देश अपरिमीत शक्यतांचा, सभांवनांचा, क्षितिजांचा, संध्यांचा देश होता, आहे व भविष्यात देखील असेल. आपणाकडे मनुष्यबळ असंख्य आहे, त्यातही तरुणांची संख्या सर्वात जस्त असलेला आपलाच देश आहे. जितकी लोकसंख्या जास्त आहे तितकीच बाजारपेठ देखील खुप मोठी ताकद आहे भारताची. त्यामुळे कोरोना पश्चात जगात जे पडसाद उमटतील त्यांची फारशी झळ भारताला बसणार नाही. भारताची अर्थव्यवस्था केंद्रीत नसुन अजुनही ग्रामीण जीवनात तिची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. व हेच कारण आहे भारतासाठी ही आपत्ती एक इष्टापत्ती ठरु शकण्याची.

या सर्व उलथापालथी मध्ये एक जागरुक उद्योजक या नात्याने तुम्ही कशा पध्दतीने स्वतःला सिध्द कराल. तुम्ही कशा पध्दतीने स्वतःला घडवाल? तुम्ही कशा पध्दतीने या इष्टापत्तीचा उपयोग स्वतःचे भविष्य उज्वल करण्यासाठी कराल हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबुन आहे.

कोरोना आपत्ती असो अथवा नसो, तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर काही गोष्टी मुद्दामहुन शिकाव्या लागतील. या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला कोणत्याही विद्यापीठात शिकायला मिळणार नाहीत. कोणत्याही शाळेत अथवा कॉलेजात देखील तुम्हाला या गोष्टी शिकविल्या जात नाहीत. या गोष्टी प्रत्यक्ष व्यवसायातुनच शिकावयास मिळतात. तसेच या गोष्टी तुम्हाला शिकवणारा देखील असावा लागतो की ज्याने अशा गोष्टी नुसत्या शिकल्याच नाहीत तर प्रत्यक्ष अमलात आणुन स्वतःच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवुन आणला आहे.

मी माझ्या विविध लेखांच्या माध्यमातुन अशाच प्रकारचे शिक्षण सर्वांना देत असतो. याच्याही पुढील प्रत्यक्ष शिक्षण माझ्या टीममध्ये , स्वतःचा भविष्य स्वतः घडवण्यात विश्वास असलेल्या असोसिएट्स ला देत असतो.

आज मी तुम्हाला एक मुलमंत्र सांगणार आहे जागतिक अर्थव्यवस्थेचा. हो हा मुलमंत्र त्रिकालाबाधित आहेत, देश व कालाच्या सीमा या मंत्राला नाहीत. हा मंत्र अमेरिकेला लागु होतो तसाच तो भारताला देखील लागु होतो. हा मंत्र मागील शतकात लागु होता तसा तो येणा-या प्रत्येक सहस्त्रकात लागु होईल. हा एक श्वाश्वत मंत्र आहे.

अमेरिकेतील एक उद्यमी, निवेशक, मोटीव्हेटर, पब्लिक स्पीकर, मेंटर , लेखक असलेल्या श्री रॉबर्ट कायोसाकी यांनी जगाच्या अर्थ शास्त्राचा एक नियम, एक मंत्र स्वतःच्या अभ्यासाने,अनुभवाने मांडला आहे. या मंत्रात त्यांचा स्वतःचा अनुभव असल्याने या मंत्राला शक्ति देखील प्राप्त झाली आहे. या मंत्रशक्तिच्या जोरावर जगभरात हजारो लाखो लोकांनी स्वतःच्या आयुष्यात आमुलाग्र बदल करीत आर्थिक आघाडीवर खुप मोठ मोठ्या उपलब्ध्या मिळवल्या आहेत.

त्यांनी त्यांचा हा मंत्र त्याम्च्या एका सुप्रसिध्द पुस्तकात सर्व प्रथम मांडला. त्या पुस्तकाचे नाव आहे रिच डॅड-पुअर डॅड.

कल्पना करा की तुम्ही आजच असे ठरवताय की आजपासुन काम करायचे नाही. आज आपण जसे घरात बसुन आहोत अगदी तसेच घरात बसुन रहायचे. तर या स्थितीमध्ये तुम्ही स्वतःलच एक प्रश्न विचारा. तो प्रश्न असा आहे ,”मी आणि माझे कुटुंब अजुन किती दिवस, किती महिने , किती वर्षे आजपर्यंत केलेल्या बचतीवर जगु शकतो?”

मी तुम्हाला आता जो प्रश्न वर विचारला आहे तो दुसर तिसर काही नसुन संपत्ती म्हणजे काय? असाच प्रश्न आहे.

अमेरिकेतील एक उद्यमी, निवेशक, मोटीव्हेटर, पब्लिक स्पीकर, मेंटर , लेखक असलेल्या श्री रॉबर्ट कायोसाकी यांनी जगाच्या अर्थ शास्त्राचा एक नियम, एक मंत्र स्वतःच्या अभ्यासाने,अनुभवाने मांडला आहे. या मंत्रात त्यांचा स्वतःचा अनुभव असल्याने या मंत्राला शक्ति देखील प्राप्त झाली आहे. या मंत्रशक्तिच्या जोरावर जगभरात हजारो लाखो लोकांनी स्वतःच्या आयुष्यात आमुलाग्र बदल करीत आर्थिक आघाडीवर खुप मोठ मोठ्या उपलब्ध्या मिळवल्या आहेत. नुकत्याच झालेल्या एक सर्वेक्षणानुसार कायोसाकी साहेबांची संपत्ती ८० दशलक्ष डॉलर एवढी आहे. अमेरिकेतील काही अतिश्रीमंत व्यक्तिमध्ये यांची गणना होते.

चला त्यांच्या विषयी आपण काही रोचक व रंजक माहिती घेऊयात.

त्यांच्या विषयी पहिली महत्वाची गोष्ट आपण जाणुन घेतली पाहिजे ती ही की श्री कायोसाकी एका अतिसामान्य कुटुंबातुनच आलेले होते. त्यांच्या कुटुंबाला देखील उत्पन्न व खर्चाच्या चिंता, जशा आपल्या कुटूंबाला आहेत तशाच होत्या. घराचे हफ्ते, कर्जाचे हफ्ते, विविध बिले, करमणुक, हॉटेलिंग, मुलांचे शिक्षण, विविध चैनीच्या वस्तु अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचे सारे उत्पन्न गडप होऊन जायचे. वडील एका विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते, चांगला पगार ही होता, पण त्यांचे वडील आयुष्यभर गरीबच राहिले.  गरीब याचा अर्थ इथे ‘श्रीमंत नाही’ असा घ्यायचा आहे. खायला अन्न मिळत नाही या अर्थाने ते गरीब नव्हते. ते गरीब होते असे रॉबर्ट म्हणतात ते अशा अर्थाने की त्यांनी कधीही श्रीमंती पाहिली नाही. १९४७ मध्ये जन्म झालेले रॉबर्ट यांना त्यांच्या वडीलांनी हवाई बेटावरील सर्वात महागड्या व नावलौकिक असलेल्या शाळेत ॲडमिशन घेतले. त्या शाळेत त्या बेटावरील अनेक मान्यवरांची मुले शिकायची. अनेक गर्भश्रीमंत , उद्यमी, व्यापारी, उद्योजक, पेशा असलेल्या या लोकांच्या मुलांसोबत रॉबर्ट यांचे कधी जमले नाही. याचे कारण असे की रॉबर्ट यांच्या कडे त्या काळातील नवनवीन खेळणी, सायकली नसायचे. त्यांच्या वडीलांना असे खेळणी व सायकल आदीवर खर्च करने परवडत नव्हते. त्यामुळे श्रीमंतांच्या मुलांनी रॉबर्ट पासुन लांब राहणेच पसंत केले. दहा वर्षाच्या रॉबर्ट ला हा भेदभाव समजलाच.

त्याने एकदा आपल्या वडीलांनाच सरळ प्रश्न विचारला. वडीलांनी अनेक विद्यापीठांतुन डॉक्टरेट मिळवली होती व अनेक पदव्या देखील त्यांच्याकडे होत्या. इतके ज्ञान त्यांच्याकडे होते की ते कोणत्याही प्रश्नाचे सहज उत्तर देऊ शकले असते. पण रॉबर्ट च्या या प्रश्नाचे उत्तर मात्र रॉबर्टला पटेल असे त्यांना देता आले नाही.

तो प्रश्न होता,”बाबा, काय तुम्ही श्रीमंत कसे होता येईल हे सांगु शकता का?”

या प्रश्नावर  वडीलांनी असे उत्तर दिले की बाळा, खुप अभ्यास कर, डिग्री घे म्हणजे तुला चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळेल. असे झाले की मग तु सुरक्षित राहशील. त्याच्या वडीलांनी जे उत्तर दिले ते म्हणजे वडील जसे आयुष्य जगले तेच आयुष्य ते मुलाला जगण्यास शिकवित होते. त्यांच्या ॲटीट्युड मध्येच श्रीमंती नव्हती. त्यांना कधीही आर्थिक सुरक्षिततेच्या पुढे काय आहे हे जाणुन घ्यावेसे वाटले नाही. त्यामुळेच रॉबर्ट त्यांच्या पुस्तकात स्वतःच्या वडीलांचा उल्लेख पुअर डॅड म्हणजे गरीब वडील असा करतात. प्रत्यक्षात रॉबर्टचे वडील आर्थिक गरीब नव्हतेच मुळी. सरासरी पेक्षा जास्त कमाई असलेले ते एक प्राध्यापक होते. शेवटी त्यांची आर्थिक स्थिती मात्र डबघाईची होती.

रॉबर्ट चा एक मित्र होता. त्याचे नाव माईक. माईक त्याच शाळेत शिकतो जिथे रॉबर्ट शिकत होता. माईकचे वडील एक व्यवसायिक आहेत. कायोसाकी माईकच्या वडीलांनाच त्यांच्या पुस्तकामध्ये रिच डॅड म्हणजे श्रीमंत वडील असे संबोधतात. जेव्हा रॉबर्ट व माईकच्या वडीलांची ओळख झाली तेव्हा माईकचे वडील श्रीमंत नव्हते. तेव्हापासुनच माईकच्या वडीलांनी माईक व रॉबर्ट या दोघांनाही मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. अगदी थोड्याच वर्षामध्ये हवाई मधील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये रिच डॅड यांचे नाव घेतले जाऊ लागले.

रिच डॅड ने रॉबर्ट च्या ज्ञानात बरीच भार घातली. आर्थिक ज्ञानाची पायाभरणीच जणु रिच डॅड ने केली. रिच डॅड ने शिकविलेल्या सर्वात महत्वाच्या धड्यांपैकी पहिला सर्वात महत्वाचा धडा म्हणजे ॲसेट व लायेबिलिटी हे दोन्ही समजणे. हे दोन्ही परखणे. मनुष्य करता सवरता झाला की त्याच्या हातात पैसा खेळायला सुरुवात होतेच होते. पण आलेल्या पैशाचे करायचे काय हे माहित नसणे म्हणजेच ॲसेट व लायेबिलिटी मधील फरक काय आहे हे माहित नसणे हे होय. व त्यामुळे कमाविलेल्या पैशाने मनुष्य ॲसेट खरेदी करण्याऐवजी लायेबिलिटी खरेदी करतो व मग पुढे त्या लायेबिलिटीज म्हणजे देणी भागविण्यासाठी पैसा कमावित बसतो. रॉबर्ट कायोसाकी म्हणतात की पैशाने ॲसेट खरेदी करा. ॲसेट म्हणजे अशी खरेदी की जी तुमच्यावर भार आणणार नाही. उलट जी तुम्हाला अधिक पैसा कमाविण्याचे एक साधन बनेल.

याच्याच पुढे कायोसाकी म्हणतात की श्रीमंत व गरीब यांच्यामधील फरक स्पष्ट आहे. श्रीमंत लोक ॲसेट म्हणजे संपत्ती खरेदी करतात तर मध्यमवर्गीय लोक लायेबिलिटीज खरेदी करतात. आणि एवढे करुनही मध्यमवर्गीय व गरीब लोकांस वाटते की त्यांनी जे काही खरेदी केले आहे ते म्हणजे ॲसेट्स आहेत. आर्थिक अस्थैर्य असण्याच्या कारणांपैकी एक महत्वाचे कारण आहे की ॲसेट व लायेबिलिटी यातील फरक न समजणे.

ॲसेट म्हणजे अशी वस्तु की जी माझ्या खिशात पैसे आणील. तर लायेबिलिटी अशी वस्तु की जी माझ्या खिशातुन पैसे काढुन घेत राहील. एखाद्य मध्यमवर्गीय माणसाचे उदाहरण घेऊ. महिनाभार काम करुन येणारा पगार तो अन्न, दवाखना, प्रवास, करमणुक, आदी गोष्टींवर खरेदी करतो. शेवटास त्याच्याकडे ॲसेट म्हणजेच मालमत्ता म्हणुन काहीच शिल्लक राहत नाही पण लायेबिलिटीज मात्र असतातच असतात. जसे गाडीचा हफ्ता, घराच्या कर्जाचा हफ्ता, विविध युतीलिटी बिले, कर, इत्यादी. या विरुध श्रीमंत माणसाचा ॲटीट्युड असतो. यामध्ये आलेला पैसा अशा वस्तु मध्ये लावला जातो जिथुन पुन्हा पैसा येत राहतो. त्यातही गम्मत अशी की ते स्वतः अगदी गाढ झोपेत जरी असले तरीही त्यांची गुंतवणुक त्याच्यासाठी पैसा कमावित राह्ते.

ॲसेटसची उदाहरणे अशी देता येतील, जसे असे व्यवसाय, उद्योग की ज्यामध्ये तुमच्या प्रत्यक्ष हजेरीची गरज नाही. स्टॉक मार्केट, बॉन्ड, म्युच्युअल फंडस, पैसा कमावुन देणारे रीयल इस्टेट, रॉयल्टीज, नोट्स, कम्पाऊंड कमाई, इत्यादी.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे पुअर डॅड ची कमाई जरी जास्त असली तरी आलेला पैसा प्राथमिकतेने गरजा संपवुन ॲसेट खरेदी करण्यासाठी खर्च करण्यासाठी त्यांनी वापरला नाही. याचाच परिणाम असा होतो की सुरुवातीस सारखेच उत्पन्न व खर्च नंतर कमालीचे बिघडते व खर्च कमाईपेक्षा जास्त होऊन जातात. याचे कारण हेच असते की त्यांनी कधीही ॲसेट खरेदी केलेले नसतत व निव्वळ लायेबिलिटीज खरेदी केलेल्या असतात.

हा परिणाम आहे उत्पन्न व खर्च एक सारखेच असण्याचा व ॲसेट म्हणजेच मालमत्ता लायेबिलिटिज पेक्षा कमी असण्याचा. याचीच परिणती शेवटी पुअर डॅडच्या कर्जबाजारीपणात जाण्यात होते. त्याम्चे कर्ज पुअर डॅडच्या मृत्युनंतर ही तसेच राहते.

याच्या विपरीत रिच डॅड चा आर्थिक ताळेबंद हेच दाखव्तो की त्यांनी आयुष्य गुण्तवणुक करण्यामध्ये व लायेबिलिटीज कमी करण्यामध्ये घालवले. त्यामुळेच त्यांचे उत्पन्न त्यांच्या खर्चांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे व ॲसेट देखील लायेबिलिटीज पेक्षा जास्तच आहेत. आणि कायोसाकीं यांच्या दृष्टीने श्रीमंत अधिक श्रीमंत होण्याचे हेच खरे कारण आहे. त्यांचे ॲसेट्स त्यांच्या उत्पन्नात वाढ करीतच राहतात. व त्या तुलनेने त्यांची खर्च व देणी मात्र खुपच कमी असतात.

तुम्ही पाहिल की दोन्ही डॅड म्हणजे रिच डॅड व पुअर डॅड, दोघांनी कष्ट केले. पण त्यांचा ॲटीट्युड मात्र विरुध्द होता.  एक म्हणाले खुप अभ्यास कर म्हणजे तुला चांगली कंपनी मध्ये नोकरी मिळेल. तर दुसरे म्हणाले खुप अभ्यास कर म्हणजे एक दिवस तु एखादी कंपनीच खरेदी करु शकशील. गरीब डॅड म्हणतात की मी श्रीमंत नाही याचे कारण मला मुले आहेत. तर श्रीमंत डॅड म्हणतात की मी श्रीमंत झालोच पाहिजे कारण मला मुले आहेत.

एक म्हणतात जेव्हा पैशाची गोष्ट असते तेव्हा काळजीपुर्वक हाताळ. अजिबात जोखिम घेऊ नकोस. तर दुसरे म्हणतात जोखिम कशी हाताळायची हे शिक. एक म्हणतात की अमुक तमुक मला परवडत नाही तर दुसरे म्हणतात अमुक तमुक मला परवडेल इतके माझे उत्पन्न मी कसे काय वाढवु शकतो याचा मी विचार केला पाहिजे.

दोघेही शिक्षणाच्या बाबतीत तितकेच आग्रही होते. शिक्षण मह्त्वाचे आहे असे त्यांचे म्हणणे होतेच. काही गोष्टी मात्र रॉबर्ट कायोसाकी स्पष्टपणे म्हणतात की, शाळा कॉलेजांत शिकविल्या जातच नाहीत.  त्यातील एक गोष्ट अशी की सामान्य जनता सदैव फक्त दोनच भावनांच्या विळख्यात अडकलेले जीवन जगा असते. तयतील एक आहे भय व दुसरे आहे स्वार्थ. हा विळखा त्यांना उठा-काम करा, हफ्ते भरा, बिल्स भरा, खा-प्या-झोपा आणि पुन्हा उठा-काम करा….अशा कधीही न संपणा-या चक्रामध्ये अडकवुन ठेवते. सामान्य जनतेकडून हे सारे करुन घेण्याचे काम करते भय.

रॉबर्ट कायोसाकी यांच्या मते जगातील नव्वद टक्के लोक या प्रकारात मोडतात की जे वरील चक्रामध्ये अडकलेले आहेत. आणि हे चक्र व ही टक्केवारी अशीच राहणार. कधी नव्वद पैकी काही लोक १० टक्क्यांमध्ये जाणार तर कधी १० % मधील काही लोक नव्वद मध्ये येणार. हे सर्वस्वी आपणावर आहे की आपण नव्वद टक्क्यांमध्ये रहायचे की दहा टक्क्यांमध्ये रहायचे.

रॉबर्ट कायोसाकी यांनी आणखी एक भन्नाट पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे The Cash Flow Quadrant. या पुस्तकात त्यांनी जागतिक अर्थविश्वाचा उलगडा केला आहे, तोही अगदी थोडक्यात. ज्यांना हे समजले त्यांना त्याचा लाभ नक्कीच होतो यात शंका नाही. या पुस्तकात त्यांनी ESBI हे अर्थशास्त्राचे मॉडेल मांडले आहे.

रॉबर्ट कायोसाकी यांनी आथिक निकषांवर मनुष्यांना चार भागात विभागले आहे. त्यातील पहिले दोन प्रकार नव्वद टक्क्यात मोडतात. याला ते ई – E – Employment, प्रकार असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे , एस S – Self Employment म्हणजे स्वयंरोजगार असणारे लोक. या दोन्होंमध्ये मुलतः फार फरक नसतो. नोकरी, मजुरी करणारा त्यांच्या लायबिलिटीज साठी कंपनी किंवा मालकावर अवलंबुन असतो तर स्वयंरोजगार करणारा स्वतः काम करतो. त्याने काम करणे बंद केले तर त्याचे उत्पन्न बंद होणार याची त्याला पक्की माहिती असते. हे दोन्हीही नव्वद टक्के प्रकारात मोडणारे आहेत. एखाद्या गोम या सरपटणा-या किटकाच्या असंख्य पायांसारखे हे लोक काम करीत असतात. त्यातील एखाद्या पायाने काम करणे बंद केले तर त्या पायाचे अस्तित्व तेवढे संपते पण गोमचे पुढे सरकणे थांबत नाही.

रॉबर्ट कायोसाकी पुढचा प्रकार सांगतात तो म्हणजे B – Business.  हे लोक म्हणजे व्यवसाय करणारे. यांच्याकडे काम करणारी टीम असते. त्यांना प्रत्यक्ष काम करण्याची गरज नसते. अनेक दिवस त्यांनी काम नाही केले तरीही त्यांचे फार काही बिघडत नाही. तुम्हाला माझा य लेखाचा सुरुवातीचा प्रश्न आठवला का?

तर शेवटचा प्रकार आहे I – Investment. पैशाने पैसा कमाविणारे लोक या प्रकारात मोडतात. या लेखात मी रिच डॅड च्या ज्या काही शिकवणी सांगितलेल्या आहेत त्या सर्व तंतोतंत पाळणारे म्हणजेच या प्रकारातील लोक.

रॉबर्ट कायोसाकी यांनी सुरुवात जरी E या प्रकारातुन केली असेल तरी त्यांनी गाठले आहे I हा प्रकार. सध्या ते पैशासाठी काम करीत नाहीत तर पैसा त्यांच्या साठी काम करतोय. आणि हे असे घडले रॉबर्ट कायोसाकी!

रॉबर्ट कायोसाकी यांच्या या मॉडेल नुसार, जर तुम्हाला असे ठरवायचे असेल की तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता तर तुमचे उत्तर काय असेल?

कोरोना नंतर काय परिस्थीती असेल? मार्केट तेजीत असेल की नाही? अर्थस्थिती कशी असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधायचे काम सरकार करत आहे! आपण काय केले पाहिजे?

आपण आपल्या साठी असे अर्थशास्त्र विकसित केले पाहिजे की ज्यामध्ये आपण हळुहळु नव्वद टक्क्यांमधुन दहा टक्क्यांमध्ये जाऊ. व सरते शेवटी रॉबर्ट कायोसाकी मॉडेल नुसार आपण शेवटच्या प्रकारात मोडणारे झालो पाहिजे.

आणि आनंदाची गोष्ट अशी की, माझ्याकडे अशी सिध्द केलेली यंत्रणा आहे की जी व्यक्तिला उत्पन्नाच्या बाबतीत नुसतीच सुरक्षित नाही तर स्वतंत्र देखील बनविल.

तुम्हाला जर माझ्यसोबत या प्रवासात सहभागी व्हायचे असेल तर अवश्य माझ्या संपर्क करा.

कळावे

आपलाच

महेश ठोंबरे – 9923062525

Business leader and motivator

आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525

मी एक यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे कारण नक्की काय आहे, हेच मी “श्रीमंतीचा महामार्ग” या लेखमालेतुन लिहित आहे. तुम्हाला माझ्या सोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा, व्यवसाय, तोही कमीत कमी भांडवलामध्ये सुरु करायचा असेल व माझ्या सारखेच (किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त) यश मिळवायचे असेल तर मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiY2l0eSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiUHVuZSIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJzZWxlY3RsaXN0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsImxhYmVsX2RlbGltIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJpY29uX2NsYXNzIjoiIiwiaWNvbl9zaXplIjoiIiwiaWNvbl9jb2xvciI6IiIsInRlcm1zIjoiIiwib3B0aW9ucyI6W3sibmFtZSI6IlB1bmUiLCJsYWJlbCI6IlB1bmUgLSBcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJBaG1lZG5hZ2FyIiwibGFiZWwiOiJBaG1lZG5hZ2FyIC0gXHUwOTA1XHUwOTM5XHUwOTJlXHUwOTI2XHUwOTI4XHUwOTE3XHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiU2hpcmRpIiwibGFiZWwiOiJTaGlyZGkgLSBcdTA5MzZcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NGRcdTA5MjFcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJOYXNoaWsiLCJsYWJlbCI6Ik5hc2hpayAtIFx1MDkyOFx1MDkzZVx1MDkzNlx1MDkzZlx1MDkxNSJ9LHsibmFtZSI6IkF1cmFuZ2FiYWQiLCJsYWJlbCI6IkF1cmFuZ2FiYWQgLSBcdTA5MTRcdTA5MzBcdTA5MDJcdTA5MTdcdTA5M2VcdTA5MmNcdTA5M2VcdTA5MjYifSx7Im5hbWUiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIiwibGFiZWwiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIC0gXHUwOTM1XHUwOTIxXHUwOTE3XHUwOTNlXHUwOTM1IFx1MDkyZVx1MDkzZVx1MDkzNVx1MDkzMyJ9LHsibmFtZSI6IlRhbGVnYW9uIiwibGFiZWwiOiJUYWxlZ2FvbiAtIFx1MDkyNFx1MDkzM1x1MDk0N1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkxvbmF2bGEiLCJsYWJlbCI6IkxvbmF2bGEgLSBcdTA5MzJcdTA5NGJcdTA5MjNcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MzJcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJLaG9wb2xpIiwibGFiZWwiOiJLaG9wb2xpIC0gXHUwOTE2XHUwOTRiXHUwOTJhXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNmIn0seyJuYW1lIjoiRmFsdGFuIiwibGFiZWwiOiJQaGFsdGFuIC0gXHUwOTJiXHUwOTMyXHUwOTFmXHUwOTIzIn0seyJuYW1lIjoiQWtvbGEiLCJsYWJlbCI6IkFrb2xhIC0gXHUwOTA1XHUwOTE1XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQW1yYXZhdGkiLCJsYWJlbCI6IkFtcmF2YXRpLSBcdTA5MDVcdTA5MmVcdTA5MzBcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MjRcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJCZWVkIiwibGFiZWwiOiJCZWVkIC0gXHUwOTJjXHUwOTQwXHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiQmhhbmRhcmEiLCJsYWJlbCI6IkJoYW5kYXJhIC0gXHUwOTJkXHUwOTAyXHUwOTIxXHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQnVsZGhhbmEiLCJsYWJlbCI6IkJ1bGRoYW5hIC0gXHUwOTJjXHUwOTQxXHUwOTMyXHUwOTIyXHUwOTNlXHUwOTIzXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQ2hhbmRyYXB1ciIsImxhYmVsIjoiQ2hhbmRyYXB1ciAtIFx1MDkxYVx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0ZFx1MDkzMFx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IkRodWxlIiwibGFiZWwiOiJEaHVsZSAtIFx1MDkyN1x1MDk0MVx1MDkzM1x1MDk0NyJ9LHsibmFtZSI6IkdhZGNoaXJvbGkgIiwibGFiZWwiOiJHYWRjaGlyb2xpIC0gXHUwOTE3XHUwOTIxXHUwOTFhXHUwOTNmXHUwOTMwXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiR29uZGlhIiwibGFiZWwiOiJHb25kaWEgLSBcdTA5MTdcdTA5NGJcdTA5MDJcdTA5MjZcdTA5M2ZcdTA5MmZcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJIaW5nb2xpIiwibGFiZWwiOiJIaW5nb2xpIC0gXHUwOTM5XHUwOTNmXHUwOTAyXHUwOTE3XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiSmFsZ2FvbiIsImxhYmVsIjoiSmFsZ2FvbiAtIFx1MDkxY1x1MDkzM1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkphbG5hIiwibGFiZWwiOiJKYWxuYSAtIFx1MDkxY1x1MDkzZVx1MDkzMlx1MDkyOFx1MDkzZSJ9LHsibmFtZSI6IktvbGhhcHVyIiwibGFiZWwiOiJLb2xoYXB1ciAtIFx1MDkxNVx1MDk0Ylx1MDkzMlx1MDk0ZFx1MDkzOVx1MDkzZVx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IkxhdHVyIiwibGFiZWwiOiJMYXR1ciAtIFx1MDkzMlx1MDkzZVx1MDkyNFx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBDaXR5IiwibGFiZWwiOiJNdW1iYWkgQ2l0eSAtIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBTdWJ1cmJhbiIsImxhYmVsIjoiTXVtYmFpIFN1YnVyYmFuIC0gXHUwOTI4XHUwOTM1XHUwOTQwIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik5hZ3B1ciIsImxhYmVsIjoiTmFncHVyIC0gXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTE3XHUwOTJhXHUwOTQxXHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiTmFuZGVkIiwibGFiZWwiOiJOYW5kZWQgIC1cdTA5MjhcdTA5M2VcdTA5MDJcdTA5MjZcdTA5NDdcdTA5MjEifSx7Im5hbWUiOiJOYW5kdXJiYXIiLCJsYWJlbCI6Ik5hbmR1cmJhciAtIFx1MDkyOFx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDkyY1x1MDkzZVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik9zbWFuYWJhZCIsImxhYmVsIjoiT3NtYW5hYmFkIC0gXHUwOTA5XHUwOTM4XHUwOTRkXHUwOTJlXHUwOTNlXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTJjXHUwOTNlXHUwOTI2In0seyJuYW1lIjoiUGFsZ2hhciIsImxhYmVsIjoiUGFsZ2hhciAtIFx1MDkyYVx1MDkzZVx1MDkzMlx1MDkxOFx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IlBhcmJoYW5pIiwibGFiZWwiOiJQYXJiaGFuaSAtIFx1MDkyYVx1MDkzMFx1MDkyZFx1MDkyM1x1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlJhaWdhZCIsImxhYmVsIjoiUmFpZ2FkIC0gXHUwOTMwXHUwOTNlXHUwOTJmXHUwOTE3XHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiUmF0bmFnaXJpIiwibGFiZWwiOiJSYXRuYWdpcmkgLSBcdTA5MzBcdTA5MjRcdTA5NGRcdTA5MjhcdTA5M2VcdTA5MTdcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJTYW5nbGkiLCJsYWJlbCI6IlNhbmdsaSAtIFx1MDkzOFx1MDkzZVx1MDkwMlx1MDkxN1x1MDkzMlx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlNhdGFyYSIsImxhYmVsIjoiU2F0YXJhIC0gXHUwOTM4XHUwOTNlXHUwOTI0XHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiU2luZGh1ZHVyZyIsImxhYmVsIjoiU2luZGh1ZHVyZyAtIFx1MDkzOFx1MDkzZlx1MDkwMlx1MDkyN1x1MDk0MVx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkxNyJ9LHsibmFtZSI6IlNvbGFwdXIiLCJsYWJlbCI6IlNvbGFwdXIgLSBcdTA5MzhcdTA5NGJcdTA5MzJcdTA5M2VcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MzAifSx7Im5hbWUiOiJUaGFuZSIsImxhYmVsIjoiVGhhbmUgLSBcdTA5MjBcdTA5M2VcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJXYXJkaGEiLCJsYWJlbCI6IldhcmRoYSAtIFx1MDkzNVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkyN1x1MDkzZSJ9LHsibmFtZSI6Ildhc2hpbSIsImxhYmVsIjoiV2FzaGltIC0gXHUwOTM1XHUwOTNlXHUwOTM2XHUwOTNmXHUwOTJlIn0seyJuYW1lIjoiWWF2YXRtYWwiLCJsYWJlbCI6IllhdmF0bWFsIC0gXHUwOTJmXHUwOTM1XHUwOTI0XHUwOTJlXHUwOTNlXHUwOTMzIn1dfSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiI4NDMwIiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiNTgxOSIsImFjdGlvbnMiOiI5MSIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfOTg0ODQ1Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzk4NDg0NSIsImNvbm5lY3RfaGFzaCI6ImE2Mjk2MjA0OWFlNDI0ZTZhMzEyYmIzNmZiY2ZmYWE2In0=

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *