सपनों की उडान

नमस्ते मित्रांनो
आज आपण पाहतोय भारतासहित सर्वच जगावर एका भयानक मंदीचे सावट आले आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या, अनेकांचे
छोटे व्यवसाय के जे मोठ्या उद्योगाण्वर अवलंबुन होते, ते बंद होण्याच्या मार्गावर आहेत. नवीन नोक-या मिळणे दुरापास्त
झाले आहे. प्रत्येकजण खर्च करताना काळजी घेत आहे. व्यावसायिक लोक नवीन संधी शोधत आहेत. पण एकुण चित्रच
नाट्यमय पध्दतीने एवढे निराशाजनक झाले आहे की काहीही करताना आपण खुप विचार करतो.
असे असताना, आम्ही म्हणजे मी, पल्लवी (माझी पत्नी) व माझी ऑरगनायझेशन चक्क परदेशात पंचतारांकीत सुट्ट्यांचा आनंद
घेतोय. किती खर्च होतोय याची आम्हाला पर्वा नाहीये. कारण आमची संपुर्ण सहल आमच्या कंपनी प्रायोजित म्हणजे स्पॉन्सर
केली आहे. आमचे काम म्हणजे लोकांना त्यांच्या त्यांच्या फिटनेस गोल पर्यंत पोहोचण्यास मदत करणे. त्यांना त्यांच्या शरीराचे
वजन कमी करण्यास मदत करणे, मार्गदर्शन करणे. त्यांच्या फिटनेस जर्नी चा ट्रॅक ठेवणे. त्यांना आहार-विहाराबाबतीत वेळोवेळी सुचना देणे. हे काम खरतर अवघड आहे. पण सोपे काम करण्यात मजा तरी कसली. त्यातच जेव्हा आमचे ग्राहक त्यांचे फिटनेस गोल गाठतात तेव्हा त्यांच्या चेह-यावर भन्नाट आत्मविश्वास दिसतो. हा आत्मविश्वास त्यांना त्यांच्या त्यांच्या नोकरी व्यवसायात खुप मदत करतो. विनींग एज ज्याला म्हणतात ते यातुन मिळते. पण यासाठी त्यांना आणि आम्हाला देखील अपार कष्ट घ्यावे लागतात. या कष्टाचा मोबदला आर्थिक व मानसिक समाधानाच्या रुपात आम्हाला मिळतोच. त्याउपर जेव्हा कंपनी अशा पध्दतीने केलेल्या कामाची पावती आंतरराष्ट्रीय सहलीच्या रुपात देते, ते ही चक्क मोफत तेव्हा दुधात साखर टाकल्यासारखे असते. आज माझ्या टीम सोबत मी इस्तांबुल येथे आहे. प्रत्येकाने कष्ट केले आहेत. व त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ देखील मिळाले आहे. यापुढे देखील मिळत राहणार.

जाकुझी बाथ टब मध्ये

जाकुझी बाथ टब मधील भन्नाट अनुभव – सपनोंकी उडान – Istanbul Vacation 2019

हे सर्व साध्य होण्यासाठी आवश्यकता असते, कष्ट करण्याच्या तयारीची व योग्य मार्गदर्शनाची. मी व पल्लवी, माझ्या टीमच्या प्रगतीसाठी सातत्याने झटत असतो. पद्धतशीर, आराखड्यांच्या आधारावर प्रशिक्षणे आम्ही देत असतो. यातुन आमच्या टीमला परिणामकारक काम कसे करावे या विषयी मुद्देसुद माहिती व ज्ञान मिळते.
आमच्या या टीमचे नाव आहे Dreamser to Achievers. स्वप्ने पहावी, महान स्वप्ने पहावी आणि ती पुर्ण करण्यासाठी झटावे. ती पुर्ण करण्यासाठी स्वतःला सक्षम बनवावे आणि आपल्या टीम ला देखील सक्षम बनवावे. हा आमच्या कामाचा मुलमंत्र आहे.
तुम्ही देखील महान स्वप्ने पाहत असाल तर; माझ्या या Dreamser to Achievers टीम मध्ये तुमचे स्वागत आहे. आमच्या सोबत काम करण्यासाठी शिक्षणाची अट नाही, भाषेची अट नाही, भारी व्यक्तिमत्वाची गरज नाही, मोठ्या गुण्तवणुकीची गरज नाही. गरज आहे फक्त महान स्वप्ने पाहण्याची.

*सपनोंकी उडान* साठी अवश्य भेट घ्या, व्हॉट्सॲप वर मेसेज करा, फोन करा.

महेश व पल्लवी ठोंबरे
Dreamser to Achievers

सपनों की उडान

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *