तुम्ही कोण कार्यकर्ता की…?

नमस्कार मित्रांनो

विधानसभेच्या निवडणुकांचे शंख आता शांत झाले आहेत. जनतेने जसा द्यायचा आहे तसा कौल दिलेला आहे. आपल्या पैकी अनेक कार्यकत्यांना या निवडणुकीच्या निकालानंतर थोडे हायसे वाटले असेल. तुम्ही ज्या उमेदवाराचे किंवा राजकिय पक्षाचे काम केले तो उमेदवार निवडुण आला असेल अथवा नसेल ही, तरीही तुम्हाला या निकांलांमुळे हलके हलके वाटले असेल, बरोबर ना! मी हे कसे म्हणु शकते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल कदाचित. तर ज्यांना माहीत नाही त्यांच्या साठी पुन्हा एकदा सांगतो, की तुम्ही सध्या ज्या अवस्थेमधुन जात आहात अगदी त्याच अवस्थेमध्ये मी माझ्य आयुष्यातील थोडी थोडकी नव्हे , चक्क दहा वर्षे होतो. त्यामुळे राजकारणात नक्की काय होते, नेत्यांच्या मनात काय असते व नेत्यांसाठी जिवाचे रान करणा-या कार्यकर्तांच्या मनाची घालमेल कशी होते याची पुर्ण कल्पना मला आहे. जो पर्यंत निकाल लागत नाही, मग तो निकाल कसाही लागो, तोपर्यंत चित्त था-यावर नसते कोणत्याही ख-या कार्यकर्त्याचे. बरोबर ना?

साधारण दहा वर्षे माझ्या आयुष्यातील , मी राजकारण करण्यात घालवली. तुमची कदचित अजुन दहा वर्षे गेली नसतीलही. किंवा काही लोकांनी माझ्यापेक्षाही जास्त वर्षे राजकारण करण्यात घालवली असतील. कालांतराने, राजकारणातील अपयशाने, मी जेव्हा राजकारण सोडले तेव्हा, अधुन मधुन मझ्या मनात राजकारणा विषयी अनेक विचार येत. म्ह्णजे असे की, राजकारण म्हणजे नेमके काय? राजकारणाचा हेतु काय? पक्षनिष्ठा, नेत्या विषयी निष्ठा हे सगळे काय असते? नेतेमंडळी मग ते पक्ष संघटनेतील असोत वा, लोक प्रतिनिधी असोत, यांचे हेतु काय आहेत? असे अनेक प्रश्न व मग त्या प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी चिंतन आपोआप माझ्याकडुन होत गेले. माझ्या याच चिंतनाच्या आधारावर, अनुभवाचे काही बोल मी आज तुम्हा सर्वांना सांगणार आहे. मी हे सांगण्याचे कारण काय असेल बरे? कदाचित माझा हा लेख पुर्ण झाल्यावर मला व तुम्हालादेखील हे कारण समजेल असे मला वाटते.

एखाद्या राजकीय पक्षाचा सदस्य असणे वेगळी गोष्ट आहे व पक्षाचा कार्यकर्ता असणे आणखी वेगळी गोष्ट आहे. जे नुसतेच सदस्य आहेत, त्यांना निवडणुकीच्या निकालांविषयी उत्सुकता जरी असली तरी ताण अजिबात जाणवत नाही. पण कार्यकर्त्याचे मात्र असे नसते. कार्यकर्त्याच्या दृष्टीने, तो ज्या उमेदवाराला डोक्यावर घेऊन नाचलेला असतो, त्या उमेदवाराचा विजय म्हणजे त्याचा स्वतःचा विजय, उमेदवाराचा पराजय म्हणाजे स्वतःचा पराजय आहे, इतक्या खोलवर रुजलेल्या भावनिक पातळीवर कार्यकर्ता राजकारण व ख-या राजकारण्यांच्या हातातील बाहुले होऊन गेलेला असतो. पक्ष कोणताही असो. आपण कुणाच्यातरी हातातील बाहुले झालेलो आहोत, आपला आपल्या भाव भावनांवर कंट्रोल राहीलेला नाही त्याची पुसटशी देखील कल्पना कार्यकर्त्याला नसते. आणि म्हणुनच तो कार्यकर्ता कदाचित आयुष्यभर कार्यकर्ताच राहतो. याची मुख्य कारणे मी पुढे देणार आहेच. पण आता किमान एवढे जरी आपणास समजले तरी पुरेरे की, कार्यकर्ता हा निव्वळ बाहुले असतो, पक्ष व उमेदवाराच्या हातातील. उमेदवाराच्या हातामध्ये कार्यकर्त्यांच्या मुसक्या असतात. आणि कुणी या मुसक्या तोडल्याच तर मग तो ‘त्या’ उमेदवाराचा, नेत्याचा व पक्षाचा कार्यकर्ताच राहत नाही.

आपल्या देशाचे, समाजाचे नेमके हेच दुर्दैव आहे. इथे पक्षनिष्ठा, व्यक्ति निष्ठा ही राष्ट्र निष्ठेपेक्षा जास्त मोठी आहे. देश म्हणुन आपण सारे एकच आहोत, बांधवच आहोत. सहोदर आहोत. असे कधीही कोणत्याही राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरुन किंवा मिटींगांमधुन ऐकावयास मिळत नाही. उलट विरोधी राजकीय पक्ष किंवा नेता व त्यांचे कार्यकर्ते हे आपले शत्रु कसे आहेत, हाच अनाहुत संस्कार, नकळत प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनावर, जाणिवपुर्वक केला जातो. कार्यकर्त्याला मात्र असे काही होत आहे आपल्या सोबत याची पुसटशी देखील कल्पना नसते. मी ज्या राजकीय पक्षासोबत काम केले त्या पक्षाच्या बाबतीत असे होते असे नव्हे! हे एक सर्वसाधारण चित्र आहे. त्यामुळे सारे भारतीय माझे बांधव आहेत या आपल्या मुलभुत संकल्पनेलाच या सर्वांमुळे तडा जात आहे. व यात दोष राजकीय पक्षांचा आहे किंवा नेत्यांचा आहे असे ही नाही मित्रांनो. हा दोष आहे एकुणच बदललेल्या व जीवनमुल्यांपासुन दुर जात असलेल्या सामाजिक स्थितीचा. राजकीय पक्ष किंवा नेते हे देखील याच समाजाचा भाग आहेत. जे समाजात दिसते तेच राजकारणात दिसेल तर त्यात नवल ते कसले.

माझ्या एका लेखामध्ये मी, रॅट रेस विषयी लिहिले आहे. ही रॅट रेस राजकारण व राजकारण्यांना तरी सोडेल कशी? सगळेच्या सगळे फक्त आणि फक्त ‘मीच भारी आहे’ हे दाखवण्याच्या फंदात पडुन, प्रत्यक्षात्र भारी होण्यासाठी काहीच करताना दिसत नाहीत. नेते मंडळी त्यांच्या त्यांच्या राजकीय वर्तुळातील त्यांच्या समवयस्क व समविचारी व विषमविचारी अशा इतर नेत्यांपेक्षा, आपण कसे भारी आहोत हे दाखविण्याचा सतत प्रयत्न करतात. तर, त्याच नेत्यांचे कार्यकर्ते, निव्वळ मिरवण्यासाठी, नेत्यासोबत एखादा सेल्फी, एखादा फोटो, हार नारळ इत्यादी मार्फत, इतर कार्यकर्त्यांपेक्षा ‘मीच भारी आहे’ असे दाखवण्यासाठी धडपडत असतो.

तुम्ही म्हणाल की राजकारण काय फक्त मिरविण्यासाठी करतो की काय आम्ही? राजकारणामुळे देशाला प्रगती पथावर नेता येते. सत्ता मिळविता येते. बरोबर, पण मला एक सांगा, मी साधारण सहा वर्षापुर्वी राजकारण सोडले. माझ्या राजकारण सोडल्याने, मी ज्या पक्षाचे काम करायचो, तो पक्ष, मी ज्या नेत्याच्या मागे-पुढे करायचो तो नेता , त्याचे करीयर असे काहीही बंद पडले नाही. माझी कमी ताबडतोब भरली गेली. पक्ष थांबला नाही. सगळे आहे तसेच सुरु आहे. आणि मला खात्री आहे, आज जे कुणी कार्यकर्ते असतील, ते देखील काम करणे सोडतील तरी त्या त्या राजकीय पक्षाला नवनवीन कार्यकर्ते मिळतच राहतील.

पण मित्रानो, यातील एक गम्मत पहा. मी माझ्या आयुष्यातील ऐन उमेदीची दहा वर्षे राजकारणात घालवली. काही जण असे ही म्हणतील मी ती चक्क ‘वाया घालवली’ . माझ्या दृष्टीने ती वाया गेलेली नाहीत. मला आयुष्यभर पुरेल असे अनेक धडे या दहा वर्षातुन मी शिकलो. मी राजकारण सोडले सहा वर्षापुर्वी. पक्ष आहे तिथेच आहे, नेते आहे तिथेच आहेत. देश देखील फार काही बदलला असेही नाही. पण मी मात्र १००% बदललो आहे. आर्थिक साक्षरता आली. आपले कमवायचे वय जरी मी गमावुन बसलो असलो तरी, नव्याने सुरुवात करुन मी सध्या माझ्या व्यवसायात भरभराट केली आहे. माझ्या निमित्ताने आज शंभरच्या वर तरुण-तरुणींना नुसता रोजगारच मिळाला नाही तर एक उच्च दर्ज्याची लाईफस्टाईल देखील मिळाली. माझ्या असे करण्याने मी देशाच्या प्रगतीमध्ये नक्कीच खारीचा का होईना पण वाटा उचचला, हातभार लावला. पण त्या दहा वर्षांत मी नक्की काय मिळविले बरे? आणि माझा प्रश्न आत्ताच्या कार्यकर्त्यांना आहे की तुम्ही काय मिळविणार आहात कार्यकर्ते बनुन?

व्यक्तिगत राजकिय महत्वाकांक्षा असण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचे मर्याद कर्तृत्व हवे. पैसा हवा. समाजात प्रतिष्ठा हवी. एखाद्या नेत्याच्या मागे-पुढे करण्याने हे काही मिळविता येत नाही. यासाठी मेहनत करावी लागते. तुमच्या आयुष्यातील ही उमेदीची वर्षे तुम्ही तुमच्या करीयर वर केंद्रीत करा. भरपुर प्रगती करा. भरपुर संपत्ती, ती देखील स्वकष्टाने, कायद्याच्या मार्गाने, सरळ सरळ पांढरी कमाई करा. तुम्ही जर असे करण्यास सुरुवात केली तर तुमच्या हाताने या देशाची सेवा नक्कीच घडेल. इतका पैसा कमवा की तुमचा इन्कम टॅक्स, तुमच्या आत्ताच्या कमाईपेक्षा जास्त असला पाहीजे. राजकारण सोडुन द्या असा सल्ला मी तुम्हाला देणार नाही. मी तुमच्या पुढे दोन पर्याय ठेवतोय. तुम्ही यातील एक निवडा. तुम्ही काय होणार?

कार्यकर्ता की कर्तृत्वकर्ता?

कळावे
आपलाच
महेश व पल्लवी ठोंबरे – 9923062525

Business leader and motivator
We are wellness coaches. We help people with physical well-being. Continuous support, coaching and structured/proven approach is the key. You also can become a coach like us, its easy, trust me. U can also be a motivator like us. U can also me a leader like us.

 To contact me please call – 9923062525
आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525
मी एक यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे कारण नक्की काय आहे, हेच मी “श्रीमंतीचा महामार्ग” या लेखमालेतुन लिहित आहे. तुम्हाला माझ्या सोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा, व्यवसाय, तोही कमीत कमी भांडवलामध्ये सुरु करायचा असेल व माझ्या सारखेच (किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त) यश मिळवायचे असेल तर मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiY2l0eSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiUHVuZSIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJzZWxlY3RsaXN0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsImxhYmVsX2RlbGltIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJpY29uX2NsYXNzIjoiIiwiaWNvbl9zaXplIjoiIiwiaWNvbl9jb2xvciI6IiIsInRlcm1zIjoiIiwib3B0aW9ucyI6W3sibmFtZSI6IlB1bmUiLCJsYWJlbCI6IlB1bmUgLSBcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJBaG1lZG5hZ2FyIiwibGFiZWwiOiJBaG1lZG5hZ2FyIC0gXHUwOTA1XHUwOTM5XHUwOTJlXHUwOTI2XHUwOTI4XHUwOTE3XHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiU2hpcmRpIiwibGFiZWwiOiJTaGlyZGkgLSBcdTA5MzZcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NGRcdTA5MjFcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJOYXNoaWsiLCJsYWJlbCI6Ik5hc2hpayAtIFx1MDkyOFx1MDkzZVx1MDkzNlx1MDkzZlx1MDkxNSJ9LHsibmFtZSI6IkF1cmFuZ2FiYWQiLCJsYWJlbCI6IkF1cmFuZ2FiYWQgLSBcdTA5MTRcdTA5MzBcdTA5MDJcdTA5MTdcdTA5M2VcdTA5MmNcdTA5M2VcdTA5MjYifSx7Im5hbWUiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIiwibGFiZWwiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIC0gXHUwOTM1XHUwOTIxXHUwOTE3XHUwOTNlXHUwOTM1IFx1MDkyZVx1MDkzZVx1MDkzNVx1MDkzMyJ9LHsibmFtZSI6IlRhbGVnYW9uIiwibGFiZWwiOiJUYWxlZ2FvbiAtIFx1MDkyNFx1MDkzM1x1MDk0N1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkxvbmF2bGEiLCJsYWJlbCI6IkxvbmF2bGEgLSBcdTA5MzJcdTA5NGJcdTA5MjNcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MzJcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJLaG9wb2xpIiwibGFiZWwiOiJLaG9wb2xpIC0gXHUwOTE2XHUwOTRiXHUwOTJhXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNmIn0seyJuYW1lIjoiRmFsdGFuIiwibGFiZWwiOiJQaGFsdGFuIC0gXHUwOTJiXHUwOTMyXHUwOTFmXHUwOTIzIn0seyJuYW1lIjoiQWtvbGEiLCJsYWJlbCI6IkFrb2xhIC0gXHUwOTA1XHUwOTE1XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQW1yYXZhdGkiLCJsYWJlbCI6IkFtcmF2YXRpLSBcdTA5MDVcdTA5MmVcdTA5MzBcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MjRcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJCZWVkIiwibGFiZWwiOiJCZWVkIC0gXHUwOTJjXHUwOTQwXHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiQmhhbmRhcmEiLCJsYWJlbCI6IkJoYW5kYXJhIC0gXHUwOTJkXHUwOTAyXHUwOTIxXHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQnVsZGhhbmEiLCJsYWJlbCI6IkJ1bGRoYW5hIC0gXHUwOTJjXHUwOTQxXHUwOTMyXHUwOTIyXHUwOTNlXHUwOTIzXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQ2hhbmRyYXB1ciIsImxhYmVsIjoiQ2hhbmRyYXB1ciAtIFx1MDkxYVx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0ZFx1MDkzMFx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IkRodWxlIiwibGFiZWwiOiJEaHVsZSAtIFx1MDkyN1x1MDk0MVx1MDkzM1x1MDk0NyJ9LHsibmFtZSI6IkdhZGNoaXJvbGkgIiwibGFiZWwiOiJHYWRjaGlyb2xpIC0gXHUwOTE3XHUwOTIxXHUwOTFhXHUwOTNmXHUwOTMwXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiR29uZGlhIiwibGFiZWwiOiJHb25kaWEgLSBcdTA5MTdcdTA5NGJcdTA5MDJcdTA5MjZcdTA5M2ZcdTA5MmZcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJIaW5nb2xpIiwibGFiZWwiOiJIaW5nb2xpIC0gXHUwOTM5XHUwOTNmXHUwOTAyXHUwOTE3XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiSmFsZ2FvbiIsImxhYmVsIjoiSmFsZ2FvbiAtIFx1MDkxY1x1MDkzM1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkphbG5hIiwibGFiZWwiOiJKYWxuYSAtIFx1MDkxY1x1MDkzZVx1MDkzMlx1MDkyOFx1MDkzZSJ9LHsibmFtZSI6IktvbGhhcHVyIiwibGFiZWwiOiJLb2xoYXB1ciAtIFx1MDkxNVx1MDk0Ylx1MDkzMlx1MDk0ZFx1MDkzOVx1MDkzZVx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IkxhdHVyIiwibGFiZWwiOiJMYXR1ciAtIFx1MDkzMlx1MDkzZVx1MDkyNFx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBDaXR5IiwibGFiZWwiOiJNdW1iYWkgQ2l0eSAtIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBTdWJ1cmJhbiIsImxhYmVsIjoiTXVtYmFpIFN1YnVyYmFuIC0gXHUwOTI4XHUwOTM1XHUwOTQwIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik5hZ3B1ciIsImxhYmVsIjoiTmFncHVyIC0gXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTE3XHUwOTJhXHUwOTQxXHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiTmFuZGVkIiwibGFiZWwiOiJOYW5kZWQgIC1cdTA5MjhcdTA5M2VcdTA5MDJcdTA5MjZcdTA5NDdcdTA5MjEifSx7Im5hbWUiOiJOYW5kdXJiYXIiLCJsYWJlbCI6Ik5hbmR1cmJhciAtIFx1MDkyOFx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDkyY1x1MDkzZVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik9zbWFuYWJhZCIsImxhYmVsIjoiT3NtYW5hYmFkIC0gXHUwOTA5XHUwOTM4XHUwOTRkXHUwOTJlXHUwOTNlXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTJjXHUwOTNlXHUwOTI2In0seyJuYW1lIjoiUGFsZ2hhciIsImxhYmVsIjoiUGFsZ2hhciAtIFx1MDkyYVx1MDkzZVx1MDkzMlx1MDkxOFx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IlBhcmJoYW5pIiwibGFiZWwiOiJQYXJiaGFuaSAtIFx1MDkyYVx1MDkzMFx1MDkyZFx1MDkyM1x1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlJhaWdhZCIsImxhYmVsIjoiUmFpZ2FkIC0gXHUwOTMwXHUwOTNlXHUwOTJmXHUwOTE3XHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiUmF0bmFnaXJpIiwibGFiZWwiOiJSYXRuYWdpcmkgLSBcdTA5MzBcdTA5MjRcdTA5NGRcdTA5MjhcdTA5M2VcdTA5MTdcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJTYW5nbGkiLCJsYWJlbCI6IlNhbmdsaSAtIFx1MDkzOFx1MDkzZVx1MDkwMlx1MDkxN1x1MDkzMlx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlNhdGFyYSIsImxhYmVsIjoiU2F0YXJhIC0gXHUwOTM4XHUwOTNlXHUwOTI0XHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiU2luZGh1ZHVyZyIsImxhYmVsIjoiU2luZGh1ZHVyZyAtIFx1MDkzOFx1MDkzZlx1MDkwMlx1MDkyN1x1MDk0MVx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkxNyJ9LHsibmFtZSI6IlNvbGFwdXIiLCJsYWJlbCI6IlNvbGFwdXIgLSBcdTA5MzhcdTA5NGJcdTA5MzJcdTA5M2VcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MzAifSx7Im5hbWUiOiJUaGFuZSIsImxhYmVsIjoiVGhhbmUgLSBcdTA5MjBcdTA5M2VcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJXYXJkaGEiLCJsYWJlbCI6IldhcmRoYSAtIFx1MDkzNVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkyN1x1MDkzZSJ9LHsibmFtZSI6Ildhc2hpbSIsImxhYmVsIjoiV2FzaGltIC0gXHUwOTM1XHUwOTNlXHUwOTM2XHUwOTNmXHUwOTJlIn0seyJuYW1lIjoiWWF2YXRtYWwiLCJsYWJlbCI6IllhdmF0bWFsIC0gXHUwOTJmXHUwOTM1XHUwOTI0XHUwOTJlXHUwOTNlXHUwOTMzIn1dfSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiI4NDMwIiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiNTgxOSIsImFjdGlvbnMiOiI5MSIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNzg5NTk3Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzc4OTU5NyIsImNvbm5lY3RfaGFzaCI6ImE2Mjk2MjA0OWFlNDI0ZTZhMzEyYmIzNmZiY2ZmYWE2In0=

 

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *