Illness की Wellness? भविष्य कोणत्या उद्योगाचे आहे?

जगात रोग निवारणाच्या व प्रतिबंधाच्या अनेकविध संशोधने व सुविधा जो पर्यंत निर्माण झाल्या नव्हत्या तेव्हा कुणाही वाटले नसेल की, आजारी असलेल्या माणसला आजारपणातुन मुक्त करणे हा एक मोठा उद्योग होऊ शकतो. जगातील एकुण व्यापार उदीमांमध्ये फार्मा व उपचार हा अग्रणी उद्योग झालेला आपण आपल्या डोळयांनी पाहिला आहे. आपल्या आधीच्या पिढीने हे सर्व अनुभवले आहे.

या एक-दोन पिढ्यांनी जीवन जगताना, पैसा कमाविणे, मुलाबाळांचे शिक्षण व उरलेला वेळ व लक्ष आजारपणातुन बाहेर पडण्यासाठी खर्च केला. याच्याच जीवावर आज भारतात औषध निर्माण, विक्री व उपचार हा एक व्यवसाय म्हणजे उद्योग झाला आहे. या उद्योग क्षेत्राला आपण इलनेस इंडस्ट्री असे म्हणुयात.

गेल्या तीन चार वर्षांपासुन एक नवीन ट्रेंड भारतात सुरु झालेला आपण पाहु शकतो. यामध्ये अधिकाधिक लोक इलनेस वर फोकस न करता म्हणजे आजार पणातुन बाहेर पडण्याची वेळच येऊ न देण्यासाठी जीवनपधद्ती म्हणजे लाईफस्टाईल मध्ये बदल करताना दिसत आहेत. याचाच अर्थ आपण आजारी पडुच नये यासाठी लोक आवश्यक त्या सर्व गोष्टी करताना दिसत आहेत. याद्वारे देखील भारतात एक नवीन उद्योग क्षेत्र उद्यास आले आहे, मागील काही वर्षांमध्ये. या इंडस्ट्रीचा नुकताच जन्म झालेला आहे. या इंडस्ट्री ने अजुन बाळसे धरायचे आहे. या इंडस्ट्रीला आपण वेलनेस इंडस्ट्री असु म्हणुयात.

इलनेस आणि वेलनेस यामधील फरक अधिक स्पष्टपणे कळण्यासाठी खालील चित्र पहा. इलनेस इंडस्ट्री ही प्रतिक्रियात्मक आहे. यामध्ये माणुस आजारी पडला की मग व्यवसाय-ट्रीगर होतो. म्हणजे माणुस आजारी पडलाच नाही तर तो माणुस इलनेस इंडस्ट्री च्या काहीही कामाचा नाहीये. किंबहुना माणसाने आजारी पडावे अशी वाट, इलनेस इंडस्ट्रीवाले करीत बसतात कित्येकदा.

याउलट वेलनेस इंडस्ट्री मध्ये कुणीही आजारी पडुच नये म्हणुन प्रयत्न केले जातात. जीवनशैली मधील बदल, प्रशिक्षणे, खाद्य-अखाद्य, आहार-विहार- योगा-प्राणायाम, जिम, कार्डीयाक , न्युट्रीशन सपोर्ट, न्युट्रीशन व डायट मार्गदर्शन अशा अनेक प्रकारे वेलनेस इंडस्ट्री समाजाला आजारी पडण्यापासुन वाचवते.

हे जरी असे असले तरी अजुनही इलनेस इंडस्ट्रीचाच वरचष्मा आहे. विशेषकरुन भारतामध्ये, डॉक्टरला देव मानले जाते. लाखो रुपये डॉक्टरांच्या सांगण्यावरुन लोक इलनेस वर खर्च करतात. अर्थात इलनेस इंडस्ट्रीची देखील अवश्यकता आहेच. व ती कायमच राहणार.

पण चित्र आजकाल बदलले आपणास पहावयस मिळते. हे चित्र दररोज पहाटे मैदानावर धावणारे तरुण पाहिले व चालणारे वयस्क पाहिले की दिसते. ही संख्या लाखोंच्या घरात आहे. संस्था, कंपन्या जाणिवपुर्वक वेलनेस साठी कर्मचारी, अधिका-यांना प्रोत्साहीत करीत आहेत.

भारतात वेलनेस इंडस्ट्री यापुर्वी नव्हती असे नाही. योगा आदीच्या रुपात हे होतेच पण तेव्हा त्याकडे कुणीही उद्योग म्हणुन पाहिले नव्हते. पण आता भारतच नव्हे तर जगभरात योगाच्या माध्यमातुन वेलनेस इंडस्ट्री ने पाय पसरले आहेत.

आता, वेलनेस इंडस्ट्री नुसती योगा व जिम वर थांबलेली न राहुन तिने बहु आयाम घेतले आहेत.

तिचे तीन प्राथमिक भाग करता येतील ते असे

  • शारीरीक दृष्ट्या निरामय असणे
  • मानसिक दृष्ट्या निरामय असणे
  • भावनिक दृष्ट्या निरामय असणे

सन २०१५ च्या आर्थिक वर्षात भारतामध्ये या (वेलनेस) इंडस्ट्री चा १३०० करोड रुपये इतका मार्केट शेयर होता. पुढच्या पाच वर्षामध्ये या इंडस्ट्रीने वर्षाला १२% ने वाढ अनुभवली. व २०२० पर्यंत वेलनेस इंडस्ट्रीचा मार्केट शेयर असेल २३०० करोड रुपये इतका. ही तर सुरुवात आहे. भारतच नव्हे तर जगभरात या इंडस्ट्री ने खुप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली दिसते आहे.

हे उद्योग क्षेत्र आज रोजगार निर्मितीचे एक साधन बनलेले आहे. भांडवलदारांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीस सुरुवात केली आहे. जागतिक स्तरावर या व्यवसायाने २०१७ मध्ये १.५ लक्ष करोड रुपये इतका व्यवसाय केला. खुप मोठा आकडा आहे हा. आणि हे तर केवळ सुरुवात आहे.

भारतामध्ये या उद्योग क्षेत्रामध्ये खुप संधी आहे. या क्षेत्राला तीन मुख्य आयाम आहेत जे मी वर सांगितले आहेत. त्यामध्येच अधिक सुक्ष्म पातळीवर जाऊन खालील प्रकारच्या वेलनेस प्रोग्रामची गरज , भारतात पडु शकते व ती भागवण्यासाठी तज्ञ वेलनेस कोच म्हणजे मार्गदर्शकांची खुप मोठ्या प्रमाणात गरज निर्माण होणार आहे.

Here are a few trends which can transform the wellness industry in India.

याद्वारे तीन मुख्य गोष्टी घडतील

व्यक्तिगत ब्रांडचा उद्य व विकास

टीव्ही वर जाहिरात करुन पैसा कमाविण्याचे दिवस गेले. आता सोशल मीडीयाचा जमाना आहे. इथे तंत्रज्ञान व जीवनकौशल्य यांचा सुरेख संगम ज्यांच्याकडे असेल त्यांना मरण तर नाहीच पण ते लोक कायम डिमांड मध्ये असणार आहेत. याची अनेक उदाहरणे आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. केवळ सोशल मिडीया वर प्रसिध्द झालेले अनेक ब्रांड्स आपण पाहिले.  हे ब्रांड केवळ उत्पादनांचेच नाहीत तर, व्यक्ति देखील ब्रांड होऊ शकतो, नव्हे झाले आहेत. अनेक वेलनेस कोच, लाईफ कोच आज लाखो रुपये कमावताना आपण पाहतो.

मागणीनुसार सेवा

या व्यवसायातील एक लवचिकता अशी देखील आहे की, लोक ट्रायल स्वतः घेऊन, वस्तु व सेवा वापराच्या संदर्भामध्ये निर्णय घेतात. आता लोकांना समजावुन फार सांगावे लागत नाही. तुमच्या वस्तु व सेवांविषयी शक्य तेवढी माहिती ते आधीच मिळवतात. रीव्यु वाचतात. मग तुमचा प्रोग्राम सुरु करायचा की नाही , हे स्वतः अनुभव घेऊन ठरवितात. ही लवचिकता इलनेस इंडस्ट्री मध्ये अजिबात नाही.

शाकाहाराचे महत्व वाढेल

पुर्वी फक्त धार्मिक बाबींशी संबधित असलेला शाकाहार आता, जीवनशैलीतील मुख्य घटक बनु पाहत आहे. युरोप अमेरिकेमध्ये मागील काही दशकांमध्ये शाकाहार वाढला, लोकप्रिय झाला. व आता तर संपुर्न जगात शाकाहाराचे महत्व लोकांना समजत आहे व त्याचा स्वीकार व्हायला लागला आहे. भारतामध्ये देखील हा नवीन ट्रेंड आजकाल दिसु लागला आहे. आणि ह ट्रेंड खुप अधिक काळ असाच राहणार आहे व वाढणारच आहे.

वरील तीनही गोष्टींचा विचार करता, या उद्योग क्षेत्रामध्ये असलेल्या अमर्याद संधींचा लाभ घेण्याची करोडो रुपये कमावण्याची ही खर तर सुवर्ण संधी आहे.

भारतातील वाढती तरुण लोकसंख्या, वाढते आर्थिक उत्पन्न व वाढत जाणारे विविध आजार, हे   वेलनेस इंडस्ट्री चे मुख्य आधार आहेत. याच घटकांच्या आधारे हे उद्योग क्षेत्र भारतात खुप वेगाने वाढत आहे. याच वाढत्या उत्पन्न, बसुन काम तसेच वर्क हार्ड पार्टी हार्ड या कल्चर मुळे लक्षावधी लोक जीवनशैली शी निघडीत आजारांना बळी पडत आहेत. त्यांच्या आजारांचा इलाज औषधांनी कमी व जीवनशैलीतील बदलामुळे जास्त होतो आहे. व यापुढे तर आजार होऊच नये म्हणुन जीवनशैली बदल मार्गदर्शनाची (कोचिंग) गरज अधिकाधिक लोकांना लागणार आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या संस्थेने प्रसिध्द केलेल्या एका अहवालामध्ये नमुद केले आहे की, चार पैकी एका माणसास अ-संसर्गजन्य व जीवनशैलीशी निगडीत व्याधींनी ग्रासले आहे. या सर्व परिस्थीमुळे भारतीय मने व माणसे, आरोग्याच्या बाबतीत कधी नव्हे इतकी जागरुक झालेली आपणास दिसु लागली आहे.

जीवनशैली तील बदल म्हणजे आहार-विहार, योगा, व्यायाम, मार्गदर्शन व न्युट्रीशन म्हणजेच पोषक तत्वांविषयी सल्ला व विक्री , मागील काही वर्षांमध्ये एक आघाडीचा उद्योग होऊ पाहत आहे. याला आणखी एक कारण ते म्हणजे वाढते शहरीकरण. हे शहरीकरण नुसते इमारती, रस्ते, वाहने, प्रदुषण, औदोगिकीकरण यांनाच जन्म देत नाही तर जीवनशैलीशी निगडीत व्याधींना देखील जन्म देत आहे. आणि शहरीकरण कमी कोण्याची लक्षणे काही दिसत नाहीत. उलट गाव खेड्यांकडे देखील या शहरीकरणाचे दुष्परिणाम दिसु लागले आहेत. हे सगळे घटक, भारतातील वेलनेस इंडस्ट्रीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहेत.

सध्या या इंडस्ट्रीमध्ये पर्यायी औषध व्यवस्था, आरोग्यपुर्ण खाण्यापिण्याच्या सवयी, न्युट्रीशन, प्रतिबंधात्मक व व्यक्तिगत निरोगी जीवन, काम-व्यवसायाच्या ठिकाणी परिणामकारकतेसाठी वेलनेस, योगा, व्यायाम साधने उद्योग व व्यायाम कोचिंग यांचा समावेश होतो. यापैकी सर्वात जास्त वाटा न्युट्रीशन सप्लीमेंट व सौंद्रर्य प्रसाधने यांचा आहे.

आमचा जसा फिटनेस स्टुडीयो आहे, तसे फिटनेस स्टुडियोज, पर्यायी/समांतर/टिकाऊ उपचार पध्दती हे सामान्य जनजीवनाचा भाग होऊ पाहत आहे. या सर्वांचा विचार करता, भारतातील हे उद्योग क्षेत्र नवनवीन आकडेवारींची ऊंची गाठणार हे निश्चित आहे.

वेलनेस इंडस्ट्री, अजुन बाळसे धरीत आहे. या काळात जे कोणी या क्षेत्रात पदापर्णन करतील व ते, सातत्यपुर्ण प्रयत्न, प्रशिक्षणाद्वारे, पुढील ४-५ वर्षांच्या काळात यशाची नवनवीन शिखरे नक्कीच पादाक्रांत करतील यात शंका नाही.

मी स्वतः या क्षेत्रामध्ये गेल्या सहा वर्षापासुन काम करीत आहे. तीन आकडी उत्पन्नापासुन सुरुवात करुन , आज मी, लाखो रुपये या व्यवसायात कमाविले. सोबतच माझ्या स्वतःच्या जीवनशैलीमध्ये आमुलाग्र बदल या क्षेत्रामुळे झाला. एक मार्गदर्शक म्हणुन लोक माझ्याकडे पाहतात. नुसते हेच नाही तर,  माझ्या मार्गदर्शनाखाली शंभर पेक्षा जास्त फिटनेस/वेलनेस कोच महाराष्ट्रात तयार झाले व ते देखील उत्पन्नाच्या नवनवीन ध्येयांना गाठण्यात यशस्वी झाले आहेत.

हे वाढणारे क्षेत्र, भारतातील टॅलेंटसाठी एक सुवर्णसंधी आहे. चला तर मग, या वाहत्या गंगेमध्ये नुसते हातच धुवुन नाही तर मनसोक्त डुंबूया देखील. संपुर्ण महाराष्ट्रात, कुठेही तुम्हाला, आमच्या सारखेच या व्यवसायात, आमच्या संपुर्ण मार्गदर्शनाखाली जर पदार्पण करायचे असेल व करीयर ला नवीन दिशा तसेच स्वप्नांना पंख द्यायचे असलीत तर खालील फॉर्म भरुन, तुम्हाला सर्वात जवळचे ठिकाण/जिल्हा निवडा म्हणजे आम्हाला तुमच्याशी संपर्क साधणे सोपे जाईल.

कळावे
आपलाच
महेश ठोंबरे – 9923062525
Business leader and motivator
I am a wellness coach. I help people with physical well-being. Continuous support, coaching and structured/proven approach is the key. You also can become a coach like me, its easy, trust me. To contact me please call – 9923062525

आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525
मी एक यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे कारण नक्की काय आहे, हेच मी “श्रीमंतीचा महामार्ग” या लेखमालेतुन लिहित आहे. तुम्हाला माझ्या सोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा, व्यवसाय, तोही कमीत कमी भांडवलामध्ये सुरु करायचा असेल व माझ्या सारखेच (किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त) यश मिळवायचे असेल तर मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiY2l0eSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiUHVuZSIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJzZWxlY3RsaXN0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsImxhYmVsX2RlbGltIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJpY29uX2NsYXNzIjoiIiwiaWNvbl9zaXplIjoiIiwiaWNvbl9jb2xvciI6IiIsInRlcm1zIjoiIiwib3B0aW9ucyI6W3sibmFtZSI6IlB1bmUiLCJsYWJlbCI6IlB1bmUgLSBcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJBaG1lZG5hZ2FyIiwibGFiZWwiOiJBaG1lZG5hZ2FyIC0gXHUwOTA1XHUwOTM5XHUwOTJlXHUwOTI2XHUwOTI4XHUwOTE3XHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiU2hpcmRpIiwibGFiZWwiOiJTaGlyZGkgLSBcdTA5MzZcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NGRcdTA5MjFcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJOYXNoaWsiLCJsYWJlbCI6Ik5hc2hpayAtIFx1MDkyOFx1MDkzZVx1MDkzNlx1MDkzZlx1MDkxNSJ9LHsibmFtZSI6IkF1cmFuZ2FiYWQiLCJsYWJlbCI6IkF1cmFuZ2FiYWQgLSBcdTA5MTRcdTA5MzBcdTA5MDJcdTA5MTdcdTA5M2VcdTA5MmNcdTA5M2VcdTA5MjYifSx7Im5hbWUiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIiwibGFiZWwiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIC0gXHUwOTM1XHUwOTIxXHUwOTE3XHUwOTNlXHUwOTM1IFx1MDkyZVx1MDkzZVx1MDkzNVx1MDkzMyJ9LHsibmFtZSI6IlRhbGVnYW9uIiwibGFiZWwiOiJUYWxlZ2FvbiAtIFx1MDkyNFx1MDkzM1x1MDk0N1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkxvbmF2bGEiLCJsYWJlbCI6IkxvbmF2bGEgLSBcdTA5MzJcdTA5NGJcdTA5MjNcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MzJcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJLaG9wb2xpIiwibGFiZWwiOiJLaG9wb2xpIC0gXHUwOTE2XHUwOTRiXHUwOTJhXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNmIn0seyJuYW1lIjoiRmFsdGFuIiwibGFiZWwiOiJQaGFsdGFuIC0gXHUwOTJiXHUwOTMyXHUwOTFmXHUwOTIzIn0seyJuYW1lIjoiQWtvbGEiLCJsYWJlbCI6IkFrb2xhIC0gXHUwOTA1XHUwOTE1XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQW1yYXZhdGkiLCJsYWJlbCI6IkFtcmF2YXRpLSBcdTA5MDVcdTA5MmVcdTA5MzBcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MjRcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJCZWVkIiwibGFiZWwiOiJCZWVkIC0gXHUwOTJjXHUwOTQwXHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiQmhhbmRhcmEiLCJsYWJlbCI6IkJoYW5kYXJhIC0gXHUwOTJkXHUwOTAyXHUwOTIxXHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQnVsZGhhbmEiLCJsYWJlbCI6IkJ1bGRoYW5hIC0gXHUwOTJjXHUwOTQxXHUwOTMyXHUwOTIyXHUwOTNlXHUwOTIzXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQ2hhbmRyYXB1ciIsImxhYmVsIjoiQ2hhbmRyYXB1ciAtIFx1MDkxYVx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0ZFx1MDkzMFx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IkRodWxlIiwibGFiZWwiOiJEaHVsZSAtIFx1MDkyN1x1MDk0MVx1MDkzM1x1MDk0NyJ9LHsibmFtZSI6IkdhZGNoaXJvbGkgIiwibGFiZWwiOiJHYWRjaGlyb2xpIC0gXHUwOTE3XHUwOTIxXHUwOTFhXHUwOTNmXHUwOTMwXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiR29uZGlhIiwibGFiZWwiOiJHb25kaWEgLSBcdTA5MTdcdTA5NGJcdTA5MDJcdTA5MjZcdTA5M2ZcdTA5MmZcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJIaW5nb2xpIiwibGFiZWwiOiJIaW5nb2xpIC0gXHUwOTM5XHUwOTNmXHUwOTAyXHUwOTE3XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiSmFsZ2FvbiIsImxhYmVsIjoiSmFsZ2FvbiAtIFx1MDkxY1x1MDkzM1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkphbG5hIiwibGFiZWwiOiJKYWxuYSAtIFx1MDkxY1x1MDkzZVx1MDkzMlx1MDkyOFx1MDkzZSJ9LHsibmFtZSI6IktvbGhhcHVyIiwibGFiZWwiOiJLb2xoYXB1ciAtIFx1MDkxNVx1MDk0Ylx1MDkzMlx1MDk0ZFx1MDkzOVx1MDkzZVx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IkxhdHVyIiwibGFiZWwiOiJMYXR1ciAtIFx1MDkzMlx1MDkzZVx1MDkyNFx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBDaXR5IiwibGFiZWwiOiJNdW1iYWkgQ2l0eSAtIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBTdWJ1cmJhbiIsImxhYmVsIjoiTXVtYmFpIFN1YnVyYmFuIC0gXHUwOTI4XHUwOTM1XHUwOTQwIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik5hZ3B1ciIsImxhYmVsIjoiTmFncHVyIC0gXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTE3XHUwOTJhXHUwOTQxXHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiTmFuZGVkIiwibGFiZWwiOiJOYW5kZWQgIC1cdTA5MjhcdTA5M2VcdTA5MDJcdTA5MjZcdTA5NDdcdTA5MjEifSx7Im5hbWUiOiJOYW5kdXJiYXIiLCJsYWJlbCI6Ik5hbmR1cmJhciAtIFx1MDkyOFx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDkyY1x1MDkzZVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik9zbWFuYWJhZCIsImxhYmVsIjoiT3NtYW5hYmFkIC0gXHUwOTA5XHUwOTM4XHUwOTRkXHUwOTJlXHUwOTNlXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTJjXHUwOTNlXHUwOTI2In0seyJuYW1lIjoiUGFsZ2hhciIsImxhYmVsIjoiUGFsZ2hhciAtIFx1MDkyYVx1MDkzZVx1MDkzMlx1MDkxOFx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IlBhcmJoYW5pIiwibGFiZWwiOiJQYXJiaGFuaSAtIFx1MDkyYVx1MDkzMFx1MDkyZFx1MDkyM1x1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlJhaWdhZCIsImxhYmVsIjoiUmFpZ2FkIC0gXHUwOTMwXHUwOTNlXHUwOTJmXHUwOTE3XHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiUmF0bmFnaXJpIiwibGFiZWwiOiJSYXRuYWdpcmkgLSBcdTA5MzBcdTA5MjRcdTA5NGRcdTA5MjhcdTA5M2VcdTA5MTdcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJTYW5nbGkiLCJsYWJlbCI6IlNhbmdsaSAtIFx1MDkzOFx1MDkzZVx1MDkwMlx1MDkxN1x1MDkzMlx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlNhdGFyYSIsImxhYmVsIjoiU2F0YXJhIC0gXHUwOTM4XHUwOTNlXHUwOTI0XHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiU2luZGh1ZHVyZyIsImxhYmVsIjoiU2luZGh1ZHVyZyAtIFx1MDkzOFx1MDkzZlx1MDkwMlx1MDkyN1x1MDk0MVx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkxNyJ9LHsibmFtZSI6IlNvbGFwdXIiLCJsYWJlbCI6IlNvbGFwdXIgLSBcdTA5MzhcdTA5NGJcdTA5MzJcdTA5M2VcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MzAifSx7Im5hbWUiOiJUaGFuZSIsImxhYmVsIjoiVGhhbmUgLSBcdTA5MjBcdTA5M2VcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJXYXJkaGEiLCJsYWJlbCI6IldhcmRoYSAtIFx1MDkzNVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkyN1x1MDkzZSJ9LHsibmFtZSI6Ildhc2hpbSIsImxhYmVsIjoiV2FzaGltIC0gXHUwOTM1XHUwOTNlXHUwOTM2XHUwOTNmXHUwOTJlIn0seyJuYW1lIjoiWWF2YXRtYWwiLCJsYWJlbCI6IllhdmF0bWFsIC0gXHUwOTJmXHUwOTM1XHUwOTI0XHUwOTJlXHUwOTNlXHUwOTMzIn1dfSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiI5MDc5IiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiNjI1MSIsImFjdGlvbnMiOiI5NSIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfOTk1MjkxIiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzk5NTI5MSIsImNvbm5lY3RfaGFzaCI6IjZkMTc0MGI3ZTQ2MmI2MTQwOGJjNmM5YTJkNmE4ZDAxIn0=

 

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *