मरतुकडी म्हैस का मारली?

सामान्य लोकांच्या आयुष्यातील अडचणी सामान्य असतात, दुःखे सामान्य असतात तसेच त्यांना होणारा सुखाचा अनुभव देखील सामान्यच असतो. सा-या आयुष्यात तोच तो पणा असतो. त्यांची चाकोरी मर्यादीत असते. या चाकोरी मध्ये फिरते राहण्यासाठी जितकी ऊर्जा आवश्यक आहे तितकी कशी मिळवायची याची कला त्यांना अवगत असते. यासोबतच त्यांनी अजुन एक गोष्ट नकळत शिकलेली असते ती म्हणजे, जेवढी आवश्यक ऊर्जा आहे तेवढीच मिळवायची, कारण त्यांना कधीही चाकोरी सोडावी असे वाटतच नाही. त्याच चाकोरी मध्ये त्यांना सतत भ्रमण करायचे असल्याने त्यांस कधीही अधिकच्या ऊर्जेची आवश्यकता देखील नसते. त्यामुळे त्या चाकोरीच्या बाहेरील जग कसे आहे, त्यातील समस्या, अडचणी, आव्हाने, व्याप्ती किती आहे याचा तसुभरही अंदाज सामान्य माणसाला नसतो.

असामान्य माणसांच्या आयुष्यातील अडचणी असामान्य म्हणजे मोठ्या असतात. त्यांची दुःखे मोठी असतात तसेच त्यांना होणारा सुखाचा अनुभव देखील असामान्य म्हणजे अमहान असतो. त्यांच्या आयुष्यात तोच तो पणा अजिबात नसतो. एका चाकोरीतुन, अजुन मोठ्या चाकोरीत झेप घेण्यासाठी ते नेहमी ऊर्जा संचय करीत राहतात. एकदा का भ्रमण कक्षा बदलण्यासाठी आवश्यक तेवढी ऊर्जा साचली की असामान्य लोक स्वतःच स्वतःला अधिक मोठ्या चाकोरी, भ्रमण कक्षेत प्रक्षेपित करतात. त्यांच्या डिक्शनरी मध्ये ‘सेटल झालो किंवा सेटल झाले’ अशा शब्द प्रयोगाला स्थानच नसते मुळी.

पण ज्यांना आपण असामान्य माणसे म्हणतो, ती काय असामान्य म्हणुनच जन्माला आलेली असतात? काय त्यांच्या कपाळावर असामान्यत्वाचा शिक्का मारलेला असतो? काय ते फक्त आणि फक्त यशस्वी होण्यासाठीच जन्माला आलेले असतात? काय ते हत्तीच्या कानातुन पडलेले असतात?

तर मित्रांनो असे अजिबात नसते. ज्यांना आपण असामान्य माणसे म्हणतो ती देखील आपल्यासारखीच सामान्य माणसेच असतात कधीतरी. त्यांना देखील भुक लगते, त्यांना देखील थकवा येतो, त्यांना देखील कंटाळा येतो, त्यांना देखील जीवनातील छोट्या मोठ्या समस्यांना, संकटांना सामोरे जावे लागतेच. त्यांना देखील दोनच हात, दोनच पायम एकच डोक, एकच मेंदु असतो. त्यांच्या कडे देखील आपल्यासारखेच फक्त चोवीसच तास असतात दिवसात. त्यांना देखील झोप घ्यावी लागतेच. मग ज्यांना आपण असामान्य म्हणतो अशा माणसांमध्ये आणि सामान्य माणसांमध्ये फरक नक्की काय असतो बरे?

नेमके याच प्रश्नाचा धांडोळा , मी माझ्या या पुस्तकात , माझ्या स्वतःच्या अनुभवावरुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे तुम्ही ते वाचाल आणि तुम्हाला माझे अनुभव तसेच आमच्या सक्सेस स्टोरीज आवडतील. प्रत्यक्ष पुस्तक वाचण्यास सुरुवात करण्यापुर्वी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो.

एक कुटूंब म्हणजे नवरा बायको, दोन मुले त्यांचे छोटीशी झोपडी आणि एक हाडा्ची काडं झालेली त्यांची एक म्हैस, असे कुटूंब नर्मदेच्या काठी आनंदाने राहत असते. नदी एका अत्यंत सुपीक प्रदेशातुन वाह्त असते. आई-वडील घरासमोर थोडा भाजीपाला पिकवतात, तसेच म्हशीच्या दुधापासुन जेवढे मिळेल तेवढ्या कमाईतुन पुरेसे धान्य, मीठ मसाला इ विकत आणुन गुजरान करीत असतात.सर्वकाही कुशल मंगल असते.

नर्मदा परिक्रमा करता करता एक साधु वाट चुकून या कुटुंबाच्या दारात येऊन पोहोचतो. साधु सोबत त्याचा एक शिष्य देखील असतो. आगंतुक आलेल्या साधुची खुप चांगली आवभगत कुटुंब करते. त्या दिवशीचे दुध विक्रीला नेत नाहीत. ते दुध साधुला व त्याच्या शिष्याला दिले जाते. दुस-या दिवशी दुपारचे जेवण करुन साधु निघणार असतात. पण दुपारच्या जेवणाला चवच नसते कारण मीठच विकत आणलेले नसते दुध न विकल्यामुळे. सर्व प्रकार साधुच्या लक्षात येतो. साधु तरीही आवडीने दुपारचे भोजन ग्रहन करुन निघतो.

थोडे दुर गेल्यावर, साधुच्या काहीतरी लक्षात येते व तो माघारी फिरतो त्या झोपडीकडे. झोपडीत कुणीही नाही व आसपास देखील कुणीही नाही याची खात्री करुन, साधु तिथेच पडलेल्या एका हत्याराने म्हशीचा गळा चिरतो. हा पाय प्रकार घडत आहे हे शिष्याला समजण्याच्या पलीकडे असते. काय प्रश्न विचारावा गुरुंना, कसा विचारावा हे देखील शिष्याला समजत नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या म्हशीकडे पाहुन शिष्य पुढच्या दिशेने धुम ठोकतो. म्हैस मेली आहे याची खात्री करुन मगच साधु देखील पुढच्या प्रवासाला निघतो.

काही मैल अंतर चालल्यावर , शांत झाल्यावर शिष्य गुरुला विचारतोच की ज्या कुटूंबाने तुम्हाला प्रेमाने स्वतःच्या ताटातील घास काढुन दिला, ज्या म्हशीचे दुध दिले, त्याच म्हशीला तुम्ही ठार मारलेत! असे का केले गुरुजी?

गुरुजींनी असे का केले होते याचे स्पष्टीकरण, उत्तर शिष्याला लागलीच दिले पाहिजे असे साधुला वाटत नव्हते. साधु केवळ इतकच म्हणाले की वेळ आल्यावर तुला समजेल.

पुढे अनेक वर्षांनी तोच साधु व त्यांचा तोच शिष्य त्याच मार्गाने नर्मदा परीक्रमा करण्याचे ठरवुन मार्गस्थ होतात. साधु पुढे चालत असतात. त्यांची पाऊले नदी काठावरुन, त्या सुपीक प्रदेशाकडे पडु लागतात. साधु शांतपणे चालत असतात तर शिष्य कुतुहलाने ती झोपडी शोधत असतो. त्याला झोपडी कुठेच दिसत नाही. अजुन पुढे जाऊन पाहतात तर काय आश्चर्य! झोपडीच्या जागी एक भला मोठा वाडा उभा राहिलेला असतो. अंगणात गाई-गुरे, म्हशी, शेतीची औजारे असा सगळा पसारा असतो. वाड्याच्या मागील बाजुला खुप मोठ्या शेतात विविध पीके डोलत असतात. बैल गाडी, घोडा गाडी, तीन घोडे देखील असतात दुस-या बाजुला तबेल्यात.

शिष्याला वाटते की आपण चुकीच्या जागी आलो आहोत म्हणुन तो माघारी वळतो , तेवढ्यात आतुन त्या कुटूंबाचा प्रमुख म्हणजे तोच गरीब असलेला मनुष्य बाहेर येत येत साधुला हाक मारतो. दोघांना घेऊन वाड्यात जातो. गरम पाण्याने तो दोघांना स्नान करवतो. पंचपक्वान्नाचे जेवण आनंदाने खाऊ घालतो. साधु व शिष्य तृप्त होतात. आशीर्वाद देत कल्याण हो असे म्हणतात.

तो मनुष्य म्हणतो, महाराज कल्याण तर माझे तेव्हाच झाले जेव्हा तुमचे चरण माझ्या झोपडीला लागले होते. तुमच्या आशीर्वादाचाच परिणाम म्हणुन आज झोपडीच्या जागी हा भव्य वाडा उभा आहे.

शिष्य विस्मयाने विचारतो,”हे कसे झाले?”

गृहस्थ म्हणतो,”तुम्ही गेले आणि कुणीतरी आमच्या त्या मरतुकड्या म्हशीला मारुन गेले. ती म्हैस म्हणजे आमचा जीव की प्राण होती. तिच्या शिवाय जगणे आम्हाला अवघड जाऊ लागले. आम्हाला एक दोन शेर दुध विकण्या पलीकडे काहीच माहीत नव्हते. जीवन जगणे मुश्किल होऊन गेले. हळु हळु आम्ही शेती करण्यास सुरुवात केली. शेती कशी करावी हे आम्ही अनुभवातुन, चुका करीत करीतच शिकलो. पाच वर्षातच आमच्याकडे चक्क वीस एकर शेती झाली. दोन्ही मुले मोठी झाली. मला मदत करु लागली. आमचा पसारा वाढत गेला. आता आमच्याकडे मदतीसाठी सहा नोकर देखील आहेत. बाकी स्थावर संपत्ती देखील खुप मोठी निर्माण झाली. एक मुलगा आता शहरात राहतो व आम्ही इथे पिकवलेला भाजीपाला व धनधान्य तिकडे विकण्याचे काम करतो. आता आम्ही ट्रॅक्टर घेण्याचा विचार करीत आहोत व भाजीपाला वाहतुकीसाठी दोन वाहने देखील घेणार आहोत. तुमचा आशीर्वाद असाच राहिला तर अजुन जास्त प्रगती करतील माझी मुले! ”

मरतुकड्या म्हशीला का मारले?

या अनेक वर्षांपुर्वी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शिष्याला आज मिळाले.

या गृहस्थाकडे जशी एक मरतुकडी म्हैस होती ना तशीच मरतुकडी म्हैस प्रत्येक सामान्य माणसाकडे असते. आणि ती म्हणजे असलेल्या चाकोरीत सुखी होणे, सेटल होणे. त्या गृहस्थाचे नशीब चांगले म्हणुन त्याची मरतुकडी म्हैस मारणारा साधु त्याच्यापर्यंत गेला.

आपली मरतुकडी म्हैस नेमकी कोणती? ती ओळखायची कशी? तिला मारलेच पाहिजे का? तिच्या शिवाय किंवा ती असतानादेखील पुढच्या आणखी जास्त महान चाकोरीत प्रक्षेपण कसे करायचे?

अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माझ्या या पुस्तकात मिळतील.

अवश्य वाचा व तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा!

आपला

महेश ठोंबरे

Business leader and motivator

आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं.

Mobile / Whatsapp –  9923062525

मी एक यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे कारण नक्की काय आहे, हेच मी “श्रीमंतीचा महामार्ग” या लेखमालेतुन लिहित आहे. तुम्हाला माझ्या सोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा, व्यवसाय, तोही कमीत कमी भांडवलामध्ये सुरु करायचा असेल व माझ्या सारखेच (किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त) यश मिळवायचे असेल तर मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiY2l0eSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiUHVuZSIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJzZWxlY3RsaXN0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsImxhYmVsX2RlbGltIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJpY29uX2NsYXNzIjoiIiwiaWNvbl9zaXplIjoiIiwiaWNvbl9jb2xvciI6IiIsInRlcm1zIjoiIiwib3B0aW9ucyI6W3sibmFtZSI6IlB1bmUiLCJsYWJlbCI6IlB1bmUgLSBcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJBaG1lZG5hZ2FyIiwibGFiZWwiOiJBaG1lZG5hZ2FyIC0gXHUwOTA1XHUwOTM5XHUwOTJlXHUwOTI2XHUwOTI4XHUwOTE3XHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiU2hpcmRpIiwibGFiZWwiOiJTaGlyZGkgLSBcdTA5MzZcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NGRcdTA5MjFcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJOYXNoaWsiLCJsYWJlbCI6Ik5hc2hpayAtIFx1MDkyOFx1MDkzZVx1MDkzNlx1MDkzZlx1MDkxNSJ9LHsibmFtZSI6IkF1cmFuZ2FiYWQiLCJsYWJlbCI6IkF1cmFuZ2FiYWQgLSBcdTA5MTRcdTA5MzBcdTA5MDJcdTA5MTdcdTA5M2VcdTA5MmNcdTA5M2VcdTA5MjYifSx7Im5hbWUiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIiwibGFiZWwiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIC0gXHUwOTM1XHUwOTIxXHUwOTE3XHUwOTNlXHUwOTM1IFx1MDkyZVx1MDkzZVx1MDkzNVx1MDkzMyJ9LHsibmFtZSI6IlRhbGVnYW9uIiwibGFiZWwiOiJUYWxlZ2FvbiAtIFx1MDkyNFx1MDkzM1x1MDk0N1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkxvbmF2bGEiLCJsYWJlbCI6IkxvbmF2bGEgLSBcdTA5MzJcdTA5NGJcdTA5MjNcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MzJcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJLaG9wb2xpIiwibGFiZWwiOiJLaG9wb2xpIC0gXHUwOTE2XHUwOTRiXHUwOTJhXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNmIn0seyJuYW1lIjoiRmFsdGFuIiwibGFiZWwiOiJQaGFsdGFuIC0gXHUwOTJiXHUwOTMyXHUwOTFmXHUwOTIzIn0seyJuYW1lIjoiQWtvbGEiLCJsYWJlbCI6IkFrb2xhIC0gXHUwOTA1XHUwOTE1XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQW1yYXZhdGkiLCJsYWJlbCI6IkFtcmF2YXRpLSBcdTA5MDVcdTA5MmVcdTA5MzBcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MjRcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJCZWVkIiwibGFiZWwiOiJCZWVkIC0gXHUwOTJjXHUwOTQwXHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiQmhhbmRhcmEiLCJsYWJlbCI6IkJoYW5kYXJhIC0gXHUwOTJkXHUwOTAyXHUwOTIxXHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQnVsZGhhbmEiLCJsYWJlbCI6IkJ1bGRoYW5hIC0gXHUwOTJjXHUwOTQxXHUwOTMyXHUwOTIyXHUwOTNlXHUwOTIzXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQ2hhbmRyYXB1ciIsImxhYmVsIjoiQ2hhbmRyYXB1ciAtIFx1MDkxYVx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0ZFx1MDkzMFx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IkRodWxlIiwibGFiZWwiOiJEaHVsZSAtIFx1MDkyN1x1MDk0MVx1MDkzM1x1MDk0NyJ9LHsibmFtZSI6IkdhZGNoaXJvbGkgIiwibGFiZWwiOiJHYWRjaGlyb2xpIC0gXHUwOTE3XHUwOTIxXHUwOTFhXHUwOTNmXHUwOTMwXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiR29uZGlhIiwibGFiZWwiOiJHb25kaWEgLSBcdTA5MTdcdTA5NGJcdTA5MDJcdTA5MjZcdTA5M2ZcdTA5MmZcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJIaW5nb2xpIiwibGFiZWwiOiJIaW5nb2xpIC0gXHUwOTM5XHUwOTNmXHUwOTAyXHUwOTE3XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiSmFsZ2FvbiIsImxhYmVsIjoiSmFsZ2FvbiAtIFx1MDkxY1x1MDkzM1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkphbG5hIiwibGFiZWwiOiJKYWxuYSAtIFx1MDkxY1x1MDkzZVx1MDkzMlx1MDkyOFx1MDkzZSJ9LHsibmFtZSI6IktvbGhhcHVyIiwibGFiZWwiOiJLb2xoYXB1ciAtIFx1MDkxNVx1MDk0Ylx1MDkzMlx1MDk0ZFx1MDkzOVx1MDkzZVx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IkxhdHVyIiwibGFiZWwiOiJMYXR1ciAtIFx1MDkzMlx1MDkzZVx1MDkyNFx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBDaXR5IiwibGFiZWwiOiJNdW1iYWkgQ2l0eSAtIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBTdWJ1cmJhbiIsImxhYmVsIjoiTXVtYmFpIFN1YnVyYmFuIC0gXHUwOTI4XHUwOTM1XHUwOTQwIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik5hZ3B1ciIsImxhYmVsIjoiTmFncHVyIC0gXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTE3XHUwOTJhXHUwOTQxXHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiTmFuZGVkIiwibGFiZWwiOiJOYW5kZWQgIC1cdTA5MjhcdTA5M2VcdTA5MDJcdTA5MjZcdTA5NDdcdTA5MjEifSx7Im5hbWUiOiJOYW5kdXJiYXIiLCJsYWJlbCI6Ik5hbmR1cmJhciAtIFx1MDkyOFx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDkyY1x1MDkzZVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik9zbWFuYWJhZCIsImxhYmVsIjoiT3NtYW5hYmFkIC0gXHUwOTA5XHUwOTM4XHUwOTRkXHUwOTJlXHUwOTNlXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTJjXHUwOTNlXHUwOTI2In0seyJuYW1lIjoiUGFsZ2hhciIsImxhYmVsIjoiUGFsZ2hhciAtIFx1MDkyYVx1MDkzZVx1MDkzMlx1MDkxOFx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IlBhcmJoYW5pIiwibGFiZWwiOiJQYXJiaGFuaSAtIFx1MDkyYVx1MDkzMFx1MDkyZFx1MDkyM1x1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlJhaWdhZCIsImxhYmVsIjoiUmFpZ2FkIC0gXHUwOTMwXHUwOTNlXHUwOTJmXHUwOTE3XHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiUmF0bmFnaXJpIiwibGFiZWwiOiJSYXRuYWdpcmkgLSBcdTA5MzBcdTA5MjRcdTA5NGRcdTA5MjhcdTA5M2VcdTA5MTdcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJTYW5nbGkiLCJsYWJlbCI6IlNhbmdsaSAtIFx1MDkzOFx1MDkzZVx1MDkwMlx1MDkxN1x1MDkzMlx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlNhdGFyYSIsImxhYmVsIjoiU2F0YXJhIC0gXHUwOTM4XHUwOTNlXHUwOTI0XHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiU2luZGh1ZHVyZyIsImxhYmVsIjoiU2luZGh1ZHVyZyAtIFx1MDkzOFx1MDkzZlx1MDkwMlx1MDkyN1x1MDk0MVx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkxNyJ9LHsibmFtZSI6IlNvbGFwdXIiLCJsYWJlbCI6IlNvbGFwdXIgLSBcdTA5MzhcdTA5NGJcdTA5MzJcdTA5M2VcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MzAifSx7Im5hbWUiOiJUaGFuZSIsImxhYmVsIjoiVGhhbmUgLSBcdTA5MjBcdTA5M2VcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJXYXJkaGEiLCJsYWJlbCI6IldhcmRoYSAtIFx1MDkzNVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkyN1x1MDkzZSJ9LHsibmFtZSI6Ildhc2hpbSIsImxhYmVsIjoiV2FzaGltIC0gXHUwOTM1XHUwOTNlXHUwOTM2XHUwOTNmXHUwOTJlIn0seyJuYW1lIjoiWWF2YXRtYWwiLCJsYWJlbCI6IllhdmF0bWFsIC0gXHUwOTJmXHUwOTM1XHUwOTI0XHUwOTJlXHUwOTNlXHUwOTMzIn1dfSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIxMDU0MCIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjcyMTYiLCJhY3Rpb25zIjoiMTc0Iiwic29ydF9vcmRlciI6IjEiLCJpc19wcm8iOiIwIiwiYWJfaWQiOiIwIiwiZGF0ZV9jcmVhdGVkIjoiMjAxNi0wNS0wMyAxNTowMTowMyIsImltZ19wcmV2aWV3X3VybCI6Imh0dHA6XC9cL3N1cHN5c3RpYy00MmQ3Lmt4Y2RuLmNvbVwvX2Fzc2V0c1wvZm9ybXNcL2ltZ1wvcHJldmlld1wvYmFzZS1jb250YWN0LmpwZyIsInZpZXdfaWQiOiIxMV81NjMwNDYiLCJ2aWV3X2h0bWxfaWQiOiJjc3BGb3JtU2hlbGxfMTFfNTYzMDQ2IiwiY29ubmVjdF9oYXNoIjoiNDEwODFjMTE1NDgwNTA3Nzg5NWVmYmIwZmMyYmU5NTkifQ==

 

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *