स्वप्न ते ध्येयपुर्ती – ध्येय

जोआन रोव्लिंग या लेखिकेच्या अदभुत प्रवासाविषयी आपण मागील लेखामध्ये थोडक्यात पाहिले. ज्याप्रमाणे आपल्या सर्वांच्याच आयुष्यात संकटे येतात तशी संकटे तिच्या आयुष्यात देखील आलीच. सामान्य माणसे आणि तिच्यासारखी माणसे यांच्यामध्ये मुलभुत फरक असतो तो म्हणजे उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्ने व ती स्वप्ने पुर्ण करण्यासाठी केलेली धडपड. जोआन रोव्लिंग हि लेखिका काय एकटीच असे उदाहरण आहे का बरे अशा माणसांचे की ज्यांनी प्रचंड विपरीत परिस्थीतीमध्येसुध्दा आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला आणि ती स्वप्ने पुर्ण केली. तुम्हाला अशा अजुन जास्त व्यक्तिमत्वांची माहीती करुन घ्यायची असेल तर आमचा श्रीमंतीचा महामार्ग – १ हा लेख अवश्य वाचा याच वेबसाईट वरील.


या लेखमालेतील पहिला भाग तुम्ही अद्याप वाचला नसेल तर इथे क्लिक करुन अवश्य वाचा.


तर मुद्दा असा आहे की या सर्व महान व्यक्तिमत्वांमध्ये, त्यांच्या स्वभावांमध्ये, विचारसरणी मध्ये, यश मिळविण्यासाठी अवलंबलेला मार्ग निवडण्यामध्ये वैविध्य आहे. यशाचा एक कोनता तरी मंत्र नाहीये की जो जपला की यश मिळेल. या सा-या व्यक्तिमध्ये जरी अनेक बाबतीत वेगळेपण असले तरी देखील यांच्या दोन गोष्टी समान आहेत. सामान्य आहे, कॉमन आहेत.

त्यातील पहिली गोष्ट म्हणजे त्या प्रत्येकाने स्वप्ने पाहिली. उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहिली. यापैकी कुणालाही कुणीही स्वप्नांत येऊन दृष्टांत दिलेला नाहीये. अगदी बाबा रामदेवांना सुध्दा त्यांच्या गुरुने स्वप्नात दृष्टांत दिलेला नाही. किंवा झोपेत असताना अथवा समाधी मध्ये असताना साक्षात्कार झालेला नाही. त्यांनी जी स्वप्ने पाहिली ती अगदी उघड्या डोळ्यांनी पाहिली. या स्वप्नांना आकार होता, या स्वप्नांना रुप होते, या स्वप्नांना रंग होता. एकुणच काय तर या स्वप्नांना शब्दांमध्ये अथवा एखाद्या रुपात पाहता , मांडता येत होते. त्यांची स्वप्ने जरी मोठी होती तरी देखील त्या स्वप्नांना प्रत्येकाने जाणिवपुर्वक कागदावर मांडले. व जेव्हा आपण आपल्या स्वप्नांना कागदावर मांडतो तेव्हा ती स्वप्ने नुसती स्वप्ने राहत नाहीत. ती स्वप्ने मग बनतात तुमची ध्येये.

दुसरी कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे केवळ नैतिकतेचाच अवलंब करणे. कारण अनैतिकतेने कमावलेले धन, यश, समृध्दी अल्पकाळ टिकणारी असते. प्रारंभी अनैतिकतेची कमाई खुप झगमगाट करते पण तिचा शेवट कुणालाही आवडणारा नसतो. याची अनेक उदाहरणे आपण अगदी आपल्याच देशात पाहिली आहेत मागील एक दोन वर्षांमध्ये.

आज इंटरनेट वर गुगल वर, युट्यूब वर तुम्ही ध्येय निश्चिती म्हणजे गोल सेटींग असा शोध घेतला तर तुम्हाला हजारोंच्या संख्येने लेख, विडीयो सापडतील. तसेच तुम्ही यशस्वी लोकांच्या जीवनाचा जरी अभ्यास केला केला, त्यांच्या चरीत्राचे अवलोकन केले तर तुम्हाला समजेल की प्रत्येकाने आपापले ध्येय गाठण्यासाठी आपापल्या परीने मार्ग अवलंबले आहेत. त्यामुळे अमुक एक मार्ग वापरला की तुम्ही यशस्वी व्हाल याचा काही भरवसा नसतो.

पण एक मात्र नक्की की जेव्हा तुम्ही तुमची स्वप्ने कागदावर मांडता तेव्हा तुमचे पहिले पाऊल पडते तुमच्या ध्येयपुर्तीच्या दिशेने.

पण गम्मत अशी की आपल्यापैकी अनेकांकडुन हे पहिले पाऊलच नेमके पडत नाही. पहिलेच पाऊल पडले नाही तर दुसरे कसे पडेल, तिसरे, चौथे, ध्येयाकडे वाटचाल कशी बरे सुरु होईल. त्यामुळे पहिले पाऊल पडणे खुप गरजेचे आहे.

यासाठी तुम्ही तुमच्या घरात बसुन हे काम करु शकता. आधी उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पहा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्की काय करायचे आहे? तुमच्या आयुष्याची पुर्तता नक्की कशात आहे? असे काय केले, काय मिळवले म्हणजे तुम्ही ख-या अर्थाने समाधाने व्हाल?

आपल्या वयाचे येणा-या भविष्यातील विविध टप्पे तुमच्या डोळ्यासमोर आणा. त्या प्रत्येक टप्प्याकडे तुम्ही आत्ताच पहा. पहा की अजुन पाच वर्षांनी तुम्ही कुठे असाल, तुम्ही काय करीत असाल. तुम्हाला तुमचे भविष्य दिसेल. तुम्ही जे भविष्य पाहणार आहात या भविष्यात तुम्हाला तुमच्या कल्पना शक्तिचा आता उपयोग करायचा आहे. तुम्ही जे काही पाहिले त्यामध्ये काय बदल झाला म्हणजे तुम्हाला तुमचे भविष्य आवडेल, तो बदल, कल्पनाशक्तिच्या सहाय्याने, तुम्ही पाहिलेल्या चित्रात एकदा भरा व पुन्हा एकदा तुमच्याकडेच, भविष्यातील तुम्ही कसे होणार आहात हे चित्र पहा. स्वप्न पाहण्याला मर्यादा अजिबात नसतात. त्यामुळे अवश्य तुम्ही बिनधास्त स्वप्ने पहा.

मला आठवतय २०१६ मध्ये मी स्वप्न पाहिल होत एक अद्ययावत अशी माझ्या संपुर्ण कुटुंबाला सामावुन घेईल, प्रत्येक सीटला एअर बॅग असेल, प्रत्येक सीटला एसी असेल, रस्त्यावर कितीही खड्डे असले तरीही गाडीतील माणसांना एकही खड्डा जाणवणार नाही अशी मोठ्ठी गाडी घेण्याचे. मी पाहिलेल्या स्वप्नाला रुप होतं, आकार होता, रंग होता. मी माझे ते स्वप्न माझ्या डायरीमध्ये मांडले देखील. आणि २०१९ मध्ये मी माझे ते स्वप्न, की जे माझे ध्येय झाले होते, ते पुर्ण केले देखील. मी एम जी हेक्टर गाडी घेतली. भारतात जेव्हा ती बाजारात आली अगदी तेव्हाच, पहिल्याच लॉट मधील नवी कोरी एम जी हेक्टर गाडी मी घेतली. वर्ष २०१६ ते वर्ष २०१९ हा माझ्या एकंदरीत ध्येयातील एक टप्पा होता. एक छोटासा भाग होता. मी माझ्या स्वप्नांना, ध्येयांना कशा पध्दतीने प्रत्यक्षात आणतो या विषयी मी विस्ताराने लिहिणार आहेच. तुर्त आपण इथे एक गोष्ट पक्की समजुन घेतली पाहिजे ती म्हणजे स्वप्ने पाहणे व पाहिलेले स्वप्न डायरी मध्ये , वहीमध्ये , घरामध्ये दर्शनी भागात, तुमच्या बेडरुममध्ये, तुम्ही झोपेतुन जागे झाले की लगेच नजर जाईल अशा ठिकाणी एखादे पेंटींग, फ्रेम लावतात तसे लावुन ठेवणे. अनेक ठिकाणी तुम्ही तुमचे ध्येय मांडुन, लिहुन ठेवा. अशा वस्तुंवर लिहा की जिथे वारंवार तुमची नजर जाते. अशा वस्तुंवर लिहा की ज्या वस्तु दिर्घकाळ टिकणा-या आहेत. तुम्ही तुमच्या घरात, बेडरुम मध्ये एक तुमची स्वतःची स्वप्नाची खिडकी देखील बनवु शकता. ही खिडकी म्हणजे एक बोर्ड असेल की ज्यावर तुम्ही तुमची स्वप्ने मांडुन ठेवाल. तुम्ही तुमचा मोबाईल, लॅपटॉप देखील वापरु शकता. हे असे करणे म्हणजे तुमचे तुमच्या ध्येयाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होय.

गाडी घेतली तेव्हा मी व पत्नी आवर्जुन यांना भेटायला व पेढे द्यायला गेलो ज्यांनी आम्हाला व्यवसायाची वाट दाखवली

एकदा का तुमचे पहिले पाऊल पडले की मग तुमचे स्वप्नच, तुमचे ध्येयच तुम्हाला आपोआप कामाला लावेल. आपल्या ध्येयाचे विस्मरण होणे ही मुख्य अडचण असते ध्येयपुर्ती मध्ये. कित्येकदा आपण आहेत त्याच स्थितीमध्ये सुखी राहण्याचा प्रयत्न करतो. आपण सेटल होतो. असे सेटल होऊ नये , जडत्व आपल्या अंगी येऊ नये म्हणुन देखील मांडुन ठेवलेली, सदैव नजरेसमोर येणारी ध्येय तुम्हाला तुमच्यातील क्षमतांची व तुमच्या ख-याखु-या योग्यतेची आठवण करुन देईल.

उघड्या डोळ्यांनी जी जी स्वप्ने पाहिली आहेत आजवर माणसाने ती ती पुर्ण केली आहेत. तुम्ही स्वप्न पाहु शकता याचाच अर्थ तुम्ही ती स्वप्ने पुर्ण करु शकता असा आहे. त्यामुळे माझ्याकडुन हे होईल की नाही, हे अवघडच आहे, मी अपयशी झालो तर अशा नकारात्मकतेला देखील तुमची लिहुन ठेवलेली, मांडुन ठेवलेली सतत नजरेसमोर असलेली ध्येये कायमची दुर ठेवतील.

पुढच्या लेखात वाचा, आम्ही नक्की काय करतो जेणेकरुन आमचा म्हणजे माझा, माझ्या टीमचा प्रवास स्वप्नांपासुन सुरु होऊन ध्येयपुर्तीकडे होत आहे.

आपला

महेश ठोंबरे

Business leader and motivator

आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525

मी एक यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे कारण नक्की काय आहे, हेच मी “श्रीमंतीचा महामार्ग” या लेखमालेतुन लिहित आहे. तुम्हाला माझ्या सोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा, व्यवसाय, तोही कमीत कमी भांडवलामध्ये सुरु करायचा असेल व माझ्या सारखेच (किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त) यश मिळवायचे असेल तर मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा.

Facebook Comments

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *