…आणि वयाच्या दहाव्या वर्षी ती एका कंपनीची सीईओ झाली.

माझे शिक्षण सुरु असतानाच मी व्यवसाय करण्याच्या फंदात पडलो. फंदात पडलो असे म्हणायचे कारण की त्या वेळी व्यवसाय नावाचे लोणचे कशासोबत खातात हे देखील माहित नसताना मी एक व्यवसाय सुरु केला. पुढील बरीच वर्षे मी तो व्यवसाय सांभाळला. मित्रानो , माझ्या प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवा बरका! मी “व्यवसाय सांभाळला” असे म्ह्णालो. आणि हे मी आता म्हणतोय. कदाचित त्या वयात मी माझ्या त्या व्यवसायाची फुशारकी देखील मारीत हिंडत असेन. पण वस्तुस्थिती काय होती ती मला आज समजतेय. माझा तो व्यवसाय मला नफा मिळवुन देत नव्हता का? तर देत होता. किती मिळायचा मला नफा त्यातुन? तर माझ्या कडील १५-२० लोकांचा पगार निघेल व मला ही शिल्लक राहिले तर थोडेफार पदरात पडेल एवढे मला मिळायचे. म्हणजे आकडे लक्षात रहावेत एवढे उत्पन्न मला त्या व्यवसायातुन मिळालेच नाही. त्यामुळेच मी, “व्यवसाय सांभाळला” असा शब्द वापरला. हे आणखी स्पष्ट समजण्यासाठी मी आणखी एक वाक्य वापरतो, ते आहे माझ्या सध्याच्या व्यवसायाविषयी. ते वाक्य असे,”गेली सहा वर्षे माझा व्यवसाय मला व माझ्या कुटूंबाला सांभाळतोय!’

आहे ना गम्मत भारी!

तर माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये मी जो व्यवसाय केला तो सपशेल फेल गेला. याचा अर्थ त्या वेळी मला व्यवसाय कसा करायचा हे माहित नव्हते का बरे? तर मला चांगलेच माहित होते व मी त्याही वेळी उच्च आकडेवारी मध्ये सेल केला. पण कुणाचा? दुस-याच कुणाचा तरी. नफा मिळायचा त्या कंपनीला व मला मिळायचा निव्वळ प्रसाद. अशी अवस्था होती. माझी चुक कुठे झाली होती? तर व्यवसाय निवड कशी करावी या बाबतीत मी चुकलो होतो. माझे वय चुकीचे अजिबात नव्हते मित्रांनो. माझी निवड चुकीची होती. व्यवसाय कोणता करावा, कशाचा आधारावर ठरवावे की काय व्यवसाय करावा, हे समजुन घेण्यासाठी तुम्ही माझे काही लेख वाचा, इथे क्लिक करुन.

कदाचित माझी निवड त्यावेळी चुकली नसती तर मी आज माझ्या या नवीन व्यवसायात एका आणखी उच्च अशा स्थानपर्यंत पोहोचलो असतो.

याचे कारण असे की त्या वयात जो जोश असतो, स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी धडपड करण्याची जी क्षमता असते, धोका पत्करण्याचे जी क्षमता असते ती पुढच्या आयुष्यात क्वचितच असते. त्यामुळे आज आपण अशाच काही व्यक्तिमत्वांची माहिती घेणार आहोत ज्यांनी अगदी कमी वयात व्यवसाय करण्यास सुरुवात केली व यशस्वी देखील झाले.

  • रितेश अगरवाल

वयाच्या १८ व्या वर्षी व्यवसासास सुरुवात. आणि आता ओयो रुम्स या भारतातील क्रमांक एक च्या ऑनलाईल हॉटेल रुम बुकींग प्लॅटफॉर्मचा मालक. याच्या विषयी मी जास्त सांगत नाही. भारतातील प्रत्येक रस्त्यावर याच्या कंपनीचे लाल रंगाचे ठळक बोर्ड दिसतात.

  • फरहाद ॲसिडवाला

वयाच्या १६ व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात आणि आज रॉक्शा मीडीया या जागतिक कंपनीचा सीईओ. २०१९ चा सर्वात तरुण व्यावसयिक असा पुरस्कार देखील त्याला मिळाला आहे

  • श्रावण कुमारन आणि संजय कुमारन

या भावांची तर कमालच आहे. वय वर्षे १७ व १५ अशी यांची वये आहेत. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी स्वतः बनवलेल्या ॲप साठी एक कंपनी बनवली. विशेष म्हणजे ती खुप चांगली चालली देखील. सन २०१७ फोर्बस या जागतिक क्रमवारी संस्थेने 30 under 30  या प्रकारात या दोन भावांच्या नावाची नोंद केली. पुढे टेडक्स मध्ये देखील त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली.

  • अद्वैत ठाकुर

वयाच्या नवव्या वर्षी स्वतची वेबसाईट बनवणारा हा अद्वैत. सध्या तो १६ वर्षांचा असुन अपेक्स इन्फोसिस या कंपनीचा सीईओ आहे. तो कंम्युटर प्रोग्रामिंग वयाच्या ११ वर्षापासुन करीत आहे. व जगातील सर्वात कमी वयाचे प्रोग्रामर्स मध्ये त्याच्या नावाची नोंद देखील आहे

  • अर्जुन राय

ज्या वयात मुले व्हिडियो गेम खेळतात त्या वयात या पठ्ठ्याने ऑनलाईन प्लॅटाफॉर्म तयार करुन अमेरिकेतील लोकांना भंगार विकण्यासाठी सोय निर्माण करुन दिली. त्याच सुमारास तो एका खुप मोठ्या ऑनलाईन मार्केटींग कम्पनीचा सीओओ देखील झाला. पण २०१० मध्ये त्याने ती नोकरी सोडली व शिक्षण पुर्ण केले. आता तो दोन कंपन्यांचा मालक आहे.

  • किंग सिध्दार्थ

इयत्ता ११ वी मध्ये असताना हा पठ्ठ्याने चक्क हाताखाली काम करण्यासाठी वेव डेव्हलपर्स ठेवले होते. कामाचा लोड इतका वाढला की त्याने जाणीवपुर्वक पुढचे शिक्षण सोडुन दिले. पण शिकणे मात्र अजुन ही सुरु आहे. २०१० मधील जगातील सर्वात कमी वयाच्या २५ उद्योगपतींच्या  यादीमध्ये त्याचे नाव होते. याने खरतर दहावी मध्ये असतानाच व्यवसायास सुरुवात केली. स्वतःच्या सोसायटी, एरीया मध्ये विविध कार्यक्र्मांचे आयोजन करुन, कधीकधी तिकीट लावुन त्याने ते कार्यक्रम केले.

  • श्रीलक्ष्मी सुरेश

हिने तिच्या आयुष्यातील पहिली वेबसाईट वयाच्या सहाव्या वर्षी बनविली. आणि वयाच्या दहाव्य वर्षी ती एका कंपनीची मालकीन होती. अनेक राष्ट्रीय तसेच आतंरराष्ट्रीय पुरस्कार तिला मिळाले आहेत. मुळ केरळची असलेली श्रीलक्ष्मी, आता उच्च महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिकत आहे. तिच्या कम्पनी आजपर्यंत भारतातील १०० च्या पेक्षा जास्त कंपन्यांच्या वेबसाईट्स बनवुन दिल्या आहेत.

मित्रांनो, माझे वय कमी नव्हते किंवा जास्त ही नव्हते. कोणताही व्यवसाय करायचे योग्य वय कोणते हा प्रश्न मला जर आज कुणी विचारला तर माझे उत्तर खालील प्रमाणे दोन भागात आहे.

  • योग्य संधी मिळते तेव्हाचे वय
  • ज्यावेळी तुम्ही व्यवसाय करण्यासाठी तयार झालेला असता तेव्हाचे वय.

हे मी ओळखले व त्यानुसार योग्य संधी मिळताच, स्वतःला तयार केले. त्यामुळेच आज मी म्हणु शकतो मी आज माझा व्यवसाय मला सांभाळतोय.

वय हा केवळ आकडा आहे. कुणाचे कमी कुणाचे जास्त. सर्वात महत्वाचे आहे की तुम्ही संधी ओळखली आहे का आणि ओळखलेल्या संधीसाठी तुम्ही स्वतःला तयार केले आहे का?

वाचत रहा माझे लेख. आवडल्यास अवश्य शेयर करा.

कळावे
आपलाच
महेश ठोंबरे – 9923062525

Business leader and motivator
I am a wellness coach. I help people with physical well-being. Continuous support, coaching and structured/proven approach is the key. You also can become a coach like me, its easy, trust me. To contact me please call – 9923062525
आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525
मी एक यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे कारण नक्की काय आहे, हेच मी “श्रीमंतीचा महामार्ग” या लेखमालेतुन लिहित आहे. तुम्हाला माझ्या सोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा, व्यवसाय, तोही कमीत कमी भांडवलामध्ये सुरु करायचा असेल व माझ्या सारखेच (किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त) यश मिळवायचे असेल तर मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIzNjMzIiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiMjIxMCIsImFjdGlvbnMiOiI0OSIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNzYwODcyIiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzc2MDg3MiIsImNvbm5lY3RfaGFzaCI6IjllODUxN2I1ZGFiOGI0NWEwNjI0MDFlMDVhYjA3NGQwIn0=

 

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *